✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुणेरी दुकानदारीचा एक नमुना

ब
बाळ सप्रे यांनी
Tue, 05/29/2012 - 14:36  ·  लेख
लेख
पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा. माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता. एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्‍हाईक आलं पॅटीस घ्यायला. "पॅटीस आहेत का?" - गिर्‍हाईक "संपले" - काउंटरवरील इसम गिर्‍हाईक निघून गेलं. "आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र "छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम "मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र "अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24719 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

माहित नाही? नक्की पुणेकरच न?

किचेन
Wed, 05/30/2012 - 17:01 नवीन
माहित नाही? नक्की पुणेकरच न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/30/2012 - 18:21 नवीन
ह्यापुढे :- < उपरोध > प्रतिसाद < / उपरोध > असे धोरण स्विकारावे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पर्‍या, लेका...

वपाडाव
Wed, 05/30/2012 - 17:20 नवीन
संभाजी बागेतुन फिरता फिरता कधी-मधी आपटे रस्त्यावरही चक्कर मारत जा... चक्कर मारलीच तर आजुबाजुला पाहत देखील जा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आणि चक्कर मारता मारता पर्‍या

जेनी...
Wed, 05/30/2012 - 23:24 नवीन
आणि चक्कर मारता मारता पर्‍या आपटे रस्त्यावर kuTHe पडला तर ?? त्याला घरी आणूण सोडायची जवाबदारि कोण घेनार आहात का?? एकतर पून्याचे लोक पत्ता सुद्धा नीट सांगत नाहित, :( त्याला भलत्याच घरी नेऊन सोडतील :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

पुण्यात अशा नावाची बेकरी आहे

सुहास..
गुरुवार, 05/31/2012 - 00:01 नवीन
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे ? आणि ती पॅटिससाठी प्रसिद्ध आहे ? ऐकावे ते नवलच. >>> ह्यात काय नवल ? काल परवा मी संदीप नावाची तम्बाखुची पुडी पाहिली, विठोबा नावाच्या टुथपेस्ट ची ( दंतमंजनची नव्हे !! ) जाहीरात रेडिओ वर एकतो आहे ...उद्या सदाशिवात एखाद्या घरासमोर " अब्दुल नारायण डिसूझा " आणि " घर के सामने वाहने लगाना ईज नॉट अलाव्ड " अशी पाटी दिसेल. परवा " सुप्रसिध्द श्री परा. यांचे पनीर व झणझणीत सुके मटन याचे दुकान "व " प्रत्येक खरेदी सोबत एक आकर्षक खोड रबर फ्री " त्या खाली " आमची घंटा कुठे ही शाखा नाही " अशी पाटी दिसेल , तेरवा ईतिहास कार श्री वाशोजी पंत लोहगाव वाले यांचे " शातंतामय जीवन कसे जगावे ? " असा ३०७४८ पानी ग्रंथ छापुन येईल, आणि त्या वर श्री रमतारम यांची " शांत शांत शांत " अशी कविता " ऐंशी अक्षरे भैस बराबर " या वृत्तपत्रात छापुन येईल, त्यावर श्री चेंगुबा नानुस " वात वात वात " असे विडंबन लिहीतील, आणि मग ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हल्कत

रमताराम
Sat, 06/02/2012 - 16:01 नवीन
हे हलकट नेहमी माझ्या नावातला 'राम' काढून 'रम' टाकत असतं.... सवय दुसरं काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लोककथा... ऐकीव पण

एम.जी.
Wed, 05/30/2012 - 15:13 नवीन
लोककथा... ऐकीव पण इन्टरेस्टिंग... चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची. मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत.. त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्‍या शटरच्या खालून जवळपास लोळण घेत आत घुसला... चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूस शेवटी घुसलाच. चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं... " बाकरवडी.." अपेक्षित उत्तर आले. "किती वाजले घड्याळात...? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय.. तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या... " चितळे त्याच्यावर वतागले. " मला बाकरवडी हवीय.." " मिळणार नाही.. दुकान बंद झालेय... उद्या या.." " बाकरवडी.." "शक्य नाही... आता बाहेर पडा आधी..." चितळ्यांचा संताप अनावर झाला. तो माणूस बाहेर पडत नाही हे बघून चितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले.. दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली. गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे, आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाज आणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज... गर्दी अवाक होऊन बघत होती. इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांताने बाहेर पडला आणि पळायला लागला... मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्‍यावर एक समाधान घेऊन... " काय झालं हो...?" गर्दीतून कुणीतरी विचारले. " बाकरवडी पाहिजे होती... आठ वाजल्यानंतर याला.. आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला... मग दाखवले चौदावे रत्न... आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय... वेळेचे भान आहे की नाही.." " कोण होता हो...?" गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले... " होता कुणीतरी मद्रासचा... शिवाजी गायकवाड म्हणून... " चितळ्यांनी शटर ओढून कुलूप लावले आणि ते घराकडे निघाले... [ ऐकीव किस्सा आहे.. पात्रे काल्पनिक आहेत... साधर्म्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा... खुलास करण्याचं कारण चितळ्यांनी बाकरवडी दिली नाही तर पुण्यात रहायच्या फायद्यांपैकी एक संपला असे होईल..]
  • Log in or register to post comments

चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून

किचेन
Wed, 05/30/2012 - 17:00 नवीन
चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून चिडण केवळ अशक्य.त्यांनी चेहऱ्यावर एक मिश्कील हसू ठेवत त्याला बाहेर काढाल असत.नाहीतर १० -१५ मिनिट गप्पा मारल्या असत्या.पण भांडण शक्यच नाही.आणि चितळ्यांकडे काय सुरक्षा रक्षक कमी आहेत, कि चितळे स्वत: झटापट करतायत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

जपा. निरागसता जपा.

प्यारे१
Wed, 05/30/2012 - 17:09 नवीन
जपा. निरागसता जपा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

हाहाहाहाहा! एक नंबर

श्रीरंग
Wed, 05/30/2012 - 17:40 नवीन
हाहाहाहाहा! एक नंबर प्रतिसाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अहो, विनोदी किस्सा आहे

एम.जी.
Wed, 05/30/2012 - 17:07 नवीन
अहो, विनोदी किस्सा आहे हा... आणि तसंच म्हटलं तर शिवाजी गायकवाड स्वतः कशाला येइल.. ड्रायव्हरला पाठवेल.. आणि ड्रायव्हर तरी त्या कुमठेकर रस्त्याच्या गर्दीत कशाला गाडी घुसवेल..? डेक्कन, पौड रोड.. किती ठिकाणी चितळ्यांची दुकाने आहेत... पुढच्यावेळेस असे किस्से टाकताना " विनोदी" अशी क्याटेगरी नमूद करायची खबरदारी घ्यायला हवी..
  • Log in or register to post comments

माफी असावी .शिवाजी गायकवाड

किचेन
Wed, 05/30/2012 - 17:10 नवीन
माफी असावी .शिवाजी गायकवाड नाव झेपल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

असुद्या..सगळ्यांना झेपण्या

गणामास्तर
Wed, 05/30/2012 - 17:19 नवीन
असुद्या..सगळ्यांना झेपण्या सारखं नाहीचयं ते प्रकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मास्तर

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 17:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

गुगल करा की !!! एका झटक्यात

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/30/2012 - 17:25 नवीन
गुगल करा की !!! एका झटक्यात कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

राहुदे रे कशाला उगाच

जेनी...
Wed, 05/30/2012 - 23:31 नवीन
राहुदे रे कशाला उगाच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि

गवि
Wed, 05/30/2012 - 17:41 नवीन
मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि "चितळे बंधू" अशा दोन वेगवेगळ्या नावांनी बाकरवडी मिळते. "चितळे" बाकरवडी सर्वत्र मिळत नाही (मात्र एकदा मुं.पु. एक्सप्रेसवेच्या फूडमॉलमधे पाहिली होती). ही गोल आकाराची आणि लहान असते. "चितळे बंधू" बाकरवडी सर्वत्र (मुंबईतही सर्वत्र) मिळते आणि ती लांबट मोठी असते. हे दोन वेगवेगळे ब्रँड आहेत अशी माझी खात्रीशीर माहिती आहे. पैकी "चितळे बंधू" हा नंतर बाहेर पडून काढलेला ब्रँड आहे असं ऐकलं. दोन्ही ब्रँड चाखून पाहता "बंधूं"चीच बाकरवडी उत्तम निघाली. नुसती "चितळे" बाकरवडी ही पोळीचा रोल मसाला भरुन उन्हात वाळवावा तशी बेचव लागत होती. अधिक अनुभव आणि माहिती असल्यास या मतावर शिक्कामोर्तब किंवा खोडरबर चालवावे.
  • Log in or register to post comments

"चितळे बंधू"

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 18:03 नवीन
ह्यांच्याच बाकरवडी आणि दूकान बंद करण्याविषयी चर्चा चालू आहे. पुणे आणि पुणेकरांवर खार खाणारे जेंव्हा चितळे असा उल्लेख करतात तो "चितळे बंधू" ओरीजनल (म्हणजे कृतीने) यांच्यासाठीच असतो. थोडा अभ्यास कमी पडला तुमचा या विषयात. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आँ.. ? मग ती चितळे बंधू

गवि
Wed, 05/30/2012 - 18:08 नवीन
आँ.. ? मग ती चितळे बंधू बाकरवडी मस्तपैकी आधुनिक हवाबंद प्याकिंगमधे मिळते की मुंबईत बर्‍याच किराणा दुकानांमधे. त्यासाठी का इतकी मारामारी? कदाचित मूळ दुकानात ताजी अतएव खुसखुशीत मिळत असेल म्हणून तिथे जाऊन घेण्याचं जास्त महत्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

बरोबर.

चिंतामणी
Wed, 05/30/2012 - 18:15 नवीन
ताजी अतएव खुसखुशीत मिळते. म्हणूनच आटापीटा करतात. पुण्यात आला की संपर्क साध. आपण जाउ दुकानात आणि मग तु स्वतः अनुभव घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चिंतुकाका तुमच्या या 'अतएव'

सूड
Wed, 05/30/2012 - 18:21 नवीन
चिंतुकाका तुमच्या या 'अतएव' साठी टाळ्या घ्याच !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

प्रतिक्रियेला

सुहास..
गुरुवार, 05/31/2012 - 00:14 नवीन
प्रतिक्रियेला प्रतिउत्तर मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि प्रेषक गवि Wed, 30/05/2012 - 17:41. मूलभूत प्रश्न >>>> अस्सल मुंबईकराकडुन अस्सल विचारवंत प्रश्न आल्याने धाग्याने वेगळे वळण घेतले आहे याचा ' कोलकात नाईट - रायडर्स ' ने विचार करावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सत्य घटना

तिमा
Wed, 05/30/2012 - 19:12 नवीन
बर्‍याच वर्षांपूर्वी मी जिमखान्यावरच्या चितळ्यांच्या दुकानात गेलो होतो. पायर्‍या चढता चढताच मला एका बाजूला लागलेली भली मोठ्ठी रांग दिसली. त्याकडे दुर्लक्ष करुन मी दुकानात जायला लागलो. एका कर्मचार्‍याने मला हटकले, 'अहो, रांगेतून या.' मला बाकरवडी घ्यायचीच नव्हती, हे मी त्याला सांगितल्यावर त्याचा भूत बघावे असा चेहेरा झाला.
  • Log in or register to post comments

खिक्क्!

जव्हेरगंज
Fri, 02/05/2016 - 22:11 नवीन
खिक्क्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

येन केन प्रसिद्धी......

नाखु
गुरुवार, 05/31/2012 - 14:01 नवीन
जात-पुणे-धर्म....... शंभरी निश्चीत......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा