तिचा देखणा देह
पेटवी देहात वणवा
तिच्या अदा कातिल
होई जीव घायाळ
तिची रेशमी साडी
करे पदराशी चाळा
ते चोरटे कटाक्ष
होई जीव खुळा
उसळे कुंतलाच्या लाटा
दर्वळे आसमंत सारा
भरकटे गलबत माझे
कोठे शोधू किनारा
बिघडे श्वासाची लय
तिचा धकधकणारा उर
ति गौरगुलाबी काया
चुंबण्या जीव आतुर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1951
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविताबाईना कविता विभागात
उगा ढकला ढकळी नका करु. यश्टी
In reply to कविताबाईना कविता विभागात by JAGOMOHANPYARE
वा..