Skip to main content

वाडा

लेखक पेशवा यांनी बुधवार, 27/06/2012 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्यांच्या दारावरील सायकलींच्या ढिगासारखे एकात एक गुंतून पडलेले विचार घेऊन बसलो आहे... अर्गोनोमिक साहित्य लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या 'मान द्या (नाहीतर कापून घेईन)' अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित की बघितल्यावर विसरता विसरत नाही शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट अशावेळी कधीही सापडत नाही... वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान डोक्यात उघडून बसलो आहे आजची जाहिरात - ' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा ' हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत? जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं काहीतरी असत सायकलीच्या ढिगा पल्याड लंगडी घालणारे पाय आणले असतील तर डाव रंगेल, भाग्यात असेल तर समोरच्या काकूंचा रियाजी ओरडाही मिळेल... पण त्या आधी वाडा कुठाय हे माहिती आहे का? -पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 1980
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

थोडे कळले पण बरेच डोक्यावरून गेले...

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्माईली शी पुर्णत: सहमत. ;)

शिर्षक वाचुन एक पाटी आठवली : फेस्बुकावर पाहीली होती. " वाडा पाडुन बिल्डींग बांधायची नाही असे ठरले आहे. तरीही जर कोणी याबाबत विचारणा करण्यास आले तर त्यास पोकळ बांबुचे फटके मारण्यात येतील. - हुकुमावरुन. "

श्रीयुत `हरवलेल्या जाहजाचे कप्तान' तुम्ही त्यांच जहाज शोधून द्या ते तुम्हाला वाडा शोधून देतील

संक्षी... ह. ह. पु. वा. लगे रहो... त्यातून 'जे जगतो तेच लिहितो' म्हणता त्यामुळे तुमच्या लिहिण्याची कीवही करता येत नाही.. असो... सध्या गृहपाठ म्हणुन 'लाला टांगेवाला' पाठ करून या व त्याचे रसग्रहण पण लिहा... अवघड आहे पण बघा .. झेपेल ... ;-)