मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंधार घेतले तू

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या

वाचने 1188 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अमितसांगली 28/06/2012 - 12:21
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू...........हे मात्र पटल... कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू........अप्रतिम.........