मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंड कपारी

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात

वाचने 1601 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळलेला काव्यप्रेमी 05/07/2012 - 16:49
अजून एक सुंदर क्रियेशन!!
जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले
क्या बात!!

अस्वस्थामा 10/07/2012 - 02:50
छानच.. खास करून पहिली दोन कडवी तर फार आवडली..

अर्धवटराव 10/07/2012 - 04:07
कविता वाचायला खुप छान वाटली... पण, नेहमीप्रमाणे यंदाही, अजीबात कळल नाहि :( अर्धवटराव