✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टवाळा आवडे विनोद ???

क
कापूसकोन्ड्या यांनी
Wed, 05/16/2012 - 01:42  ·  लेख
लेख
टवाळा आवडे विनोद ??? आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत. आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले. टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता. वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल. मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच. खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहीजे. महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26537 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

तुमी माझे काय बी वाकडे केलेले

इस्पिक राजा
Wed, 05/16/2012 - 17:13 नवीन
तुमी माझे काय बी वाकडे केलेले नाय. त्यामुळे तुमाला मी शिव्या देनार नाय. मारोबामनसारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

धन्यवाद.

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 05/17/2012 - 00:40 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा

हो

कौतिक राव
Fri, 05/18/2012 - 12:34 नवीन
आठवले गटाचे दिसताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

http://www.scrollindia.com/wp

शिल्पा ब
गुरुवार, 05/17/2012 - 00:59 नवीन
http://www.scrollindia.com/wp-content/uploads/2010/03/mf1.jpg http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/ हे वरचे दुवे त्यांनी काढलेली चित्र दाखवतात...खालचा दुवा जरूर पहा म्हणजे "खांद्यावर घेतल्यावर कानात मुतणे" काय असतं ते कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

"खांद्यावर घेतल्यावर कानात मुतणे"

अजातशत्रु
Fri, 05/18/2012 - 13:21 नवीन
श्री श्री नाना पाटेकर यांचा विजय असो. _/\_ :-) भारतात कडेवर घेण्याची पद्धत आहे. तस्लिमा नसरीनला नव्हते का आम्ही कडेवर घेतले? :stare:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

फालतुपणे विषय बदलायचा प्रयत्न

शिल्पा ब
Fri, 05/18/2012 - 21:38 नवीन
फालतुपणे विषय बदलायचा प्रयत्न करु नका...मुद्यावर बोला. चित्रांच्या लिंका वर दिल्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

http://www.scrollindia.com/wp

शिल्पा ब
गुरुवार, 05/17/2012 - 01:02 नवीन
http://www.scrollindia.com/wp-content/uploads/2010/03/mf1.jpg http://www.hindujagruti.org/activities/campaigns/national/mfhussain-campaign/ हे वरचे दुवे त्यांनी काढलेली चित्र दाखवतात...खालचा दुवा जरूर पहा म्हणजे "खांद्यावर घेतल्यावर कानात मुतणे" काय असतं ते कळेल. बाकी इंग्रजांनीही भारतातील जनतेवर एकेकाळी भयंकर अन्याय केला होता, हाल केले होते...त्यांचं काय अन कसं करायचं म्हणता? का इंग्लंडात भारतीयांसाठी आरक्षण व्हावे म्हणुन एखादी ब्रिगेड तयार करायची? आता आमची रजा. दगडापुढे डोकं फोडुन घेण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

आहाहा... काय हे मातृप्रेम !!!

अर्धवटराव
गुरुवार, 05/17/2012 - 08:07 नवीन
>>सरस्विटीला तरी कुठे 'नागवे' दाखविले होते? -- क्या बात है. आईला मुलं कुठल्या नावाने हाक मारतील नेम नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अरे अशा किती 'आया' म्हणायच्या?

अजातशत्रु
Fri, 05/18/2012 - 13:15 नवीन
भारत -माता राष्ट्र-माता धरणी -माता गो -माता गुरु -माता धनलक्ष्मि-माता समृध्दि-माता सध्याच्या लेटेस्ट फॅशन मधल्या 'माता' आहेतच, जशा अम्मा-टम्मा-माया-ममता-छम्मक छल्लो यात दिवसागणीक एका नविन मातेची भर पडतेय (बुवा- बाबांचे तर विचारुच नका) या सर्व 'आयां'मुळे भारतीयांचा गोंधळ उडलेला आहे त्यामुळे नेमके कोणाला 'आई' म्हणावे या भ्रमातून तो सुटलेला नाही त्यामुळे स्वतःच्या 'जन्मदात्या आईला मात्र' वृद्धाश्रमात हाकलून आम्हि भारतीय मातृसंस्थेचे गोडवे जगाला सांगत फिरत असतो हेच आमचे खरे मातृप्रेम आहे. . . . . . . . . . ( :sad: )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

काय हरकत आहे ??

अर्धवटराव
Fri, 05/18/2012 - 23:15 नवीन
याच नाहि तर अजुन बर्‍याचजणी मातृलिस्ट मध्ये सामावता येतील... काय हरकत आहे? जितकी ममता (कुलकर्णी/बॅनर्जी नव्हे) जास्त तितके समाजाचे भलेच, नाहि का? आणि त्यात गोंधळण्यासारखं काय आहे? जेवताना जर पोळी, भाजी, भात, कोंबडी, माणसाचं डोकं... हे सर्व खाता येतं... कुठे गोंधळ नाहि होत. राहिला प्रश्न भारतेयांनी आयांना वृद्धाश्रमात पठवण्याचा.... तर यामागचं कारण भावी आयाच असतात (पक्षी सुनबाई) कुर्‍हाडीचे दंडे गोतास काळ, आणखी काय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

हरकत आहे

अजातशत्रु
Sat, 05/19/2012 - 10:02 नवीन
आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. उदा.देताना इतर शुल्लक खाण्या- पिण्याचे आणि प्राण्यांचे दाखले देणे त्या मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे असे आम्ही समजतो.
राहिला प्रश्न भारतेयांनी आयांना वृद्धाश्रमात पठवण्याचा.... तर यामागचं कारण भावी आयाच असतात (पक्षी सुनबाई) कुर्‍हाडीचे दंडे गोतास काळ, आणखी काय.
शेवटि दोष स्त्रियांनाच (सूनेला) ना? शाब्बास.. मुलगे तर आसवे गाळून सुनेच्या हाता-पाया पडून पक्षि लोटांगण घालून वृद्धाश्रमात पाठवू नकोस म्हणून पत्नीपुढे गयावया करत असतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आपल्या तीक्ष्ण बुद्धीपुढे अन

शिल्पा ब
Sat, 05/19/2012 - 10:38 नवीन
आपल्या तीक्ष्ण बुद्धीपुढे अन अफाट आकलनक्षमतेपुढे आमचा नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

तीक्ष्ण बुद्धी...

अजातशत्रु
Sat, 05/19/2012 - 16:14 नवीन
अर्थात मी 'ढ' नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता आणि मुद्दाम अंगावर ओढता, त्रागा लक्षात येतोय तुमचा, तुमच्या प्रयत्नांना आमचा रामराम :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर

शिल्पा ब
Sat, 05/19/2012 - 19:14 नवीन
अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर अतिशहाणे आहात..बघा ना आम्ही काय करतो हेसुद्धा तुम्हाला समजलं. आम्ही ढ असल्याकारणाने सगळ्या गोष्टी समजुन घ्यायचा प्रयत्न करतो. ते एक असो..मुळ मुद्याचं सोडुन तुम्ही चर्चा भरकटवताय कारण आता तुमच्याकडे मुद्देच नाहीत. जेव्हा सुचेल तेव्हा मुद्याचं जरुर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अरे अजात्शत्रू बाळा

कौतिक राव
Sun, 05/20/2012 - 11:49 नवीन
अरे अजात्शत्रू बाळ, शिल्पा ताइ म्हणता आहेत, विषय् सध्या व्यन्ग चित्रा वर चालू आहे ना, आणि तू आधि फालतु मुद्दे दिले होतेस ना! ते सम्पले का? असे त्या विच्आरत आहेत. मग बाळा तू असे विषयाना फाटे का बरे फोडतो आहेस? मात्रुप्रेमा विषयी बोलायला आपण एक वेगळा धागा सुरु करु ह बाळा!! पण (तर्कशुद्ध) मुद्दे नसतीलच तुझ्या कडे तर तू तरी बापडा काय करणार म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

विषय?

अजातशत्रु
Mon, 05/21/2012 - 08:52 नवीन
अरे अजात्शत्रू बाळ, शिल्पा ताइ म्हणता आहेत, विषय् सध्या व्यन्ग चित्रा वर चालू आहे ना, आणि तू आधि फालतु मुद्दे दिले होतेस ना! ते सम्पले का? असे त्या विच्आरत आहेत.
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या अनुषंगाने मान.हुसेनजींचा विषय येणे स्वाभाविक आहे. आणि खेडेकरांच्या पुस्तकाचाही, तेव्हा ते विषय फालतू कसे काय ठरतात ? अर्थात मानसिकताच फालतू असेल तर सारे जगच फालतू वाटू शकते. जर हे विषय फालतू होते तर ,त्यावेळी त्यासाठी इतके आकंड तांडव का बरे व्हावे?
मग बाळा तू असे विषयाना फाटे का बरे फोडतो आहेस? मात्रुप्रेमा विषयी बोलायला आपण एक वेगळा धागा सुरु करु ह बाळा!! पण (तर्कशुद्ध) मुद्दे नसतीलच तुझ्या कडे तर तू तरी बापडा काय करणार म्हणा..
मात्रुप्रेमा... मातृप्रेमाचा उमाळा अर्धवटरावांचा दाटून आलेला , तुम्हि त्यानाच का नाहि विचारत? प्रतिसाद काळजीपुर्वक वाचत चला, उगा भावनीक होऊन तोंडघशी पडू नका. . . . . . . (भौतीक अभाव )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

अर्धवटराव काय आणि तुमि काय एका माळेचे आहात..

कौतिक राव
Wed, 05/23/2012 - 09:04 नवीन
भजात पर्तू.. मातृप्रेमाचा उमाळा अर्धवटरावांचा दाटून आलेला .. आणि तुम्हाला काय तर म्हणे मान.हुसेनजींचा दाटून आलाय.. (द चा छ करु नका ;) , तेवढे उपकार करा मिपा वर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

माळ कि जानवे? ;-)

अजातशत्रु
गुरुवार, 05/24/2012 - 16:21 नवीन
बाकी मान. मकबूल हुसेनजींना तुमच्या सारख्यांमुळे आजही यातना होत असतील . . . . . खुदा आपको मुआफ करें
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर

अजातशत्रु
Mon, 05/21/2012 - 08:53 नवीन
अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर अतिशहाणे आहात..बघा ना आम्ही काय करतो हेसुद्धा तुम्हाला समजलं.
अर्थात , त्यानेच करमणूक होतेय.
आम्ही ढ असल्याकारणाने सगळ्या गोष्टी समजुन घ्यायचा प्रयत्न करतो.
यात तरी निदान यश येवो हिच सदिच्छा !!
ते एक असो..मुळ मुद्याचं सोडुन तुम्ही चर्चा भरकटवताय कारण आता तुमच्याकडे मुद्देच नाहीत. जेव्हा सुचेल तेव्हा मुद्याचं जरुर लिहा.
तरी म्हणले हे रडगाणे अजुन कसे चालू झाले नाही :puzzled: :smile: मागेही माझ्या एका धाग्यावर 'स्वतःच प्रतिसाद देऊन' चर्चेला सुरुवात केलीत आणि वर माझ्यावरच 'तो ' धागा वर आणता म्हणून आरोपही केला होतात, हे विसरलात काय? तुम्हाला 'ढ 'म्हणने हे समस्त 'ढ विरांचा' अपमान होईल, त्यामुळे टाळत आहे. . . . . . . ( खप्ला ढ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अरेरे!!! कीती आकांड तांडव

शिल्पा ब
Mon, 05/21/2012 - 09:01 नवीन
अरेरे!!! कीती आकांड तांडव करताहात!! मुद्दे नसल्यावर लोकं व्यक्तिगत चिखलफेक करतात हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

इलाज करुन घ्या हो

अजातशत्रु
Mon, 05/21/2012 - 09:32 नवीन
अरेरे!!! कीती आकांड तांडव करताहात!! मुद्दे नसल्यावर लोकं व्यक्तिगत चिखलफेक करतात हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
व्यक्तिगत चिखलफेकीचा आरोप हे वरच्या प्रतिसादात राहून गेले, मी कधिही असा कांगावा केलेला नाही, व्यक्तिगत आरोप/चर्चा कोण करते हे इथल्या प्रतिसादांवरुनही सहज कळेल इथे किंवा इतर संस्थळांवर जरी लोक माझे नाव घेऊन बोलतात, मला चर्चा करायची असते धुळवड खेळायची नसते. शह -काटशह देण्याच्या नादात मग आपण काहीही बरळू लागतो आणि शेवटचा "वार" म्हणून हे व्यक्तिगत आरोपांचे हत्यार उपसतो.त्यात काहि नवल नाही. असो मला माझा 'ढ'पणा आणखी सिद्ध करायचा नाही. हा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बरं!!! पण हुशारपणा दाखवुन मुळ

शिल्पा ब
Mon, 05/21/2012 - 10:02 नवीन
बरं!!! पण हुशारपणा दाखवुन मुळ मुद्यावर तर या!! बाकी व्यक्तिगत कोण झालंय हे प्रतिसादांवरुन कळतंच आहे याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

स्त्री दाक्षिण्या आहे का?

कौतिक राव
Wed, 05/23/2012 - 08:57 नवीन
भाजप शत्रू, अहो, तुम्हाला मुद्देसूद बोलता येत नाही हे समजू शकते, पण साधे स्त्री दाक्षिण्या सुद्धा दाखवता येवु नये म्हणजे कमाल झाली बुवा.. बाइ माणसाला काय अप्शब्द लिहिले आहेत.. अरेरे.. किबोर्ड हातात आला म्हणून काहिहि लिहित सुटलात वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अपशब्द?

अजातशत्रु
गुरुवार, 05/24/2012 - 15:57 नवीन
तुमचा हायपोथेसीस तुमच्याकडेच ठेवा !! . . . . . . (अवचीत आव :tired:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

तुलना ???

अर्धवटराव
Sat, 05/19/2012 - 19:30 नवीन
>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. -- अर्थात. आणि हे मातृत्व जिथुन जिथुन स्त्रवते त्याला नाकरणे हा त्या मातृत्वाचा अपमान आहे... पण हि त्या मातृत्वाचीच थोरवी आहे कि ती मुलांचे कुठलेही अपराध माफ करते. >>उदा.देताना इतर शुल्लक खाण्या- पिण्याचे आणि प्राण्यांचे दाखले देणे त्या मातेच्या मातृत्वाचा अपमान आहे असे आम्ही समजतो. -- ह्म्म्म. ज्या अन्नावर पोषण होतय, ते क्षुल्लक. जे प्राणि ते अन्न पुरवतात ते क्षुल्लक. तरीच या देशातले शेतकरी फार जास्त सुखात आहेत. भरल्या पोटी पब्लीकला असे दिव्य विचार सुचतील तर का नहि म्हणा. >>शेवटि दोष स्त्रियांनाच (सूनेला) ना? शाब्बास.. मुलगे तर आसवे गाळून सुनेच्या हाता-पाया पडून पक्षि लोटांगण घालून वृद्धाश्रमात पाठवू नकोस म्हणून पत्नीपुढे गयावया करत असतात -- हा दोष मी देत नाहिए, सासवांना आणि सुनांन त्रास कुणाकडुन होतो ते त्यांच्याकडुनच जाणुन घ्या. शिवाय या सगळ्याचा मातृत्व भावनेच्या भव्यतेशी काहि संबंध नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

सासु-सुनांचे डेली सोप

अजातशत्रु
Mon, 05/21/2012 - 09:13 नवीन
आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. हे मान्य करावेच लागते..:-)
आणि हे मातृत्व जिथुन जिथुन स्त्रवते त्याला नाकरणे हा त्या मातृत्वाचा अपमान आहे... पण हि त्या मातृत्वाचीच थोरवी आहे कि ती मुलांचे कुठलेही अपराध माफ करते.
वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर?
ह्म्म्म. ज्या अन्नावर पोषण होतय, ते क्षुल्लक. जे प्राणि ते अन्न पुरवतात ते क्षुल्लक. तरीच या देशातले शेतकरी फार जास्त सुखात आहेत. भरल्या पोटी पब्लीकला असे दिव्य विचार सुचतील तर का नहि म्हणा.
आता शेतकर्‍यांचा उमाळा :-) शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो, माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही, तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते. मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले
हा दोष मी देत नाहिए, सासवांना आणि सुनांन त्रास कुणाकडुन होतो ते त्यांच्याकडुनच जाणुन घ्या. शिवाय या सगळ्याचा मातृत्व भावनेच्या भव्यतेशी काहि संबंध नाहि.
तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते,:-) मुलग्याचा रोल महत्वाचा असतो, मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते. . . . . . . . . ( विवाहित आणि सुखी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आपली आकलनक्षमता पाहुन मन

शिल्पा ब
Mon, 05/21/2012 - 09:23 नवीन
आपली आकलनक्षमता पाहुन मन भारावुन गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

नाहि बॉ !!

अर्धवटराव
Mon, 05/21/2012 - 20:09 नवीन
>>आईची आणि तीच्या मातृत्वाची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. हे मान्य करावेच लागते.. -- हॅ हॅ हॅ. म्हणुनच तुम्ही कुठल्याली नावाने हाका मारा, तिचे मातृत्व आटत नाहि हा मुख्य मुद्दा. >>वर पुरेसे स्पष्ट झालेले आहे,तरीहि पुन्हा गाडी त्याच रुळावर? -- ते स्पष्ट झालय होय... चला.. मुद्दा पटला म्हणायचा. >>आता शेतकर्‍यांचा उमाळा. शेतकरी अन्न पुरवतो/ पिकवतो ते त्याचे कर्म आहे आणि त्याचे फळ/ मोबदला त्यास मिळत असतो, -- आता तुम्हाला अन्न क्षुल्लक वाटलं... तर म्हटलं बघावं थोडा शेतकर्‍यांचा कैवार घेऊन. >>माता आणि तीचे मातृत्व यात कर्म सिद्धांत येत नाही, -- कर्मसिद्धांतवर बोलायचं म्हणताय... बघा बुआ... नाहितर आम्हालाच म्हणाल कि आता कर्मसिद्धांताचा उमाळा आला म्हणुन. >>तीचे मुलांसाठीचे प्रेम, संगोपन जे काही , हे निर्व्याज्य असते. -- म्हणुनच तुमच्या "सरस्विटी" या दिव्य नावाचं कौतुक केलं ना आम्हि. >>मुलांनी काहि द्यावे, वृद्धावस्थेत सांभाळावे असे काही नसते. तुमचे दिव्य इचार वाचून ड्वॉळे पानावले -- हॅ हॅ हॅ. आपले दिव्य विचार दुसर्‍याच्या हवाली करण्याचा तुमच्या मनाचा मोठेपणा बघुन आमचे डोळे थोडेफार पाणावलेच बघा. असते प्रतिभा एकेकाची. >>तुम्हि सासु-सुनांचे डेली सोप फार गंभिरपणे पाहता असे दिसते, -- नाहि बॉ. तुमचे वृद्धाश्रमावरचे विचार वाचले... म्हटलं आपलेही दोन पैसे टाकावे... >>मुलग्याचा रोल महत्वाचा असतो, मी रक्ताच्या मातृत्वा विषयीचा दांभिकपणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, अर्थात तुम्हाला त्याचे महत्व किती यावर सर्व अवलंबून असते. -- मी मातृत्वाच्या भव्यतेची, तिच्या क्षमाशिलतेची थोरवी गायचा प्रयत्न करतोय. त्याचे तुम्हाला महत्व असावे असं पुर्वग्रह लक्षीत/दुर्लक्षीत धरुन चालतोय.. कसं... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

सारवासारव

अजातशत्रु
Tue, 05/22/2012 - 10:51 नवीन
हॅ हॅ हॅ. म्हणुनच तुम्ही कुठल्याली नावाने हाका मारा, तिचे मातृत्व आटत नाहि हा मुख्य मुद्दा.
तुलना प्रतिकांमधे चालू होती ना ...नावाचा मुद्दा कसा काय आला? :stare: इतर प्रतिवादहि याच पठडितले तेव्हा ..आणखी पुढे हा हा हू हू करण्यात स्वारस्य नाही. असो . . . . . . (:tired:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मुद्दा नावाने पुकारण्याचाच होता (व्हेरी सिंपल) !!

अर्धवटराव
Tue, 05/22/2012 - 20:22 नवीन
प्रतिके वगैरे विषय काढुन ( आधीच भरकटलेला) धागा (अधीक) भरकटवाचा आमचा अजीबाद (कु)उद्देश नव्हता. तुम्ही ज्याप्रेमाने (वा कुठल्याही भावनेने) "सरस्विटी" हे नाव वापरले ते आम्हाला प्रचंड भावले आणि आम्हि त्याचीच दाद दिली. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

पुरावे

कवटी
Wed, 05/23/2012 - 11:07 नवीन
तेवढं ते २ % ब्रह्मवृंदाच्या करमणूकीसाठी ते पुस्तक छापल होत आणि पुस्तक छापायच्या मागे भाजपचा हात होता त्याचे पुरावे देतायना? नाही म्हण्जे तुम्ही पुरावे शोधत असाल आणि त्याला वेळ लागेल हे मान्य. पण इकडच्या कुजकट लोकांच्या नासक्या प्रतिक्रीयांना उत्तरे देतादेता विसराल म्हणून आठवण केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

मिस्टर स्केलेटन..

कौतिक राव
गुरुवार, 05/24/2012 - 09:53 नवीन
अहो हे असले वाचाळ लोक .. यान्ना आज काय बोल्ले ते उद्या विचारले तर आठवणार नाही... आणि कणीतरी सान्गुन गेलेच आहे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. म्हणून ही लोक क्रिया कराय्च्या ऐवजी प्रतिक्रिया करतात.. आणि त्याचे परिणाम अल्प्सन्ख्य असलेल्या तुमच्या ब्रह्मवृंदाना भोगावे लागतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Wed, 05/16/2012 - 12:27 नवीन
हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार?
पण हुसेनला मारहाण झाल्याचे, त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे, ते चित्र मागे घ्यायला त्याच्यावरती दबाव आल्याचे कुठे ऐकण्यात नाही बॉ. बाकी आता तुम्ही चर्चेचा मुद्दा सोडून फाटे फोडायला लागल्याने तुमचा पाठलाग बंद केला आहे. भागोमोहनप्यारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

आपण(च फक्त) सेक्कुलर ना...

टवाळ कार्टा
Wed, 05/16/2012 - 15:49 नवीन
आपण(च फक्त) सेक्कुलर ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>>>>हायला, असेच म्हणायचे

गणामास्तर
Wed, 05/16/2012 - 19:23 नवीन
>>>>>हायला, असेच म्हणायचे झाले तर हुसेनच्या चित्रावर सरस्वती देवीनेही आक्षेप घेतलेला नाही. त्याचं काय करणार? हाच न्याय सगळीकडे लावायचा म्हणाल तर डॅनिश वृत्तपत्रामध्ये जेव्हा पैगंबरांचे व्यंगचित्र छापले गेले होते, तेव्हा तरी कुठे पैगंबरांनी आक्षेप घेतला होता? तरी पण झालीच ना जगभर जाळपोळ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

जगात काय बी झाले तरी चुक कुणाचि तर...

कौतिक राव
Sun, 05/20/2012 - 11:52 नवीन
ब्रह्मव्रुन्दा ची... सही,,,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

एकच प्रश्न तुम्हाला स्वताला

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/17/2012 - 14:30 नवीन
एकच प्रश्न तुम्हाला स्वताला त्या व्यंगचित्रामधे काय खटकले ते फक्त सान्गाल काय? (माझी बुध्धी कदाचित कमी पडते आहे त्या व्यंगचित्रामधले वाइट शोधायला) मला पण पटले तर मी सुध्धा निषेध करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

बहु संख्यांचे म्हणणे चित्र

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 05/19/2012 - 11:50 नवीन
बहु संख्यांचे म्हणणे चित्र नको असे असेल तर सरकारचा पैसा, कागद, शाई का व्यर्थ वाया घालवायची? भाजपाने स्वतःच्या खर्चातून अशी एडिशन छापावी आणि जनतेला वाटावी.
सगळेच निर्णय बहुमताने घ्यायचे का आता ? मग असे करूया, पुढील अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवण्यासाठी देशव्यापी कौल काढूया डीटेल. आणि अहो आधीच छापून झालेल्या पुस्तकांमुळे पैसा वाया कसा जाईल ? उलट ते व्यंगचित्र काढून टाकण्यासाठी इतकी पुस्तके परत प्रिंट करावी लागतील. आता तुमच्याच तर्कशास्त्राप्रमाणे हा खर्च कुणी करायचा? बसप ने ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

बहुसंख्य पुस्तकाना कसला

JAGOMOHANPYARE
Sat, 05/19/2012 - 12:20 नवीन
बहुसंख्य पुस्तकाना कसला विरोध होत नाही, याचा अर्थ ती बहुसंख्याना मान्य असतातच. कौल काढायची गरज नसते. पाठ्यपुस्तके एकदम ५० वर्शाची नसतात छापत, ज्या त्या वर्षाचीच असतात.. फारसे नुस्कान होणार नाही. काळल्जी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मे महिना अर्धा झाला. पुढच्या

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/20/2012 - 00:24 नवीन
मे महिना अर्धा झाला. पुढच्या वर्षीची पुस्तके छापून तयार असतील असा माझा अंदाज आहे. करणार बसप खर्च ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

बहु संख्यांचे म्हणणे असेही

अजातशत्रु
Sat, 05/19/2012 - 16:15 नवीन
बहु संख्यांच्या जागी बहुजन वाचावे. बहु संख्यांचे म्हणणे असेही आहे कि, 'शिवाजीच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पाठ्यक्रमास लावावे. जेणेकरुन मुलांना इतीहास हा विषय 'समजून' घेणे सोप्पे जाईल, असे काल कुणी तरी चेपुवर बोलत होते, छपाई खर्च अर्थात ब्रिगेडच करेल. इथल्या काहि स्वयंघोषित विद्वानांना " खेडेकरांचे - शिवाजीच्या बदनामीची केंद्रे" या पुस्तकाचा सोयीस्करपणे विसर पडलेला आहे असे दिसतेय. त्यामुळे आठवण करुन दिली , बाकि काही नाही :-) . . . . . . ( हुसेन भक्त टरकूराम )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बहु संख्यांचे म्हणणे असेही

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/20/2012 - 00:24 नवीन
बहु संख्यांचे म्हणणे असेही आहे कि, 'शिवाजीच्या बदनामीची केंद्रे' हे पुस्तक पाठ्यक्रमास लावावे.
कोण हे बहुसंख्य ? मुठभर ब्रिगेडी कुठल्याही समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. उगाच स्वत:च स्वत:ला बहुसंख्य म्हणून घ्यायचे म्हणजे कमाल आहे. पार्श्वभागाला गोमय लावल्याने वृषभ होता येत नाही राव !!
छपाई खर्च अर्थात ब्रिगेडच करेल.
करेल नाही तर काय. हरामाचा पैसा आहे, हरामखोरीच्या कामीच खर्च होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

अजातशत्रू आठवलेन्चा हस्तक आहे असे वाटते??

कौतिक राव
Sun, 05/20/2012 - 11:56 नवीन
अजातशत्रू आठवलेन्चा हस्तक आहे असे वाटते??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

शेणाचा पो हा शेणाचा पो असतो,

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/20/2012 - 18:24 नवीन
शेणाचा पो हा शेणाचा पो असतो, मग ते शेण कुठल्या गाईचे किंवा बैलाचे आहे त्यात मला रस नाही :-) शेणाचा पो जमीन सारवायच्या किंवा खत बनवण्याच्या तरी कामी येतो. इथे त्याची उपमा दिल्याने त्याचा अपमान झाला असल्याने मी समस्त शेणाच्या पोंची माफी मागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

....

JAGOMOHANPYARE
Sun, 05/20/2012 - 22:05 नवीन
आधी लिहायचं, मग माफीही मागायची.. हे असं करतात म्हणुनच ब्रह्मसमंध दणके खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

भाजपा?

कापूसकोन्ड्या
Sat, 05/19/2012 - 21:54 नवीन
आता भाजपा कुठे आले? तुम्ही दिग्विजय सिंगचे शिष्य काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

सरकार आठवले आदि मंडळींचा छान

अनुप ढेरे
Wed, 05/16/2012 - 13:27 नवीन
सरकार आठवले आदि मंडळींचा छान वापर करुन घेते. अडचणीत सापडले कि असं काहितरी काढायचं. गेली ६ वर्ष हे चित्र आहे. आत्ताच कसे हे जागे झाले?
  • Log in or register to post comments

एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी

ऋषिकेश
Wed, 05/16/2012 - 15:20 नवीन
एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी आरोळी दिली की शहानिशा न करता झुंज सुरू करायची अशी आपली प्रंपराच हाये नाहि का?' अबक' सतत बदलत असतात इतकेच!
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Wed, 05/16/2012 - 20:22 नवीन
अबक' सतत बदलत असतात इतकेच!
सत्यवचन - (कुठलीही आरोळी ऐकू न येणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

१ नम्बर!!

कौतिक राव
Sun, 05/20/2012 - 11:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा