जुन्या वाड्यांच्या दारावरील
सायकलींच्या ढिगासारखे
एकात एक गुंतून पडलेले विचार
घेऊन बसलो आहे...
अर्गोनोमिक साहित्य
लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या
'मान द्या (नाहीतर कापून घेईन)'
अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या
नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित
की बघितल्यावर विसरता विसरत नाही
शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट
अशावेळी कधीही सापडत नाही...
वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान
डोक्यात उघडून बसलो आहे
आजची जाहिरात -
' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या
टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा '
हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला
तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत?
जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं
काहीतरी असत सायकलीच्या ढिगा पल्याड
लंगडी घालणारे पाय आणले असतील
तर डाव रंगेल,
भाग्यात असेल तर समोरच्या काकूंचा
रियाजी ओरडाही मिळेल...
पण त्या आधी वाडा कुठाय हे माहिती आहे का?
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1971
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूढ काव्य
(No subject)
+१
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
शिर्षक वाचुन एक पाटी आठवली :
पेशवे, वाडा पाडून स्कीम करायची असेल तर इथे एकजण आहेत -
तीन चार वेगळ्या वेगळ्या दम
बराच व्यायाम करुन काहीच फायदा झाला नाही
In reply to तीन चार वेगळ्या वेगळ्या दम by नाना चेंगट
म्हणजेच, कल्पना दमदार होत्या.
In reply to तीन चार वेगळ्या वेगळ्या दम by नाना चेंगट
कल्पना योग्य आणि एकसंध असत्या आणि त्या अनुभवातून आल्या
In reply to म्हणजेच, कल्पना दमदार होत्या. by अरुण मनोहर
वाचकांचे आभार!
दादा, बाकीच्यांनी काय स्तुस्तीसुमनं उधळलीयेत असं वाटतय का?
In reply to वाचकांचे आभार! by पेशवा