एक खळाळती नदी
तिचे रम्य दोन्ही काठ,
दोन तिरी दोन मन
माना दोघांच्याही ताठ!
ऐलतिरी पैलतिरी
दोन्ही बाजू दोन मन,
एक होकार भरितो
दुजा नकार घोकून...
वाटे निर्मळ वहावे
अडता, मना पुसावे,
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!
प्रत्यक्षात असे नाही
मने धरी भिन्न तान
एक मी, मी, मी म्हणे
दुजा म्हणे मी महान..!
संभ्रमाने गोंधळावे
असा अजब प्रकार,
इथे मत एक नाही
म्हणे जगा निर्विकार!!
मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!!
इथे प्रश्न इवलाले
करी आपणा अर्जुन,
संभ्रमात जग म्हणे-
नाही सुटका ह्यातून!
त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!
मग आपलीच तीरं
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!
-वेणू
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2710
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम.
अप्रतिम.
सुरेख!
आवडली.
सुंदर
सुंदर!!
मग सहजच वाटे..
मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!! >>
मस्तच !
खरे आहे
खरे आहे.
कवितेमागची प्रेरणा याच
कवितेमागची प्रेरणा याच नावाचं अन याच अंगानं जाणरं वपुंच पुस्तक आहे का ? ते पुस्तक वाचल्यावर माझ्या वागण्या बोलण्यात खुप फरक झाला आहे.
कधी कधी पांडवांपेक्षा दुर्योधन बरा असं वाटतं, कधी ही कसला ही द्विधा विचार आणि स्थिती नाही, एक ध्येय आणि एक वाटचाल.
कविता छान झाली आहे. धन्यवाद.
हो तेच ते. पण पुस्तक लैच
In reply to कवितेमागची प्रेरणा याच by ५० फक्त
हो तेच ते.
पण पुस्तक लैच रटाळ आहे.
आवडली कविता
कविता छान लिहिली आहे.
सगळ्यांची खूप आभारी आहे. ५०
सगळ्यांची खूप आभारी आहे.
५० फक्त, अगदीच बरोबर ओळखले तुम्ही, मनाचे फार जास्त कंडिशनिंग करण्याची ताकद आहे ह्या पुस्तकात, अगदी संग्रही ठेवावं असं वाटलं मला हे व.पुंच पुस्तक :)
छानच
नेहेमीप्रमाणे आवडली.
अमृत