अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी
तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी
काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले
जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
कजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले
.........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1624
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह
अजून एक सुंदर क्रियेशन!!
क्या बात!!
(No subject)
अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम
सुंदर रचना...
+१
छानच.. खास करून पहिली दोन कडवी तर फार आवडली..
हे असं का होतं...
कविता वाचायला खुप छान वाटली... पण, नेहमीप्रमाणे यंदाही, अजीबात कळल नाहि :(
अर्धवटराव
मस्त!
मस्त!