एक खळाळती नदी
तिचे रम्य दोन्ही काठ,
दोन तिरी दोन मन
माना दोघांच्याही ताठ!
ऐलतिरी पैलतिरी
दोन्ही बाजू दोन मन,
एक होकार भरितो
दुजा नकार घोकून...
वाटे निर्मळ वहावे
अडता, मना पुसावे,
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!
प्रत्यक्षात असे नाही
मने धरी भिन्न तान
एक मी, मी, मी म्हणे
दुजा म्हणे मी महान..!
संभ्रमाने गोंधळावे
असा अजब प्रकार,
इथे मत एक नाही
म्हणे जगा निर्विकार!!
मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!!
इथे प्रश्न इवलाले
करी आपणा अर्जुन,
संभ्रमात जग म्हणे-
नाही सुटका ह्यातून!
त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!
मग आपलीच तीरं
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!
-वेणू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2674
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम.
सुरेख!
सुंदर
मग सहजच वाटे..
खरे आहे
कवितेमागची प्रेरणा याच
हो तेच ते. पण पुस्तक लैच
In reply to कवितेमागची प्रेरणा याच by ५० फक्त
आवडली कविता
सगळ्यांची खूप आभारी आहे. ५०
छानच