पुणेरी दुकानदारीचा एक नमुना
पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा.
माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता.
एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्हाईक आलं पॅटीस घ्यायला.
"पॅटीस आहेत का?" - गिर्हाईक
"संपले" - काउंटरवरील इसम
गिर्हाईक निघून गेलं.
"आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र
"छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम
"मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र
"अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम
:-)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माहित नाही? नक्की पुणेकरच न?
च्यायला !
पर्या, लेका...
आणि चक्कर मारता मारता पर्या
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे
हल्कत
लोककथा... ऐकीव पण
चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून
जपा. निरागसता जपा.
हाहाहाहाहा! एक नंबर
अहो, विनोदी किस्सा आहे
माफी असावी .शिवाजी गायकवाड
असुद्या..सगळ्यांना झेपण्या
मास्तर
गुगल करा की !!! एका झटक्यात
राहुदे रे कशाला उगाच
मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि
"चितळे बंधू"
आँ.. ? मग ती चितळे बंधू
बरोबर.
चिंतुकाका तुमच्या या 'अतएव'
प्रतिक्रियेला
सत्य घटना
खिक्क्!
येन केन प्रसिद्धी......