✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

श
शुचि यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 07:37  ·  लेख
लेख
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
196639 वाचन

💬 प्रतिसाद (347)

प्रतिक्रिया

आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!...

मृगनयनी
Wed, 06/27/2012 - 12:07 नवीन
आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!... पूजा'जी.... तुमचे चरणकमल कुठेत? ;) =)) फ्लर्टिन्ग'ची पण हद्द असते यार! ;) ;) ;) असो.. पण कधीतरी असा अनुभव पण मजा देऊन जातो.. फक्त अश्या वेळी खेळवणारे आपण पाहिजे.. आणि आपल्याला पाहिजे तसा खेळणारा 'तो' पाहिजे... आणि हा बसप्रवास किमान ४ तासाचा तरी हवा..... नैतर तितकीशी मजा नाही येत! ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नैनी एकदा असा पूणे मुंबई

जेनी...
गुरुवार, 06/28/2012 - 00:35 नवीन
नैनी एकदा असा पूणे मुंबई प्रवास केला होता " नैन लड जै के " वाला पण बसमधुन उतरल्यावर भारी पडला ... :( त्यापेक्षा अर्धा ते पाऊन तासाची मजा बास होते ;) त्यातच इतके तीर मारायचे की त्याचे निशाण नीदान त्याला आठवडाभर तरी मिटवता येणार नाहित ;) एकदा तरी मित्रांजवळ बोलताना " यार .. क्या लडकी थी ! " असा उल्लेख आलाच पाहिजे ... :P असं नजरेनं घायाळ करुन सोडण आणि त्यावर पून्हा पून्हा आपल्या फीतुर डोळ्यानी जिवघेनं वार करण .. जोडीला खळखळतं हसण ठेवायचं ओठांवर ... बास्स्स की पक्षी जाळ्यात.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मस्तच..

एक
Wed, 06/27/2012 - 23:32 नवीन
राहून राहून वाटतं आहे की तुझा असा कधी विमानात प्रवास झाला आहे का? माझा झाला आहे.. २४ तासाचा प्रवास फारच लवकर संपल्यासारखा वाटला होता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

विमान प्रवास ?? नको आठवण

जेनी...
गुरुवार, 06/28/2012 - 00:38 नवीन
विमान प्रवास ?? :-o नको आठवण करुन देऊस त्या सोनेरी क्षणांची :( ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

हाय रामा : - P काय लिहलय!!!

एमी
Wed, 06/27/2012 - 00:23 नवीन
हाय रामा : - P काय लिहलय!!! जबर्याच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

: - ) वाह! छान

एमी
Tue, 06/26/2012 - 22:30 नवीन
: - ) वाह! छान प्रतिसाद! तुम्ही अगदी सुरुवातीचा प्रतिसाद पण छान दिलेला. हा त्याचाच extension : - )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आता सांगतोच...

एक
Tue, 06/26/2012 - 22:26 नवीन
खरंतर लिस्ट खूप मोठ्ठी आहे पण ही थोडी उदाहरणार्थ.. नजरेला नजर मिळवणारी स्त्री.. खरंतर नजरेतून स्त्री बरच काही बोलू शकते पण ते तेव्हढावेळ वाचत बसायला मुलात गट्स असावे लागतात. "सहज केला" असं दाखवून केलेला स्पर्श. अनुभवावरून असं लक्षात आलं कि हे "सहज" वगैरे काही नसतं . इट्स स्ट्रॅटेजिक. आम्हाला कळतं बट वी प्ले अलाँग. ;) भर पार्टीत कोणाच्याही लक्षात न येता टेबलाखाली सुरू केलेला फूट-प्ले ;) अभिनयाची कसोटी लागते ती इथे. आपण सुंदर दिसत आहोत आणि लोकं वेडी होत आहेत हे माहित असलेली पण ते लपवण्याचा प्रयत्न करणारी. परफ्युम चा वापर कुठे आणि कसा वापरावा हे माहित असलेली. एकाच परफ्यूम चा वास वेगळ्या ठिकाणी वेगळा येतो. त्याचा मादकपणा मनगट, मानेचा कानाजवळचा भाग, इ. इ..... ;) असा वाढत जातो. रोमान्स मधे पुरुषाकडून तिला काय हवय हे स्प्ष्ट सांगू शकणारी (वसूल करून घेणारी असेल तर उत्तमच) .थोडक्यात लीड घेणारी. मेकप करणारी फारच नेमकं म्हणजे लिपस्टिक लावत असतानाची. बादवे, तसा मी थोडा भाग्यवंत. नाटकात कामं करत असताना काही सुंदर सुंदर मुलींनी माझापण मेकप केला आहे. मला लिपस्टिक (स्टेज मेकपला लावावी लागते. शंका नको.) लावताना त्या स्वःता का तोंड ओपन करत होत्या कळालं नाही. पण नजारा अच्छा था! सो नो कम्प्लेंटस! मला स्वःत ला माझ्यापेक्षा उंच असलेल्या मुली सुद्धा आवडतात. त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. सध्या इतकच पुरे.. -एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हाय.....!!

जेनी...
Tue, 06/26/2012 - 22:57 नवीन
आज काय खरं नाय ... कुठे होता रे एवढा वेळ??? कसले भन्नाट भेद खोलताय.... मस्त!! आत्ताशी कुठे हा धागा रंगात आलाय अस मी म्हणेन ;) मुलांचा अजुन एक प्लस पॉइंट ... पूढच्या केसांचे नॅच्युरली पडनारे फ्लिक्स ... बोलता बोलता केसात बोटं फिरवायची स्टाइल ....खालि बघताना अगदी नजरेकडे झुकणारे अलगद रस्ता बदलुन ट्र्न घ्यावा अश्या तोर्‍यात डोळ्यावर येणारे केस ..... खल्लास ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

आता काय सांगायचं...

एक
Tue, 06/26/2012 - 23:28 नवीन
आम्ही जंटलमन ना त्यामुळे 'सगळ्याच' ठिकाणी लेडीज फर्स्ट हे तत्त्व पाळतो. ;) म्हणून इतका वेळ बोलत नव्हतो. तसही हुकुमी पत्त्यांची हळूहळू उतारी करण्यातच मजा आहे की नाही? तो केसांचा विषय मात्र उगाच काढलास. :( आमचे कुरळे केस तू म्हणतेस तसं वागत नाहीत ना. :( बादवे.. माझ्या वरच्या उदा मधे एक राहिलं. : हाय हिल्स घालणार्‍या मुली..चालताना अप्रतीम तर दिसतातच पण खुर्ची वर बसल्यावर , एक पाय दुसर्‍या पायावर टाकून जेव्हा पायाच्या बोटांवर तो सँडल चाळा म्हणून खेळवतात.. तो प्रकार जास्त जिवघेणा असतो. त्यात स्कर्ट आणि स्टॉकिंग्ज असतील तर जीव तिथल्यातिथे गेलाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हेहेहे .... कुरळ्या केसांची

जेनी...
Wed, 06/27/2012 - 00:29 नवीन
हेहेहे .... कुरळ्या केसांची पण रंगाने सावळी त्यात चौकोणी चेहेरा... ओठांच्या जराशी खाली ओठाना लागुनच एखादा जीवघेना तीळ ... नजर करडी ... पण त्यात एक अनोळखी भाव जो फक्त काहि ठिकाणीच स्वताहाच अस्तित्व दाखवतो अशी नजरच इतकी आकर्षक आणि मादक वाट्ते की अजुन काय बोलु यार बास्स्स :) ( फक्त एक शंका वाट्ते की त्या कुरळ्या केसात लाडेलाडे घुसवलेली बोटं सहिसलामत बाहेर येत असतिल काय ?? :-o ) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

बोटं सहिसलामत बाहेर येतात ना पण.

एक
Wed, 06/27/2012 - 00:47 नवीन
बोटं घुसवणार्‍यांना बाहेर काढण्याची घाई नसते. ;) आणि मला तर अजिबातच नाही. "हे शिर दिले तुझ्या हाती..." :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

>>>> " हे शिर दिले तुझ्या

जेनी...
Wed, 06/27/2012 - 04:41 नवीन
>>>> " हे शिर दिले तुझ्या हाती " अगदी पापण्या झुकवुन , लाजुन , ओठावर हलकसं स्मित आनुन मान तिरपी करुन , थोडं पाठमोरं वळून , वितभर अंतरावरुन'च' ऐकु जाईल असं " इश्श्श्य ...!! " :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

>>> अगदी पापण्या झुकवुन , लाजुन , ओठाव

एक
Wed, 06/27/2012 - 23:28 नवीन
आता यावर काही लेखी प्रतिसाद देता येणार नाही. :P शब्दच खुंटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हा हा हा आत्ताशी कुठे

एमी
Wed, 06/27/2012 - 06:08 नवीन
हा हा हा आत्ताशी कुठे हा धागा रंगात आलाय... या वाक्याला +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आधार घेणं...

चैतन्य दीक्षित
Tue, 06/26/2012 - 11:38 नवीन
आधार घेतलेला नसून- स्त्रियांबद्दल काय सेक्सी वाटतं उदा. बांधा, रंग, केस, उन्नत अंगे इ. हेही सांगायचं आहे आणि त्याचं वर्णन करताना वापरलेली भाषाही कशी सेक्सी आहे हे सांगायचं आहे म्हणून काही श्लोक उद्धृत केलेत इतकंच. आणि त्याला बोअर म्हणत असाल तर काय बोलणार आम्ही? कामसूत्र आणि खजुराहो मधे अडकलोय कारण ते आहेच तसं भुरळ घालणारं. निसर्गानं स्त्रियांना याबाबतीत जास्त इंटरेस्ट दिला नसेल तर तो पुरुषांचा दोष कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

Nothing personal : - )माझा

एमी
Tue, 06/26/2012 - 20:27 नवीन
Nothing personal : - ) माझा आणि संस्कृत चा बालपणापासून ३६ चा आकडा आहे म्हणून मला तसं वाटलं असेल... पण खरच दुसर्याच्या बोजड भाषेत लिहण्यापेक्षा स्वतःच्या ओबडधोबड भाषेत लिहलेलं कधीही चांगलं...आणि max मुलं तिच ती सेक्सी अंग सांगतायत...त्यात वेगळं काय...अगदी पूजा ने वर लिहलय तसं एकदम सेक्सी आणि विशेषणं वापरा नाय म्हणत पण जरा समजेल अशा भाषेत आणि वेगळं काही तरी लिहा एवढच सांगतेय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

मेलेल्यांना किती मारणार, पाहुणेतै?

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 10:22 नवीन
>> आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्याच द्रुष्टीने सेक्सी नाहीय हे लक्षात आल्याने शांत बसलेत... दया दया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

२ दिवस विचार करतेय,

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 12:45 नवीन
२ दिवस विचार करतेय, करतेय,.... पण मला न आवडणार्‍या गोष्टीच जास्त आहेत. डोक्यात जाणारी माणसे देखिल खूप आहेत. सेलेब्रिटी म्हणवणार्‍यांमध्ये शून्य इंट्रेस्ट आहे. स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात. चित्रे निर्जीव वाटतात. गाणे ऐकले की मी झोपून जाते. फक्त धो धो पाउस आवडतो. पण तेंव्हा असे सेक्सी वगरे काही वाटत नाही. वास्तविक नक्की काय वाटते ते सांगता येणार नाही. गारगार वाटते फक्त. बाकी काहीच होत नाही. मी आजारी तर नाही ना?
  • Log in or register to post comments

सेवाधर्म: परमगहनो

चैतन्य दीक्षित
Fri, 06/22/2012 - 16:40 नवीन
>स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात. यावरून नीतिशतकातला एक श्लोक आठवला. नोकराच्या बाबतीत- जर तो शांत असेल तर त्याला भित्रा म्हणतात, बोलत असेल तर फार तोंडाळ आहे म्हणतात समोर उभा राहात असेल (मान वर करून) तर 'मॅनरलेस' म्हणतात लांब लांब राहात असेल तर त्याच्यात प्रगल्भता नाही असे म्हणतात.. थोडक्यात- सेवाधर्म (एखाद्याची त्याच्या मनाप्रमाणे चाकरी करणं) हे योग्यालाही कठीण असं काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

चांगला श्लोक

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 19:57 नवीन
पण मी कुणालाच नोकर वगरै समजत नाही. किंवा हीन पण समजत नाही. फक्त लांब ठेवते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

नोकरांना दूर लोटू नका.

प्रभाकर पेठकर
Fri, 06/22/2012 - 20:11 नवीन
मी तर काही जणांना, ह्याही पुढे जाऊन, मोलकरणीला 'जवळ' करताना पाहिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

काका मल वाचवा

jaypal
Fri, 06/22/2012 - 20:54 नवीन
पुष्पक सिनेमातील मोलकरीण आठवली हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आणि..

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 21:07 नवीन
सिंहासन सिनेमातली देखील. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

हा हा..

दादा कोंडके
Fri, 06/22/2012 - 22:11 नवीन
ह पण! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

क्या बात है|

प्रभाकर पेठकर
Sat, 06/23/2012 - 02:33 नवीन
एक से काम चलता है, पर दो की जरूरत है. हे म्हणजे जरा 'भारी'च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म...

दादा कोंडके
Sun, 06/24/2012 - 00:19 नवीन
भावना पोहोचल्या एव्हडच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अगं सोपं आहे...

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 21:04 नवीन
तुला बोके सेक्सी वाटत असणार ना ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माऊ =)) =))

शुचि
Fri, 06/22/2012 - 21:25 नवीन
माऊ =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हो तु आजारी आहेस माऊ

जेनी...
Fri, 06/22/2012 - 22:38 नवीन
हो तु आजारी आहेस माऊ :( स्मार्ट डॉक्टर ला दाखव बै , मंद डॉक्टराकडे अजीबात जाऊ नको :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खोटं कशाला बोला? मला तर साडी

गणपा
Fri, 06/22/2012 - 12:53 नवीन
खोटं कशाला बोला? मला तर साडी नेसलेली बायको खुप सेक्सी वाटते बॉ. :)
  • Log in or register to post comments

कुणाची रे मेल्या?

नाना चेंगट
Fri, 06/22/2012 - 13:26 नवीन
कुणाची रे मेल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ज्याची त्याची जाण......

गणपा
Fri, 06/22/2012 - 13:32 नवीन
ज्याची त्याची जाण...... वैग्रे वैग्रे .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

अच्छा ! ज्याची त्याची बायको

नाना चेंगट
Fri, 06/22/2012 - 13:34 नवीन
अच्छा ! ज्याची त्याची बायको जाणू असे म्हणतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आधी स्वतःची तर जाणुन घे.

गणपा
Fri, 06/22/2012 - 13:43 नवीन
आधी स्वतःची तर जाणुन घे. (त्यासाठी आधी लग्न कर मेल्या.. चालला गगेच दुसर्‍यांच्या ताटात डोकावायला.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

खिक ! तसेही जाणून घेता येत

नाना चेंगट
Fri, 06/22/2012 - 13:46 नवीन
खिक ! तसेही जाणून घेता येत असतांना केवळ त्यासाठी बायको करायची गरज काय? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/22/2012 - 15:11 नवीन
लोकाच्या पुस्तकाने आणि नोटसने अभ्यास उलट अधिक चांगला होतो हा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

ह्हो...

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 21:06 नवीन
ते "मंदाकिनी" वरुन कळलच होतं... बाय द वे, मंदाकिनीचं पुढे काय झालं ? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बाकी या निमित्ताने

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 19:48 नवीन
बाकी या निमित्ताने "कर्मसूत्रां" चे विवेचन कसे काय बाहेर नै आले काय माहिती ;) (बुचकळ्यात पडलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

कामसूत्र म्हणायचय का?

कवितानागेश
Fri, 06/22/2012 - 20:01 नवीन
:) भ्यास वाढवला नाही इथे कुणी. दुसरं काय? कुणाला काही माहित नाही हो कामसुत्रांबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असेच म्हणतो. नपेक्षा

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 20:19 नवीन
असेच म्हणतो. नपेक्षा गेलाबाजार सचित्र नाही पण चित्रविचित्र वर्णने वाचायला तरी मिळाली असती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हम्म.....

पैसा
Fri, 06/22/2012 - 20:24 नवीन
निख्या, माझं लक्ष आहे बरं का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हॅहॅहॅहॅ कस्चं कस्चं

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 20:31 नवीन
हॅहॅहॅहॅ कस्चं कस्चं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चित्रे... वर्णन.. व्यनीत मिळाले का रे? ;-)

मोदक
गुरुवार, 06/28/2012 - 23:47 नवीन
चित्रे... वर्णन.. व्यनीत मिळाले का रे? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खजुराहो

चैतन्य दीक्षित
Mon, 06/25/2012 - 09:59 नवीन
एकदा खजुराहोला भेट दिली की सगळं काही कळेल ;) इतकी प्रमाणबद्ध शिल्पं कोरणार्‍या कारागिरांचा शरीरशास्त्राचा आणि कामशास्त्राचाही गाढा अभ्यास असणार हे पटतेच ती शिल्पे पाहिल्यावर. तिथे एक शिल्प आहे, स्त्री स्वतःची वस्त्रं उतरवीत आहे आणि तिच्या मांडीवर एक विंचू आहे (विंचू म्हणे तिच्या 'कामोत्तेजनेचं प्रतीक' आहे). ते शिल्प आणि इतरही अनेक (इथे अवर्णनीय) अशी शिल्पे जाम सेक्सी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

वृष्चिक राशीचा काही प्रभाव ??

वपाडाव
Tue, 06/26/2012 - 13:01 नवीन
दिक्षित साहेब, माझी रास वृष्चिक आहे. तिचा काही असर होतो का यावर... काही माहिती असल्यास जरूर कळवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

भयंकर...

प्रभाकर पेठकर
Tue, 06/26/2012 - 14:25 नवीन
त्यांचा 'वृश्चिक दंश' जहरी असावा. जो 'इश्काची इंगळी डसली ग बाई मला....' असे बोंबलायला स्त्री जातीला भाग पाडत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

इतक्या दिवसांतून इथं आलो

अन्नू
Fri, 06/22/2012 - 23:04 नवीन
इतक्या दिवसांतून इथं आलो आणि.... काय विषय! सेक्... श्या... आण्णा महाराज!!!! ;)
  • Log in or register to post comments

त्या वयोवृद्ध ह.भ.प. महर्षींच्या...

चित्रगुप्त
Sat, 06/23/2012 - 11:41 नवीन
एवढ्या दीडशेच्या वर प्रतिसादात आपला साधा उल्लेखही नाही, हे बघून त्या वयोवृद्ध, ह.भ.प. महर्षींच्या आणि त्यांच्या आश्रमातील त्या आश्रम-हरिणींच्या मनाला किती वेदना होतील, या विचाराने आमचे डोळे पाणावले आहेत.
  • Log in or register to post comments

भाव उतरलाय

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 12:01 नवीन
गेल्या वर्षी त्यांची वाद्गत्त वधू पळून गेल्यामुळे त्यांचा भाव एकदम उतरलाय बहुधा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अरे हो की!!!! आमचेपण

बॅटमॅन
Sat, 06/23/2012 - 15:09 नवीन
अरे हो की!!!! आमचेपण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा