✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा?>

प
पिवळा डांबिस यांनी
गुरुवार, 06/07/2012 - 23:43  ·  लेख
लेख
यावेळेस दोन दोन कच्चे माल आहेत!!! क्या बात है!! सर्व संबंधितांना ह. घ्या ही विनंती... :) तर, 'पोचलेला' गुरू कोणता घ्यावा? कुंडालिनीची वळवळ आणि उर्ध्वरेतन ही फंक्शन नीट चालावीत. बाकी योगासने-नौलीचा फारसा वापर होणार नाही. (आमचं वय लक्षात घेता) गांजाची धुनी मात्र धुमसती हवी.. मराठी संस्थळांवर बरेच रिव्हू वाचले, श्रामो-बिकांना विचारले.... त्यानी सांगितले, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ! (आता हे आपल्याला कुठले मिळायला? ) मिपाबझारमध्ये फक्त घासूगुर्जी, जालिंदरबाबा आणि प्रभूगुर्जीचे एक एक मॉडेल आहे... त्यापैकी घासू आणि प्रभूगुर्जींचा रिव्ह्यू चांगला नाही म्हणतात!! यकु१००१ कसा आहे? जार तडकलेला दिसतो आहे पण मला फक्त कुंडलिनी-वळवळ आणि उर्ध्वरेतनच शिकायचंय!!! मिपाकर मदत करू शकतील का? :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16371 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

___/\___ स्वगतः प्यारे, तुझा

प्यारे१
Mon, 06/11/2012 - 10:14 नवीन
___/\___ स्वगतः प्यारे, तुझा पण यकुच झालाय की लेका! लोकं हसायलेत बे तुला. चला मिपासंन्यासाची वेळ आली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गुरू पोचले.. धाग्याचं उत्तर

बाळ सप्रे
Fri, 06/08/2012 - 17:13 नवीन
गुरू पोचले.. धाग्याचं उत्तर मिळाल की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अरे अरे मी पुन्हा एकदा आयडि

५० फक्त
Fri, 06/08/2012 - 17:22 नवीन
अरे अरे मी पुन्हा एकदा आयडि किलर होतोय की काय असं वाटायला लागलंय. मा.दिसं. यकुजी, असे एका प्रतिसादात काय सांगताय संन्यास घेताय ते, किमान एखादा लेख तरी हवा, मग त्यावर जाउ नका जाउ नका असे ५-१० प्रतिसाद येतील, मग जा जा असे ५- १० येतील, एक दोन शाल जोडी, एखादा नारळ, एखादी कोल्हापुरी असं काहीतरी येईलच. बाकी हल्ली तुमचं लिखाण असं झालंय की डुआयडीनं आलात तरी लगेच ओळखु याल, असो. आमच्या कंटाळ्यामुळं म्हणा किंवा मागं असलेल्या नोक-या, संसार अशा मुळे इंदोर कट्टा मात्र राहुन गेला. एखादी लिस्ट देउन गेला तर जेंव्हा जमेल तेंव्हा जाउन येउ, आणि एखादी पुरी, थोडेसे पोहे सांडुन येउ म्हणतो.
  • Log in or register to post comments

आमचा रिव्ह्यू वाईटच असणार.

राजेश घासकडवी
Fri, 06/08/2012 - 17:37 नवीन
आमचा रिव्ह्यू वाईटच असणार. विशेषतः तुम्हाला ऊर्ध्वरेतनाची फीचर हवी असेल तर. आम्ही बुवा साध्यासुध्या अधोरेतनात स्पेशलाइझ करतो.
  • Log in or register to post comments

बोंबला...

मन१
Fri, 06/08/2012 - 17:43 नवीन
धागा एक भारी आणि आणि प्रतिसादातल्या हाणामार्‍या सात भारी. यकु, तुझे काही लेख आवडले. युजिनी नावाचं पात्र तर विशेष. काळजी घे. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

यकु'जी... तुमची स्वाक्षरी

मृगनयनी
Sat, 06/09/2012 - 18:28 नवीन
यकु'जी... तुमची स्वाक्षरी खूप सुन्दर आहे!... करी स्वजन उपाधि भस्मलेप अंगा झोळीत भरीत तज्जन्ममरण पिंगा.... नारायण हृदयी रन्ग भरुनि गेला.... गुरुदत्तराज हा ऋषीकुळात अवतरला ||४|| हा परमसनातन विश्व भरुनि उरला... गुरुदत्तराज हा ऋषीकुळात अवतरला ||धृ.||
  • Log in or register to post comments

यकु साहेब, अहो तुम्ही खरच लिहित रहा.

निश
Mon, 06/11/2012 - 13:30 नवीन
यकु साहेब, अहो तुम्ही खरच लिहित रहा. तुम्हाला तुमच मत लिहिताना ते बरोबरच असणार कारण तो तुमचा अनुभव असणार आहे. त्या मुळे चांगले किंवा वाईट प्रतिसादांची तमा न बाळगता तुम्ही लिहित रहा. शेवटी तुम्हाला येणारा अनुभव महत्वाचा इतराना जर ते बरोबर व खरे वाटले तर ते तुमच्याशी सहमत होतील व जर ते त्याना बरोबर नाही वाटले तर ते नाही सहमत होणार पण म्हणुन तुम्ही तुम्हाला आलेले अनुभव लिहीत रहाच. तुम्ही अध्यात्माच्या वाटेवर जाताय चांगलच आहे पण तुमच्या मनातल्या चांगल्या यकुसाहेबाना जिवंतच ठेवा अजुन त्याच संगोपन करा मग बघा शरीराने संन्यास नाही घेतला तरी तुमच मन संन्यासी होईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद निश साहेब!

यकु
Mon, 06/11/2012 - 13:42 नवीन
धन्यवाद निश साहेब! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा