'उरा'तली सर!
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर! (अर्थात, यातल्या बोरकरांच्या ओळी ओळखालच.) :)
पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर
दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर
तहानलेला चातक कोठे आर्त आळवी सूर
कैवल्याने वरूणाचे का भरू नये मग ऊर?
बरसे रस पिकल्या अम्भोदांतुन टापूर-टुपूर
सुगंधमृण्मय अभिनव नाजुक पसरे सर्वदूर
दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर
तृणाप्रमाणे मनेंहि होती चंचल तृष्णमयूर
कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर
पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर!
इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर
हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर!
सोनसळी लेऊन नव्हाळी साळि नर्तनातूर,
शेतांमधुनी फुले तृप्तिचा पीत वर्ण भरपूर!
भद्र भादवा घेऊन ये सौभाग्याचा सिंदूर
निरोप देती वर्षाराणी हासे मधुरमधूर!
अ स्स ल मे व्या !!
सु आणि रे आणि ख !!!!
सलाम...!सलाम...!सलाम...!
+१००००००
वा रे मेघवेड्या!
+१
छान
आवडली हे वे सां न ल.
मस्त रे मेव्या... खूप
उत्तम कविता!
मस्त!
अनुमोदन
छान
निव्वळ अप्रतिम.
अतिशय सुंदर रचना. परत परत
मेघवेडा साहेब. खरच खुप सुंदर रचना आहे.
खल्लास!!!
सु रे ख !
+1 असच म्हणते
हा धागा स्पेशली रेकमेंड झाला
अप्रतिम...!!
मस्त
कविता आवडली. पण समजायला अवघड
+१, अर्थात कवितेला समजुन घेणं
छान ! आता याचं रसग्रहण करुन
दा .. प्रच्चंड आवडेश. अरे
धन्यवाद.
मेव्या, किती सुंदर लिहिलं
व्वा!
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ...
आपण तर निशब्द
खूपच सुंदर कविता! जियो मेवे!
खरोखरच सुंदर काव्य!!
फारच सुंदर
"सकस" हा शब्द चैतन्य
अस्सल
सुंदर
भारी