जुन्या वाड्यांच्या दारावरील
सायकलींच्या ढिगासारखे
एकात एक गुंतून पडलेले विचार
घेऊन बसलो आहे...
अर्गोनोमिक साहित्य
लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या
'मान द्या (नाहीतर कापून घेईन)'
अशा जाड अक्षरांनी पार वाकलेल्या
नवी कल्पना निसर्गत:च वस्त्रविरहित
की बघितल्यावर विसरता विसरत नाही
शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फॉन्ट
अशावेळी कधीही सापडत नाही...
वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान
डोक्यात उघडून बसलो आहे
आजची जाहिरात -
' लाज वापरून झाली असेल तर आणून द्या
टॅक्स मध्ये सूट किंवा लंगोटी तरी मिळवा '
हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला
तुम्ही वापरलेलं हसणं; पुन्हा वापरलंत?
जुन्या वाड्याच्या अंगणांसारखं
काहीतरी असत सायकलीच्या ढिगा पल्याड
लंगडी घालणारे पाय आणले असतील
तर डाव रंगेल,
भाग्यात असेल तर समोरच्या काकूंचा
रियाजी ओरडाही मिळेल...
पण त्या आधी वाडा कुठाय हे माहिती आहे का?
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
गूढ काव्य
थोडे कळले पण बरेच डोक्यावरून गेले...
(No subject)
+१
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
स्माईली शी पुर्णत: सहमत. ;)
शिर्षक वाचुन एक पाटी आठवली :
शिर्षक वाचुन एक पाटी आठवली : फेस्बुकावर पाहीली होती.
" वाडा पाडुन बिल्डींग बांधायची नाही असे ठरले आहे. तरीही जर कोणी याबाबत विचारणा करण्यास आले तर त्यास पोकळ बांबुचे फटके मारण्यात येतील. - हुकुमावरुन. "
पेशवे, वाडा पाडून स्कीम करायची असेल तर इथे एकजण आहेत -
श्रीयुत `हरवलेल्या जाहजाचे कप्तान'
तुम्ही त्यांच जहाज शोधून द्या ते तुम्हाला वाडा शोधून देतील
तीन चार वेगळ्या वेगळ्या दम
तीन चार वेगळ्या वेगळ्या दम असलेल्या कल्पना एकदम वापरल्याने दम लागला.
बराच व्यायाम करुन काहीच फायदा झाला नाही
In reply to तीन चार वेगळ्या वेगळ्या दम by नाना चेंगट
तर दमायला होतं असा अनुभव आहे
म्हणजेच, कल्पना दमदार होत्या.
In reply to तीन चार वेगळ्या वेगळ्या दम by नाना चेंगट
म्हणजेच, कल्पना दमदार होत्या.
कल्पना योग्य आणि एकसंध असत्या आणि त्या अनुभवातून आल्या
In reply to म्हणजेच, कल्पना दमदार होत्या. by अरुण मनोहर
असत्या तर कविता दमदार झाली असती
वाचकांचे आभार!
संक्षी... ह. ह. पु. वा. लगे रहो... त्यातून 'जे जगतो तेच लिहितो' म्हणता त्यामुळे तुमच्या लिहिण्याची कीवही करता येत नाही.. असो... सध्या गृहपाठ म्हणुन 'लाला टांगेवाला' पाठ करून या व त्याचे रसग्रहण पण लिहा... अवघड आहे पण बघा .. झेपेल ... ;-)
दादा, बाकीच्यांनी काय स्तुस्तीसुमनं उधळलीयेत असं वाटतय का?
In reply to वाचकांचे आभार! by पेशवा
प्रतिसाद तरी नीट बघत जा हो