✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे धदंड तत्तड...पेट्रोल अजून महाग झाले

न
नाना चेंगट यांनी
Wed, 05/23/2012 - 19:27  ·  लेख
लेख
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग झाले धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13411047.cms सरकारला शिव्या घालून, संताप करुन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! नाचा रे नाचा !!! आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22649 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

people get what they

प्रीत-मोहर
गुरुवार, 05/24/2012 - 07:50 नवीन
people get what they deserve! अामचे भाई पेट्रोल ची किंमत कमी व्हावी म्ह णून येवढे त्रास घेतहेत आणि इथे हे त्यावर पाण ओतायला एका पयावर!!! we r proud of you manohar bhai
  • Log in or register to post comments

पक्ष

क्लिंटन
गुरुवार, 05/24/2012 - 07:59 नवीन
पेट्रोलमध्ये झालेल्या दरवाढीबद्दल कोणाही पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही कारण कोणतेही सरकार असते तरी हाच निर्णय घ्यावा लागला असता.महागाई वाढण्यासाठी जागतिक कारणांबरोबरच सरकार राबवत असलेल्या पॉप्युलीस्ट धोरणांचाही (नरेगा,सबसिड्या इत्यादी) भाग आहे.यामुळे सरकारचा फिस्कल डेफिसिट वाढला आहे. २०११-१२ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ५.९% होता. २००७ मध्ये हाच आकडा ३.५% च्या आसपास होता.यात राज्यांचा डेफिसिट पण add केला तर हा आकडा खूप मोठा होईल. डेफिसिट वाढला की सरकारला एक तर बाजारातून पैसे कर्जाऊ घावे लागतात किंवा नोटा छापून डेफिसिट भरून काढावा लागतो. सरकारने प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले तर व्याजाचे दर वाढतात आणि त्याचा महागाईवर परिणाम होतो तर नोटा छापल्या तर डायरेक्ट महागाई वाढेल. काही झाले तरी वाढणाऱ्या डेफिसिटमुळे महागाई वाढणार. महागाई आणि व्याजदर वाढले की रूपया घसरणार.रूपया घसरला की आयात केलेले तेल अजून महाग पडणार. तेव्हा तेलाचे दर वाढवले नाही (म्हणजेच सरकारने सबसिडी दिली) तर डेफिसिट आणखी वाढणार म्हणजे आणखी महागाई वाढणार. हे दुष्टचक्र चालूच राहिल. यात आणखी गुंतागुंत वाढवणारा मुद्दा म्हणजे युरोपातील संकट. यामुळे परदेशी गुंतवणुकदारांनी भारतातून पैसे काढून डॉलर या "सेफ करन्सी" मध्ये नेले आहेत/ अजूनही नेले जात आहेत. तेव्हा यातूनच डॉलरची मागणी वाढून डॉलर अजून जास्त महाग होत आहे. भारतातल्या कोणत्या पक्षाच्या सरकारने या पॉप्युलीस्ट धोरणांना तिलांजली द्यायचे धैर्य दाखविले असते? तेव्हा विरोधी पक्षांनी बाहेर राहून मजा बघावी आणि सत्ताधारी पक्षाने चटके भोगावेत हेच दृष्य इतर कोणताही पक्ष सत्तेत असता तरी बघायला मिळाले असते. याविषयी हा लेख वेळ मिळाल्यास वाचावा ही विनंती. माझ्यातला अर्थशास्त्राचा विद्यार्थी हेच म्हणत आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

क्लिंटनराव मला तुम्हासनी एक

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 08:45 नवीन
क्लिंटनराव मला तुम्हासनी एक प्रश्न इचारायचा आहे, तो म्हणजे वर्षानु वर्ष या तेल कंपन्या ओरडत आहेत की त्यांना करोडोंचा तोटा होत आहे, तरी या कंपन्या अजुन चालतात कश्या ? प्रचंड तोटा सहन करत असुन सुद्धा त्यांच्या कर्मचार्‍यांना पगार,बोनस कसा काय देता येउ शकतो ? जाता जाता :--- इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्रीस का येत नसावे बरं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

सरकार

क्लिंटन
गुरुवार, 05/24/2012 - 09:00 नवीन
या कंपन्यांमध्ये अजूनही बहुसंख्य शेअर सरकारकडेच आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांना झालेला तोटा भरून काढायला सरकारवर अवलंबून राहावे लागते.म्हणजे सरकारचा पैसा (सरकारचा कसला आपलाच करदात्यांचा पैसा) या कंपन्यांचा तोटा भरून काढायला जातो. आणि तो कोणावर खर्च होतो? ते सगळेच "जेन्युईन गरज असलेले" थोडीच असतात?आज गरज म्हणून दुचाकी वापरणारे आणि इमेज म्हणून दुचाकी उडविणारे असे दोन्ही त्यात येतात. किंवा हाताशी दुचाकी आहे म्हणून अगदी ५ मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही दुचाकीवरून जाणारे लोक कमी का असतात?लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. दुसरे म्हणजे पेट्रोलच्या झालेल्या प्रत्येक दरवाढीनंतर डिझेलच्या गाड्या घ्यायचे प्रमाण वाढते. कारण डिझेलच्या किंमती अजूनही नियंत्रणातच आहेत आणि डिझेलवर सबसिडी जास्त आहे. तेव्हा पेट्रोल महाग झाले म्हणून लोक डिझेलच्या गाड्यांकडे वळतात आणि जास्त सबसिडी असलेले इंधन वापरतात. तेव्हा पेट्रोलचे दर वाढवून कमी झालेली सबसिडी अशा पध्दतीने परत वाढते!! खाजगी वाहतुकीसाठी असलेल्या डिझेलवर असलेली सबसिडी चालू आहे तोपर्यंत हा perverse incentive चालूच राहिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

लोकांनीच अशा व्यर्थ

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 09:11 नवीन
लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. ह्म्म्म... तसेच सरकारने चांगले रस्ते बांधले तर, ट्रॅफिक जाम होउन जे लाखोंचे/ करोडोंचे इंधन वाया जाते त्यालाही आळा बसेल नाही ? ;) (भिकार रस्त्यांच्या ठाण्यात राहणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

खरे आहे

हुप्प्या
गुरुवार, 05/24/2012 - 10:16 नवीन
>> किंवा हाताशी दुचाकी आहे म्हणून अगदी ५ मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही दुचाकीवरून जाणारे लोक कमी का असतात?लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. << ह्यावर काही विदा आहे का? खर्च होणार्‍या पेट्रोलमधील किती टक्के अशा (तुमच्या मते)व्यर्थ प्रवासात खर्च होतात? समजा ०.००१ टक्का असेल तर हा कमी केल्याने पेट्रोलचे भाव कमी होतील का? अब्जावधी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, असल्याच अगडबंब आकड्याचा काळा पैसा हे सगळेही कसे कुणीही सत्तेवर असले तरी चालूच राहिल, आघाडीचा काहीच दोष कसा नाही आणि त्याला सामान्य माणसाची सिनेमे बघण्याची, भेळ खाण्याची, सुट्टीत गावी जायची हौसच कशी कारणीभूत आहे ह्याविषयी जडजंबाल अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

चिडचिड

आनंदी गोपाळ
गुरुवार, 05/24/2012 - 12:26 नवीन
ही हौस पुरी करायला जास्त पैसे लागतील म्हणून होते आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

तोटा? तोटा??????? ऑइल

मृत्युन्जय
Sat, 05/26/2012 - 11:23 नवीन
तोटा? तोटा??????? ऑइल कंपन्यांना तोटा होतो आहे? नविनच काहितरी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

नक्की?

श्रावण मोडक
गुरुवार, 05/24/2012 - 16:30 नवीन
महागाई वाढण्यासाठी जागतिक कारणांबरोबरच सरकार राबवत असलेल्या पॉप्युलीस्ट धोरणांचाही (नरेगा,सबसिड्या इत्यादी) भाग आहे.
नक्की? नरेगा आणि सबसिड्या व तत्सम योजना यांचा परिणाम कसा ते लिही ही विनंती. आणि त्याच जोडीने अशा योजनांच्या स्वरूपात न येणाऱ्या निर्णयांचा (दर अर्थसंकल्पात उद्योगांची किती कर्जे माफ केली वगैरे आकडे असतात ते) यासंदर्भात विचार कसा करायचा हेही लिही. वाचायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पूर्वीच्या चर्चेतील दुवे

क्लिंटन
गुरुवार, 05/24/2012 - 16:42 नवीन
यापूर्वी डिसेंबर महिन्यात प्रदीप यांच्या भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे का? या चर्चेत काही प्रतिसाद लिहिले होते त्यात या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्या प्रतिसादांचे दुवे देतो: महागाई नरेगा क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वाचले

श्रावण मोडक
Sat, 05/26/2012 - 12:00 नवीन
वाचले. असहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अर्थ आहे कारण... :-) + अजून

विकास
Fri, 05/25/2012 - 00:03 नवीन
पेट्रोलमध्ये झालेल्या दरवाढीबद्दल कोणाही पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही कारण कोणतेही सरकार असते तरी हाच निर्णय घ्यावा लागला असता. अर्थ आहे कारण, तुमच्याच पुढील वाक्यांमध्ये आहे:
२०११-१२ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ५.९% होता. २००७ मध्ये हाच आकडा ३.५% च्या आसपास होता.यात राज्यांचा डेफिसिट पण add केला तर हा आकडा खूप मोठा होईल.
हा २०१० चा रॉयटरचा आलेख पहा... Image removed. त्यामुळे सगळेच दोषी आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अर्थात तुम्ही नंतर, "भारतातल्या कोणत्या पक्षाच्या सरकारने या पॉप्युलीस्ट धोरणांना तिलांजली द्यायचे धैर्य दाखविले असते?..." असे म्हणलेले असल्याने आणि त्याच्याशी अंशतः सहमत असल्याने, केवळ १५%च गुण कापलेत. ;) अजून एक महत्वाचे कारण येथे चर्चिलेले दिसले नाही. (ही चर्चा मी आत्ताच वाचत आहे). ते म्हणजे इराणमधून असलेली आपली जवळपास वार्षिक ११% च्या तेल आयात. India to cut Iran oil imports by 11% amid US pressure वरील विषयासंदर्भात, तमाम (विशेष करून अमेरिकेत राहून माज करणार्‍या) अनिभांना ठोकायच्या संधीकडे या धाग्यात दुर्लक्ष केले गेले म्हणून मी निषेध करत आहे. ;) एनी वे, जोक्स अपार्ट, १५ मे च्या आसपास ही बातमी जाहीर झाली आणि तात्काळ भाववाढ झाली, यात डायरेक्ट कोरीलेशन असू शकते असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

दरवाढ आताच का केली असावी?

क्लिंटन
Fri, 05/25/2012 - 17:06 नवीन
ते म्हणजे इराणमधून असलेली आपली जवळपास वार्षिक ११% च्या तेल आयात. India to cut Iran oil imports by 11% amid US pressure
आताच दरवाढ केली त्यामागे हे कारण असू शकेलही. पण मला वाटते की झालेली दरवाढ ही गेल्या वर्षातील परिस्थितीमुळे झाली आहे आणि इराणमधून होत असलेल्या स्वस्त तेलाची आयात कमी झाल्यामुळे होणारे परिणाम यापुढील काळात जाणवतील. स्टॅन्डर्ड ऍन्ड पूअर्स चा तेलाची किंमत मोजणारा एक इंडेक्स असतो. गेल्या वर्षभरात तो इंडेक्स सुमारे ६% ने खाली आला आहे तर भारतीय रूपया त्याच काळात सुमारे २५% ने घसरला आहे. याचाच अर्थ तेल ६% ने स्वस्त झाले असले तरी रूपयातील घसरगुंडीमुळे आपल्या आयातीचे बिल वाढले आहे. तेव्हा आयात केलेल्या प्रत्येक पिंप तेलामागे आपल्याला तोटा होत होता आणि इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्यांना मिळून २०११-१२ मध्ये एकूण १,३८,५४१ कोटी रूपयांचा तोटा झाला.तेव्हा दरवाढ करणे अपरिहार्य होते. आता ही दरवाढ आताच का केली असावी? इथे आपल्या लोकशाही पध्दतीच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवतात.ही दरवाढ उत्तर प्रदेशातील निवडणुका पूर्ण होईपर्यंत करणे म्हणजे राजकीय आत्महत्या झाली असती.तसेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना जर दरवाढ केली असती तर संसदेत होणाऱ्या हाणामारीला तोंड द्यायची सरकारची तयारी नव्हती असे दिसते.आणखी उशीर केला तर गुजरातमधील निवडणुका अधिक जवळ आल्या असतील.तेव्हा काय करा? तर आता दरवाढ करा. जर काही चमत्कार होऊन रूपया पुढील ३-४ महिन्यात सावरला तर दरांमध्ये कपात करून गुजरात निवडणुकांना सामोरे जाता येईल असा एकंदरित हिशेब असावा असे वाटते. रूपयाची घसरगुंडी होण्यात युरोपमधील संकटाचा वाटा आहेच. पण त्याच बरोबर fiscal deficit नियंत्रणात ठेवण्यात सरकारला आलेले अपयश हा पण महत्वाचा मुद्दा विसरता येणार नाही. भारताच्या रूपयाइतकी घसरगुंडी इतर कोणत्याच चलनाची झालेली नाही. जर deficit आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले असते तर अर्थातच रूपया इतका गडगडला नसता. तेव्हा या बाबतीत सरकारचे अपयश आहेच. तेव्हा जर काही करायचेच असते तर ते यापूर्वी करायला हवे होते. सद्यपरिस्थितीत दरवाढीशिवाय पर्याय नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

रुपया विनिमय दर

नितिन थत्ते
Sat, 05/26/2012 - 11:39 नवीन
>>पण त्याच बरोबर fiscal deficit नियंत्रणात ठेवण्यात सरकारला आलेले अपयश हा पण महत्वाचा मुद्दा विसरता येणार नाही. भारताच्या रूपयाइतकी घसरगुंडी इतर कोणत्याच चलनाची झालेली नाही. जर deficit आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले असते तर अर्थातच रूपया इतका गडगडला नसता. तेव्हा या बाबतीत सरकारचे अपयश आहेच. तेव्हा जर काही करायचेच असते तर ते यापूर्वी करायला हवे होते. रुपयाची घसरण ही गेल्या काही दिवसात जास्त दिसत असली तरी सरासरीने रुपया दरसाल २.५%ने घसरत आहे. मधून मधून अशी अचानक घसरण दिसतच असते. Image removed. या तक्त्यात २००२ च्या सुरुवातीस ४९ रु च्या आसपास गेलेला दर २००४ मध्ये उतरलेला दिसतो. २००८ मध्ये हाच दर ४०च्या खाली गेलेला दिसतो. तसेच २००९ च्या सुरुवातीला ५२ च्या वर गेलेला दर मार्च २०१२ मध्ये ४५ रुपयांपर्तंत उतरलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आकडे

क्लिंटन
Sat, 05/26/2012 - 19:52 नवीन
चलनाचे अवमूल्यन का होते याविषयीचे तीन मुद्दे इथे लिहिले आहेत. बाकी तुम्ही दिलेले आकडे बरोबरच आहेत पण थोडेसे फसवेही आहेत. याचे कारण २००२ ते २००७ या काळात रूपया ४९ वरून ३९ वर चढला तर २००८-०९ मध्ये ४० वरून ५२ वर गेला, परत २००९-११ मध्ये ५२ वरून ४४ पर्यंत वर चढला आणि गेल्या वर्षात ४४ वरून ५६ वर आपटला. तेव्हा 'दरवर्षी २.५% depreciation' म्हणणे ही फसवी सरासरी झाली. १९९७ पासून रूपया आपटायचे प्रकार पाच वेळा झाले. १९९७ मध्ये पूर्व आशियाई देशांमधील संकटाच्या वेळी नोव्हेंबर १९९७ मध्ये, मे १९९८ च्या अणुचाचण्या आणि अमेरिकेचे भारतावर आलेले निर्बंध तसेच ऑगस्ट १९९८ मधील रशियन सरकारचा default आणि त्यानंतर सप्टेंबर १९९८ मध्ये LTCM हा हेज फंड कोसळल्यानंतर मे-जून ते सप्टेंबर १९९८ मध्ये, २००२ मध्ये जून-जुलै महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असताना कधीही युध्द भडकेल अशी परिस्थिती होती तेव्हा, सप्टेंबर २००८ ते मार्च २००९ दरम्यान लेहमन ब्रदर्स बुडाल्यानंतरच्या काळात आणि गेल्या वर्षभरात. या सर्व वेळी भारतातून परकीय गुंतवणुकदारांनी पैसा मोठ्या प्रमाणावर काढून अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये गुंतवला म्हणून dollar ची मागणी वाढली होती. परिणामी dollar च्या तुलनेत रूपया कोसळला. यावेळीही dollar भारताबाहेर जायचे महत्वाचे कारण म्हणजे युरोपातील संकट हे आहेच. अशा कोणत्याही संकटाच्या वेळी जागतिक गुंतवणुकदार इतर सगळी गुंतवणुक विकून जगातील सर्वात सुरक्षित अशा अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये गुंतवणुक करतात. हे पूर्व आशियाई देशांमधील संकट, LTCM, लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर आणि सध्या युरोपातील संकटाच्या वेळी दिसून आलेच आहे.पण यावेळी फरक काय आहे? भारताने २००८-०९ चे संकट पार पाडले कारण त्यावेळी fiscal deficit आणि महागाई दोन्ही नियंत्रणात होते. पण नंतरच्या काळात दोन्हींवरील नियंत्रण सुटले. तसेच सरकारच्या policy paralysis मुळे (आणि काही सरकारच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींमुळेही) कसे प्रश्न वाढले याचा आढावा इथे आणि इथे घेतला आहे. आज विविध राज्य वीज मंडळांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. २००३ च्या Electricity reforms च्या वेळी या मंडळांना बेल- आऊट दिला होता आणि परत बेल-आऊट मिळणार नाही असे निक्षून सांगितले होते.पण वीजगळती रोखणे, वीजचोरीला आळा घालणे अशी पावले उचलणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल त्यामुळे राज्य सरकारांनी या बाबतीत विशेष पावले उचलली नाहीत. आज तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान वीज मंडळांचा २००३ पासूनचा एकूण cumulative loss १ लाख कोटी हा भयावह आकडा पार करून गेला आहे. आता वरचाच मुद्दा-- काहीच फुकट मिळत नाही तर प्रत्येक गोष्टीची कोणाला तरी किंमत मोजावीच लागते. आता या १ लाख कोटी रूपयांची किंमत कोण मोजत आहे हे समजणे फारसे कठिण नाही. पण यामुळे वीजेसारख्या मुलभूत क्षेत्रात भारतीय आणि परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास उडत चालला आहे. वीज हे क्षेत्र किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायलाच नको. यामुळे आजच्या घडीला परदेशी गुंतवणुकदार भारतात पूर्वीइतक्या सहजपणे पैसा गुंतवू शकत नाहीत. आता या परिस्थितीला सरकार (केंद्र आणि राज्य सरकारे सुध्दा) जबाबदार नाहीत हे म्हणणे खूपच धाडसाचे ठरेल. प्रश्न आहे की यासाठी काही कठोर पावले उचलायला लागतील (वीज चोरी पूर्णपणे थांबविणे, तेलाच्या किंमती वाढविणे यासारख्या) आणि अशी कठोर पावले उचलणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल. ते करायला आपल्या देशातले राजकीय पक्ष तयार आहेत का? मला इतर देशांविषयी माहिती नाही. पण तथाकथित BRICS देशांमधील केवळ भारताचे चलन इतके वेगाने आपटत चालले आहे. तेव्हा युरोपातल्या परिस्थितीबरोबरच अंतर्गत कारणे इतर देशांपेक्षा भारतात जास्त असावीत असा एक कयास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरेरे

नगरीनिरंजन
गुरुवार, 05/24/2012 - 08:03 नवीन
डिझेल SUV न परवडणार्‍या आणि नाईलाजाने पेट्रोल Sedan घ्याव्या लागलेल्या गरीब लोकांचे कंबरडे मोडेल आता. कंपनीच्या किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचा तिटकारा असलेल्या आणि कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन फिरणार्‍या अतिसामान्य लोकांचे हाल तर कुत्रेही खाणार नाही. किती हा दैवदुर्विलास!
  • Log in or register to post comments

कंपनीच्या किंवा सार्वजनिक

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 08:15 नवीन
कंपनीच्या किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचा तिटकारा असलेल्या आणि कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन फिरणार्‍या अतिसामान्य लोकांचे हाल तर कुत्रेही खाणार नाही. सर्वच कंपनीच्या बसेस त्यांच्या कर्मचार्‍यांना फुकटात नेत नाहीत्,एक तर त्यांच्या पगारातुन पैसे कापले तरी जातात किंवा महिना ठराविक रक्कम भरुन प्रवास करावा लागतो, बर्‍याच वेळा ही रक्कम महिन्याला जे पेट्रोल लागते त्याच्या आस-पास असायची ( आता नसणार !) शिवाय सार्वजनिक बसचे तीन तेरा वाजलेले असतात ( ठाण्याची टीएमटी हे याचे उत्तम उदाहरण आहे.) रिक्षा परवडत नाही;तेव्हा सामान्य लोकांना कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन प्रवास करण्या शिवाय पर्याय उरत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अरे वा.

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 08:58 नवीन
आपल्याकडे डिझेल SUV आहे आणि ती आपल्याला परवडते हे ऐकुन आनंद झाला. बाकी कुल्ल्याखाली ६०-७० हजाराची दुचाकी घेउन जे हिंडतात त्यांच्यासारखे उन्हातानात गरज म्हणून हिंडतात. तुमच्यासारखे वातानुकुलीत ऑफीस ते वातानुकुलीत घर एव्हढाच प्रवास, तो सुद्धा वातानुकुलीत डिझेल SUV मधून, नसतो अश्या लोका़ंचा. गरज तुला चैन वाटत असेल तर वाटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

माझ्याकडे डिझेल SUV काय साधी

नगरीनिरंजन
गुरुवार, 05/24/2012 - 10:01 नवीन
माझ्याकडे डिझेल SUV काय साधी सायकलही नाही. नुकताच घरी गेलो होतो तेव्हा दिसलं की कॉलनीत प्रत्येक घरासमोर चारचाकी उभी आहे. काही घरांसमोरची जुनी जाऊन नवी आली आहे. क्षणभर वाटलं घ्यावी आपणही पण विचार केला तेव्हा कळलं की खरंच काही गरज नाही. नुकताच मटा मध्ये रिक्षाच्या दरवाढीवर एक लेख वाचला. बस व्यवस्थेला नावं ठेवणार्‍यांनी हा लेख नक्की डोळ्याखालून घालावा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापराच असा आग्रह नाही पण मग पेट्रोल वाढले तर किमान आरडा-ओरडा तरी नको. पेट्रोल हा हक्क नसून प्रिव्हिलेज आहे एवढेच मला म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नुकताच मटा मध्ये रिक्षाच्या

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 17:03 नवीन
नुकताच मटा मध्ये रिक्षाच्या दरवाढीवर एक लेख वाचला. बस व्यवस्थेला नावं ठेवणार्‍यांनी हा लेख नक्की डोळ्याखालून घालावा. मटा मधला हा लेख सुद्धा वाचावा... {टीएमटीचा 'दे धक्का{} http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12631719.cms रिक्षावाले एक नंबरचे माजुरडे असता (सगळेच नाही,पण बहुसंख्य) हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिटर असलेल्या रिक्षातुन नेहमीच्याच मार्गावरुन प्रवास करुन घरी आलो, जवळपास ७ ते ८ रु चा फरक पडला,म्हणजे मिटर मधे झोल करुन हे ग्राहकांना कसे लुबाडतात ते कळाले.सिएनजी रिक्षा असली तरी बर्‍याच प्रवाशांकडुन पेट्रोलचे दर पत्रक आकारले जाते. त्यांची इच्छा असेल तरच तुमच्या इच्छित स्थळी ते जाण्यास तयार होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद क्लिंटन, तुमच्या

५० फक्त
गुरुवार, 05/24/2012 - 08:28 नवीन
धन्यवाद क्लिंटन, तुमच्या प्रतिसादाचीच वाट पाहात होतो. तुम्ही दुवा दिलेला लेख सुद्धा वाचेन.
  • Log in or register to post comments

क्रूड ऑईल आयात केल्या पासून

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 09:02 नवीन
क्रूड ऑईल आयात केल्या पासून ते बाजारात विक्रीला येई पर्यंत त्यात काय खर्च येतो हा डाटा कोणाकडे आहे का ? तेल कंपन्यांना जो तोटा होतो तो फक्त आयातीच्या भावामुळे होतो का त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेही होतो हे कोणी सांगेल का ? जर या कंपन्या तुमच्या आमच्या आहेत तर आपण या लोकांना एवढा पगार देऊ शकतो का ? तुमच्या घरातील मोलकरणींना तुम्ही ५००० पगार देऊ शकता का ? या कंपन्यांमधे नोकरांच्या बाबतीत सप्लाय-डिमांड हे नैसर्गिक तत्व डावलले जाते त्यासाठी काय करावे लागेल ? म्हणजे बाहेर लाखो लोक नोकर्‍यांसाठी रांग लावून उभे असताना कमी पगारावर माणसे आपण का लाऊ शकत नाही ? पैसे मिळवायचे इतर मार्ग भ्रष्टाचाराने संपले आहेत त्यामुळे हा मार्ग स्विकारला गेलाय का ? म्हणजे जर २जी मधे लाखो करोड रुपये जर सरकारच्या तिजोरीत जमा झाले असते तर ही भाववाढ करायला लागली असती का ? किंवा जे सरकारने म्हटले होते की जर तेलाच्या किंमती जागतीक बाजारभावाशी जोडल्या गेल्या तर आम्ही त्यावर शून्य टॅक्स करू हे वचन पाळता अले असते का ? पण एक बरे झाले की सरकारच्या अकार्यक्षमता व चुकीच्या धोरणांचे परिणाम जनतेच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले ते. जनता पुढच्या निवडणूकीच्या वेली निश्चितच विचार करेल. भारतामधे जे जे अकार्यक्षम आहे त्याला घाणीतून बाहेर काढायला करदात्यांचा पैसा वापरला जातो ती सबसिडी थांबवता येईल का ? उदा. सहकार क्षेत्र......असे अनेक प्रश्न या वाढीमुळे मनात उभे राहिले आहेत हे खरे.......
  • Log in or register to post comments

पेट्रोल वरती कर

सुमीत
गुरुवार, 05/24/2012 - 11:30 नवीन
हा जवळ जवळ ६०-७० टक्के असतो. त्या मध्ये केंद्रा चा आणि राज्य सरकार पासून शहराचा वाटा असतो. http://www.dayandnightnews.com/2011/11/petrol-without-tax-cost-rs-42-appox/ http://www.indiandefence.com/forums/social-political-issues/10989-why-petrol-prices-high-india.html जागतिक बाजारात पेट्रोल ची किंमत वाढते ते ठिक आहे, भारतात पण वाढवा पण ह्या गरजे पेक्षा जास्त "करा" चे काय. बरे, हा कर गोळा करून सुद्धा रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक पण बेकार. त्या मध्ये सुधारणा शून्य. मग हा कर जातो कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

थोडी दूरूस्ती

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 12:12 नवीन
पेट्रोलच्या किमतीतील ६०-७० टक्के वाटा हा करांचा असतो. (म्हणजे कर हे ७०% पेक्षा जास्त असतात). E.D,. V.A.T. त्या व्यतीरीक्त अनेक अधीभार आणि (फक्त महाराष्ट्रातच) ऑक्ट्राय हे सर्व वाटेकरी आहेत. अवांतर- (१) अनेकांना माहीत नसेल की या अधीभारातील एक अधीभार रस्त्यांसाठी असतो. आपण अधीभार देतोच. त्याशिवाय "टोल" देतो. (२)भारतातच नव्हे तर संपुर्ण जगा२)ऑकट्राय फक्त महाराष्ट्रात आणि तोसुद्धा फक्त मोठ्या शहरात चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

हे माहीत नव्हते

सुमीत
गुरुवार, 05/24/2012 - 12:55 नवीन
की फक्त महाराष्ट्रात "जकात" (की जिझिया ?) कर आहे. आता प्रश्न असा की एकूण कर पद्धतीला आळा कसा घालायचा? "जन हीत" याचीका दाखल करू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

"जकात" उर्फ जिझिया कर

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 15:02 नवीन
फक्त महाराष्ट्रात आणि तोसुद्धा निवडक शहरातच चालु आहे. जकात सर्व टॅक्सेस किमतीत मिळवून आणि वाहतूक खर्चसुद्धा त्यात मिळवुन होणा-या रकमेवर घेतली जाते. म्हणजे ती पेट्रोलचा दर + E.D. + त्यावरील अधीभार + V.A.T+ राज्य सरकारचे अधीभार एव्हढ्या सगळ्यांची बेरीज करून त्यावर ऑक्ट्राय लागू करतात. अवांतर- प्रामाणीकपणे जकात भरणा-याकडे चोर असल्यासारखे बघीतले जाते आणि तशी वागणूक मिळते. त्याशिवाय कितीही प्रामाणिक असलात तरी चिरीमिरी वसूल केलीच जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

:-(

अमृत
गुरुवार, 05/24/2012 - 09:31 नवीन
आज सकाळीच पेट्रोल भरले ८३.९२ प्रती लिटर (हैद्राबाद मधे) अमृत
  • Log in or register to post comments

पाहा हे लोक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/24/2012 - 10:22 नवीन
नानू लेका, आमच्या दु:खावर फूंकर घालण्याऐवजी आनंद व्यक्त करत आहात कुठे फेडाल हे पाप ? आपण स्वत: पेट्रोलला काही पर्याय निर्माण केले पाहिजेत. काहीतरी टाकावू वस्तू आणि कोणत्या तरी झाडाची जडीबूटी कुटून त्याचा एक थेंब पाण्यात मिसळून कमीत कमी एका थेंबापासून पाच पंचवीस टँकर पेट्रोल निर्मिती झाली पाहिजे त्याशिवाय पेट्रोलचे भाव काही कमी होणार नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ठिक आहे

ऋषिकेश
गुरुवार, 05/24/2012 - 10:54 नवीन
फक्त पेट्रोल महागलंय ना! मग ठिक आहे डीझेल महागलं असतं तर बर्‍याच गोष्टी महाग झाल्या असत्या. पेट्रोलवाढीमुळे फार वाईट वाटत नाही. (मी पेट्रोल किंवा डीजेलवर चालणारे कोणतेही वाहन बाळगत अथवा चालवत नाही.)
  • Log in or register to post comments

निर्मलबाबांना जाहीर प्रश्न !

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 11:19 नवीन
Image removed. बाबाजी के चरणों में कोटी कोटी प्रणाम ! बाबाजी ये मेहेंगाई बोहोत बढ गई है... पेट्रोल तो मेहंगा ही होते जा रहा है ! क्या आपकी "कॄपा" से ये मेहेंगाई कम हो सकती है ? ;) मेहेंगाई से बचने के लिये आपकी "कॄपा" पाना बोहोत आवश्यक हो गया है ! क्या आपकी "कॄपा" हिंदुस्थान के सभी लोगों को मिल सकती है ? सभी हिंदुस्थानी लोगों को आपकी यह असीम "कॄपा" प्राप्त करने के लिए कितीनी जेब खाली करनी पडेगी ? यह बताना न भुलिये ! आपका परम भक्त... (बाबा मियॉ प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments

मदनबाणा

इरसाल
गुरुवार, 05/24/2012 - 12:46 नवीन
एक सुचवणी..... ते कृपा नका लिहु हो, मराठी-हिंदी वाटते. किरपा लिहा पंजाबी-हिंदी मग सही वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खुळा

विनायक प्रभू
गुरुवार, 05/24/2012 - 11:13 नवीन
नान्या खुळावला
  • Log in or register to post comments

माणसाचे जगणे महागच झाले आहे,

स्वातीविशु
गुरुवार, 05/24/2012 - 11:14 नवीन
माणसाचे जगणे महागच झाले आहे, त्यात विशेष काय? स्वस्त असे काहीच राहिले नाही. भाजीपाल्यापासून, धान्ये, दुध, औषधे, एल.पी.जी, बसभाडे, रिक्षाभाडे इ. सगळ्यांची भाववाढ झालीच आहे, त्यात पेट्रोलची किंमत वाढ्ली इतकेच ( ती दर ४-६ महिन्यांनी होत असते) . :) हे तर सोडा २०११-१२ मध्ये स्टेनलेस स्टीलचा भाव २-३ वेळा वाढला आहे. :) पण सरकारी कामगारांना मात्र ६वा वेतन आयोग मिळाला ना, मग आणखी काय पाहिजे. किंमती वाढ्ल्या की टॅक्स वाढ्ला, टॅक्स वाढ्ला की सरकारी खजिना भरला, मग ७वा वेतन आयोग देता येईल ना.....खाजगी कामगारांच्या हाती काय (२जी आणि ३जी आणि आणखी काही घोटाळयांमुळे) घंटा..... नाचा...धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
  • Log in or register to post comments

गौडबंगाल : तज्ज्ञांना आवाहन

विसुनाना
गुरुवार, 05/24/2012 - 12:12 नवीन
समजा, सरकारने डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाचा ग्यॅस यांची सबसिडी बंद केली, त्याबरोबरच पेट्रोलसह या सर्व इंधनांवरचा करही माफ केला आणि त्यांच्या किंमतींवरील नियंत्रणही रद्द केले तर - १.या इंधनांच्या प्रत्यक्ष किंमती किती असतील? २.ऑईल कंपन्यांना होणारा तोटा भरून निघेल काय? ३. सरकारच्या तिजोरीवरचा बोजा वाढेल की कमी होईल? ४. देशात महागाई वाढेल की कमी होईल? या प्रश्नांची उत्तरे कोणी अगोदरच शोधली आहेत का? असल्यास ती द्यावीत. नसल्यास ती उत्तरे कोठे मिळतील? जाणकारांनी कृपया माहिती द्या.(गोव्यातील प्रयोगाबाबत कुणाला अधिक माहिती आहे काय?) ता.क. रस्त्यावरची स्वयंचलित वाहनांची गर्दी तशीच आहे.
  • Log in or register to post comments

रस्त्यावरची स्वयंचलित वाहनांची गर्दी तशीच आहे, कारण

सुमीत
गुरुवार, 05/24/2012 - 12:58 नवीन
अफाट कर गोळा करून पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

प्रश्न

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 05/24/2012 - 15:02 नवीन
प्रश्न फक्त पेट्रोल दरवाढीचा नाही, त्या अनुषंघाने येणार्‍या इतर वस्तूंच्या दरवाढीचा देखिल आहे. आता पेट्रोलचे दर वाढले म्हटल्यावर, भाजी, दूध, किराणा, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखिल वाढणार. दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे, LPG आधिच १२५ ते १४० च्या घरात आहे. आज कुठलीही भाजी २० ते ३० रुपये किलोच्या खाली नाही (निदान ठाण्यात तरी!) या सगळ्या भावांमधे प्रचंड प्रमाणात वाढ होणार. जे लोक दिवसाला २००-२५० रुपये कमावतात त्यांनी कसे जगायचे हा प्रश्न आहे. मी आणि इतर अनेक मिपासदस्य या वर्गात मोडत नाहीत. पण म्हणून जगभर पेट्रोलचे दर वाढतायत तर भारतातही वाढणारचं, पेट्रोल हि गरज नसून चैन आहे वगैरे बोलायला आपल्याला फार त्रास होत नाही. त्यात आपण सुशिक्षित, आपल्याला आकडेवारी आणि इतर सामाजिक, राजकिय समीकरणे समजतात, ती सर्व वर्गातील लोकांना कळतीलच, किंवा कळलीच पाहिजेत हा बालिश विचार आहे. सरकार शिव्या देण्यात मतलब नाही, सरकार काय करणार वगैरे बोलणार्‍यांना हे समजणे अवघड नाही, कि सरकार या सारख्या प्रश्नांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी असते. आणि दुर्दैवाने आज भारतात असा कुठलाही पक्ष नाही, ज्याच्या कडे अशा संवेदनशील प्रश्नांचे गांभिर्य जाणून त्यावर तितक्याच सारासार बुद्धीचा वापर करुन तोडगा काढण्याची कुवत असलेले नेते आहेत. काँग्रेस असो वा भाजप असो, सगळेच फक्त या गोष्टीकडे एक "निवडणूकीसाठी मिळालेला मुद्दा" याच नजरेने बघतात. आणि यापुढील धोका हा, कि आज जर परिस्थिती इतकी चिंताजनक आहे तर आज जी पिढी २० वर्षे वयोगटात मोडते, नवतरुणवर्ग, त्यांच्यापुढे काय काय वाढून ठेवले आहे हे तो इश्वरचं जाणे!! :(
  • Log in or register to post comments

सर ......

ईन्टरफेल
गुरुवार, 05/24/2012 - 22:27 नवीन
दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे,>>>>>>>>> माझ्या दुग्ध आहे या व्यवसायात मला मिळालेले पैसे ! मला आजच्या तारखेला १२.१४ पैसे प्रति लिटर भाव मिळाले मग मि काय करु ????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

मला आजच्या तारखेला १२.१४ पैसे

मितभाषी
गुरुवार, 05/24/2012 - 22:49 नवीन
मला आजच्या तारखेला १२.१४ पैसे प्रति लिटर भाव मिळाले
प्रत काय? फॅट? एस एन एफ? उगीच काहीही सांगू नका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईन्टरफेल

हे कस शक्य आहे,

विजय_आंग्रे
गुरुवार, 05/24/2012 - 16:31 नवीन
आता पेट्रोलचे दर वाढले म्हटल्यावर, भाजी, दूध, किराणा, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखिल वाढणार. दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे, LPG आधिच १२५ ते १४० च्या घरात आहे. आज कुठलीही भाजी २० ते ३० रुपये किलोच्या खाली नाही (निदान ठाण्यात तरी!) या सगळ्या भावांमधे प्रचंड प्रमाणात वाढ होणार. हे कस शक्य आहे, भाव पेट्रोलचे वाढलेतन की डीजलचे?
  • Log in or register to post comments

जीवनावश्यक वस्तुंची मोठ्या

५० फक्त
गुरुवार, 05/24/2012 - 18:57 नवीन
जीवनावश्यक वस्तुंची मोठ्या प्रमाणावर वाहतुक डिझेलच्या वाहनातुन होते, पण ज्याला लास्ट माईल म्हणतात ते सगळं पेट्रोलवरच असतं, जवळपास ९०%, त्यामुळं तिथं खुप मोठा फरक पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय_आंग्रे

पेट्रोलच्‍या दरात प्रति लिटर

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 05/24/2012 - 16:42 नवीन
पेट्रोलच्‍या दरात प्रति लिटर 7.50 रूपयांची दरवाढ केल्‍यानंतर केंद्र सरकारच्‍या रडावर आता डिझेल आणि घरगुती वापराचा गॅस आहे. सरकारने याचेही दर वाढवण्‍याची तयारी केली आहे. शुक्रवारी होणा-या बैठकीनंतर सरकार याची घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे. सरकारने डिझेलच्‍या दरात 3 ते 5 रूपये आणि घरगुती गॅसच्‍या दरात 400 रूपये वाढ करण्‍याची योजना केल्‍याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्‍या एक वरिष्‍ठ अधिका-याने दैनिकभास्‍करडॉट कॉमशी बोलताना सांगितले. पेट्रेलियम पदार्थाच्‍या दरात वाढ करण्‍यासाठी सरकारवर सध्‍या प्रचंड दबाव आहे.
  • Log in or register to post comments

पेट्रोल नश्वर आहे...

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/24/2012 - 22:27 नवीन
पेट्रोल नश्वर आहे... अन् महागाई सत्य आहे..... मग उगा आक्रंदन करण्यात, काय बरे तथ्य आहे? ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/24/2012 - 22:44 नवीन
ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला,
डांबिसकाका, तुमने तो पीईच नही या धर्तीवर तुमने तो कभी खरी तक्रार कीईच नही. अहो, तक्रार करायची ती आपला ज्या गोष्टीवर बिलकुल कंट्रोल नाही त्या बाबतीतच! आपला कंट्रोल असतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी येते की काहीतरी करण्याची. यवढं कसं हो तुम्हा झंटलमन लोकांना समजत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

असं म्हणता?

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/24/2012 - 23:22 नवीन
मग ही घ्या तक्रार...... "आजकाल पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. साधी टाकी फुल्ल करायची तरी खिशाला मोठे भगदाड पडत आहे. शिवाय इतके पेट्रोल जाळल्याने त्या ओझोन लेयरला भलेमोठे भगदाड पडत आहे ते वेगळेच. पृथ्वीच्या पोटातला पेट्रोलचा साठादेखील संपुष्टात येत आहे... स्वर्गामधले लट्ठ देव काय नुसते अमृत ढोसून झोपा काढत आहेत काय?" संतप्त सार्वजनिक मिपाकर, पिवळा डांबिस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बाब्बौ!

Nile
गुरुवार, 05/24/2012 - 22:58 नवीन
ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला,
मग मराठी माणसानं करावं तरी काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

या दोन प्रतिसादांचा विचार

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/25/2012 - 02:26 नवीन
या दोन प्रतिसादांचा विचार करता बाबा घासकडवी पूजावाले उर्फ गुर्जी हे अस्सल मराठी माणूस नाहीतच असा निष्कर्ष निघतो. अधिक संशोधनाअंती ते सरासरीपेक्षा फारच जास्त शिकलेले आणि विचार करणारे (सामान्य भाषेत विचारजंत किंवा दाखवायच्या उच्चभ्रू भाषेत विचारवंत) असल्याचे लक्षात येते. सबब बाबा घासकडवी पूजावाले उर्फ गुर्जी हे अस्सल मराठी माणूस नसून, सामान्यांच्यापेक्षा अधिक शिकलेले विचारवंत* असल्यामुळे त्यांचाही निषेध करते. *मी दाखवायची उच्चभ्रू असल्यामुळे विचारवंत म्हणते. खर्‍या उच्चभ्रूंनी शक्य असल्यास विचारजंत असे वाचावे. अवांतर: जागतिक बाजारात क्रूड अथवा कच्च्या तेलाची किंमत किंचित वाढून आत्ता ९० डालरांवर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

दुवा

नितिन थत्ते
गुरुवार, 05/24/2012 - 22:33 नवीन
एक माहितीपूर्ण दुवा.
  • Log in or register to post comments

आणखी

नितिन थत्ते
Fri, 05/25/2012 - 00:03 नवीन
आणखी विश्लेषण Image removed. दिल्लीऐवजी मुंबईतील किंमत घेतली असती तरी निष्कर्षात फरक आला नसता. टीप: कोणाला असे वाटू शकेल की यूपीए सरकारच्या काळात रुपयाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे क्रूड तेलाचे रुपयातील भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. पण तसे नाही हे खालील गणितातून दिसून येईल. रालोआच्या ७४ महिन्यांच्या (६.१६ वर्षे) काळात डॉलर ३९.५६ रु वरून ४५.१७ रु पर्यंत वाढला. म्हणजे डॉलर प्रतिवर्ष २.१७% दराने वधारला. यूपीए च्या ९६ महिन्यांच्या (८ वर्षे) काळात डॉलर ४५.१७ वरून ५६.०० रु पर्यंत वाढला. म्हणजे प्रतिवर्ष २.७२% दराने वधारला. दोन्ही दरांत फारसा फरक नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरामुळेच दरवाढ होत आहे असे दिसते. तरीही काही प्रमाणात सरकार ही वाढ शोषत आहे असे पेट्रोलच्या दराच्या क्रूड दराशी असलेल्या प्रमाणावरून दिसेल. रालोआ सरकारच्या काळातही अश्याच रीतीने क्रूडतेलाची दरवाढ शोषली जात होती. (गुणोत्तर कमी झाले).
  • Log in or register to post comments

१९९८ ते २०१२ मधे कच्च्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/25/2012 - 03:22 नवीन
१९९८ ते २०१२ मधे कच्च्या तेलाचे भाव (रूपयामधे) साधारण १० पट वाढले, पण पेट्रोलचे दर ३ पटच वाढलेले आहेत. याचा अर्थ पेट्रोलचे भाव पुरेसे वाढलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरोबर. ती कसर विमानाचे इंधन

नितिन थत्ते
Fri, 05/25/2012 - 07:45 नवीन
बरोबर. ती कसर विमानाचे इंधन किंवा वंगणे आणि इतर उत्पादनांच्या भाववाढीतून भरून काढली असावी. वरच्या सारखी तुलना डिझेल, रॉकेल यांच्यासाठी करून पाहिली तर आणखीच वेगळे चित्र दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा