आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :)
------------------------------------------------------------------------------------------------
नको देव राया , राज्यसभा पाहू !
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !
विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे !
तूला काय जाहले, अरे देवा !
तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे -
नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
रचना - संत कान्होपात्रा
संगीत : आनंदघन
चित्रपट - साधी माणसं
प्रतिक्रिया
27 Apr 2012 - 2:01 pm | मेघवेडा
हा हा हा हा! हे बेष्ट! असंच होणार आहे..
27 Apr 2012 - 2:12 pm | गणपा
हा हा हा.
मस्तच हो केळकर साहेब.
27 Apr 2012 - 2:44 pm | चिंतामणी
चान चान.
27 Apr 2012 - 2:50 pm | बॅटमॅन
>>तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
अगदी!!!!
>>निवृतीची आस, दिसते आम्हास !
घेई जहिरात आपुल्या कवेत !!
बेक्कार* विडंबन!!!! खल्लास!
* हा शब्द बर्याच वर्तुळांत कौतुकार्थाने वापरला जातो याची नोंद घेणे.
27 Apr 2012 - 2:55 pm | निश
केळकर साहेब, अफलातुन कविता आहे.
पण सचिन सारखी अतिशय चांगली देव माणस जाउ देत राज्यसभेवर कारण तिथे तो खरच अतिशय चांगल काम करेल.
27 Apr 2012 - 2:56 pm | JAGOMOHANPYARE
हेच जर भाजपाने उमेदवारी दिली असती तर केळकराना ही कविता सुचली असती का? सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल.
:)
खा.. http://i01.i.aliimg.com/photo/v0/110970375/Eno_Fruit_Salt.jpg
27 Apr 2012 - 3:04 pm | अमोल केळकर
अरे इथेही भ्रमवृंद :) असो
27 Apr 2012 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार
प्रतिसाद अतिशय आवडला.
तुम्ही तुमचे सदस्यनाम बदलून 'MAROBRAHMINSARE' असे का घेत नाही. अगदी योग्य दिसेल तुमच्या विचार आणि लेखन शैलीला.
27 Apr 2012 - 3:39 pm | अमोल केळकर
+ १
28 Apr 2012 - 9:24 am | सोत्रि
- (खुर्चीतुन सांडलेला) सोकाजी
30 Apr 2012 - 6:43 am | कौतिक राव
खल्लास
लई भारीईईईईईईईईईई
१ नम्बर..
प्रतिक्रियान्चा राजा
हि सगळी विशेषण लावावी लागतील अशि फाडू प्रतीक्रिया दिली आहे तुम्ही...
30 Apr 2012 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल.
जागो मोहन प्यारे, लै निब्बर हाणलाय राव. आवडले.
'भ्रमवृंद' शब्द लै म्हणजे लैच आवडला. :)
-दिलीप बिरुटे
30 Apr 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
'समतोल विचारसरणी' म्हणून ज्यांची संपादक पदी निवड झाली आहे, अशा एका प्राध्यापक साहेबांनी अशा जातीवाचक प्रतिक्रियेचे उघड कौतुक करावे ?
खेद वाटला.
असो....
30 Apr 2012 - 12:06 pm | गवि
तात्विकदृष्ट्या अशा एका शब्दाच्या कौतुकाने पुढे सर्वबाजूंनी सतरा नवे शब्द उभे राहण्यास वाव दीड वाव मिळतो असं वाटतं.
बाकी सर्वांची एकत्रित इच्छा...
30 Apr 2012 - 1:01 pm | JAGOMOHANPYARE
यात जातीवाचक काय आहे? भ्रम ही जात आहे का?
30 Apr 2012 - 3:29 pm | मृत्युन्जय
'भ्रमवृंद' शब्द वापरल्याबद्दल जामोप्याचे अभिनंदन तुम्हाला का करावेसे वाटले?
हा कोणाला निब्बर हाणला आहे असे तुम्हाला वाटते?
भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून म्हणजे नक्की कोणाच्या नाकावर टिच्चुन?
30 Apr 2012 - 9:23 pm | सोत्रि
हे आणि असे बरेच काही प्रश्न डोक्यात वळवलले होते, पण उत्तर येणार नाही अशी खात्री असल्यामुळे ते इथे विचारून काही अर्थ नाही. असोच...
- ('भ्रमा'चा भोपळा न फुटलेला) सोकाजी
30 Apr 2012 - 10:01 pm | अमोल खरे
ब्राम्हणांना शिव्या देणं सर्वात सोप्पं आहे. बाकी सर्वांचे ठीक आहे पण बिरुट्यांनी संपादक असुनही असे विधाने करावे त्याचे दु:ख आहे. अर्थात मी कोकणस्थ ब्राम्हण असल्याचा मला तुफान अभिमान आहे आणि कोणी कितिही बोलले तरी तो कायमच राहणार हे ही लिहुन घ्या.
30 Apr 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे, इतके हळवे होऊ नका. मी काही कोणाला शिव्या-बिव्या दिलेल्या नाही. बाकी, आपल्या तुफान अभिमानाचं कौतुकच आहे. ''भ्रमवृंद'' शब्दाचा अर्थ घेतला तर कोणत्याही '' विपरित ज्ञानाच्या किंवा केवळ भ्रम असलेल्या समुदायाबद्दल' हा शब्द वापरता येईल. तो शब्द एका विशिष्ट समुदायाबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी.
-दिलीप बिरुटे
1 May 2012 - 1:18 am | JAGOMOHANPYARE
सहमत..
भ्रमाचा काहीतरी जातीवाचक अर्थ घेऊन उगाचच ब्रह्मघोटाळा कशापायी करायचा? :)
( ब्रह्मघोटाळा या शब्दातून कोणता जातीवाचक अर्थ कुणी घेऊ नये ही अपेक्षा. :) )
1 May 2012 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
आता मला कळाले की डॉक्टरेट मिळून सुद्धा आमचे रराशेठ नावामागे डॉ. का लावत नाहीत. :)
अर्थात डॉक्टरेट हा शब्द एका विशिष्ट व्यक्तिबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी.
30 Apr 2012 - 3:52 pm | JAGOMOHANPYARE
आवडला तर तुम्हीही बिनधास्त वापरा... :)
30 Apr 2012 - 11:00 pm | मृगनयनी
"१४ एप्रिल २०१२" या शुभदिनी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार कॉन्ग्रेस आय'चे माननीय सचिव- "राहुल'जी गान्धी" यांनी ते स्वतः ब्राह्मण असल्याचा दावा / वादा केलेला आहे.. :) ( त्यांची आई इटालियन, वडील - राजीव'जी गान्धी पारशी असताना.. आणि राहुलजींची लॉन्ग टर्म बायको/ मैत्रीण- अफगाणी मुस्लिम असताना) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ;) ;) ;)
http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-14/india/31341536_1_...
इट्स सो इर्रिटेटिन्ग ना!!!!...;) "ब्राह्मण" म्हणवून घेण्यासाठी, त्यांच्या सवयी आत्मसात करण्यासाठी गान्धी घराण्यातले लोकही किती तरसत असतात!.. तिथे सामान्यांचे काय? ;)
भारताचे पहिले पन्तप्रधान- "पन्डित जवाहरलाल नेहरु" उर्फ आपले सगळ्यांचे लाडके "नेहरू चिचा"
(माझ्या लाडक्या राजीव'जींचे मॅटर्नल ग्रॅन्डपा ;) ) - हे देखील जन्माने काश्मिरी ब्राह्मण होते... बहुधा राहुलबाबा'ला १४ एप्रिल'ला याची आठवण आली असावी!!!
:)
1 May 2012 - 8:31 pm | अँग्री बर्ड
तुमची इतर संस्थळांवरची मळमळ वाचून आहे. त्यामुळे असल्याच प्रतिसादांची अपेक्षा होती. हरकत नाही एरवी नाहीतरी जवळ येणाऱ्या राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा मराठी मुजाहिदीन उर्फ मंबाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी परत "वाघ्या कुत्र्याचा पुतळा हलवा" ची आरोळी दिलेलीच आहे, आम्ही पण तिकडे सर्वजण जातीनिशी हजर असू, तुम्ही पण या. बाकी आम्हाला इनोचा पर्याय सुचवण्यापेक्षा तुम्हीच मोठ्या मात्रेत जमालगोटा घ्या, शतकानुशतके साठवून ठेवलेले बाहेर पडले तर उत्तमच.
1 May 2012 - 10:18 pm | JAGOMOHANPYARE
मी ब्रिगेडी नाही.... ( ब्रह्मवृंदात जन्मलेल्या मला ब्रिगेडी लोक कशाला घेतील? :) )
1 May 2012 - 10:53 pm | मृगनयनी
ह्म्म.. अच्छा!,, म्हणजे तुम्ही आमच्या "ब्रह्मवृन्दा"तले "काफिर" आहात तर! ;) ;) ;)
2 May 2012 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार
हा उपदेश करणारी व्यक्ती आता स्वतःच 'ब्रह्मवृंद' शब्द वापरते आहे हे पाहून अंमळ मौज वाटली. टिमक्या बडवत तुमच्यामागे उदो उदो करत धावणार्यांचा चेहरा बघायला मजा येईल आता.
2 May 2012 - 5:08 pm | इस्पिक राजा
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.
2 May 2012 - 5:08 pm | इस्पिक राजा
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.
2 May 2012 - 5:18 pm | JAGOMOHANPYARE
इथे ब्रह्मवृंद शब्दातून मी माझी जात सांगितलेली आहे.. त्यासाठी हाच शब्द वापरावा लागणार ना?
भ्रमवृंद या शब्दातून कुणी काय अर्थ घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. समोरच्याच्या मेंदूचे स्वातंत्र्य मी कशाला अडवू? :)
2 May 2012 - 5:20 pm | सुहास..
जात म्हणजे काय ?
धन्यवाद
2 May 2012 - 6:24 pm | गणपा
जी मेल्यावरही जाता जात नाही तिच. ;)
27 Apr 2012 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
आवडल्या गेले आहे एकदम.
27 Apr 2012 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रासंगिक कवितेत 'करुण' भावना उत्तम उतरल्या आहेत. :)
च्यायला, दिवस उगवला की सचिन, दिवस मावळला की सचिन.
एक बरं दिसलं 'राष्ट्रपती पदासाठी' अजून आपल्या देवाची चर्चा सुरु नाही. :)
-दिलीप बिरुटे
27 Apr 2012 - 3:11 pm | गणपा
'त्या' पदासाठी आम्ही त्याचे नाव आधीच सुचवले आहे. ;)
27 Apr 2012 - 3:19 pm | सुहास..
एक बरं दिसलं 'राष्ट्रपती पदासाठी' अजून आपल्या देवाची चर्चा सुरु नाही. >>>
३३ कोटी कमी पडले ;)
30 Apr 2012 - 1:17 pm | मृगनयनी
३३ कोटी कमी पडले Wink
:( हे काय सुहास'जी.... तुम्हाला सचिन टेन्दुलकर बद्दल असं काही बोलताना काहीच्च कसं वाटत नाही!!! तो कोट्याधीश आहे.. म्हणून असा सारखा सारखा उद्धार करायचा का? सचिनला नावे ठेवणारा म्हणजे या देशाचा शत्रूच असतो..इतकेच नव्हे.. तर त्याच्यावर देशद्रोही असल्याचा गुन्हा दाखल होऊ शक्तो बर्र का!!!हे साधे समीकरण आहे...
तुमच्या सारख्या प्वॉटात दुखत असेल.. तर कायम चूर्ण घ्या!! ;)
"आपल्या" माणसाबद्दल कुणी असं बोल्तं कं.. इतर धागे पहा.. किती बुरबुरून स्तुती करताहेत सगळे आपल्या "देवा"ची.... तुम्ही अश्या त्यांच्या बावणा दुखवू शकत नाही!!! =)) =)) =)) =)) =))
आणि क्रिकेटमदून निर्वृत्त झाल्यावर "सचिन"सारख्या देवानी काय करायंचं ? आपली क्रिकेटची बॅट किन्वा कॅप लिलावात काढून मिळणारे पैसे, डॉलर्स सचिन मोठ्ठ्ठ्य्या मनाने दान करतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
निवृत्त झाल्यावर मग दानधर्म करण्यासाठी त्याला आपला बैन्क बैलन्स शेक करावा लागेल.. मग त्याच्या खिशाला तोशीस लागेल... ओह्ह्ह मा$$$ गॉड्श्श्श्!! ..... ;) ;) ;)
अशी "देवा" ला स्वतःचीच दानपेटी कशी बरं फोडू द्यायची ? ;) त्यामुळे सचिनला राज्यसभेवर आणण्याचा कॉन्ग्रेस'चा आणि प्रतिभातैंचा निर्णय अतिस्तुत्यच आहे....
तो सेलेब्रिटी आहे... एक आयकॉन आहे.. म्हणजे तो सामान्य माणसापेक्षा वेगळा आहे.. असे अजिबात मानायचे नाही... सामान्य माणसे जशी आपल्या अत्रुप्त इच्च्च्चा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलम्ब करतात.. तसाच सचिनही करतो!! .. फरक इतकाच की सामन्य लोकांच्या व्यथा मिडियावाले टीव्ही वरती दाखवित नाही.. हलकट साले! ;) .. आणि सचिनच्या व्यथा मात्र जास्तीत जास्त फूटेज देऊन दाखविल्या जातात!!!.
४०० स्क्वे. फूटाच्या एक्स्टृऑ जागेमुळे सामान्य माणसाला जेवढा आनन्द होतो.. तेवढाच्च आनन्द सचिनलाही होतो. हे कृपया कुणीही विसरू नये!!! ;) ;) =)) =))
उलट आमची मागणी आहे, की सचिन'ला "राष्ट्रपती"च्च बणवा... आणि तो पुण्यातला की खडकी'तला बान्धकाम थाम्बवलेला प्रतिभा पाटलांचा बन्गला सगळ्यांनी मोठ्ठ्या मणाने सचिनला गिफ्ट देऊन टाका!!!..
:) :)
30 Apr 2012 - 2:52 pm | सुहास..
विठ्ठला sssssss
.
.
.
.
कोणता झेंडा घेवु हाती ;)
27 Apr 2012 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !
27 Apr 2012 - 4:37 pm | प्रचेतस
लै भारी.
27 Apr 2012 - 4:45 pm | विकास
अंतस्थ बातमी: दिल्लीदरबारी खलबते चालली होती... चिंता होती, आपल्या पॉप्यूलॅरीटीस काय झाले? शेवटी कळले की ती मुंबईतील एक व्यक्ती हडप करत आहे. मग उपाय दोनः एक आपण तिच्यासारखे त्यातल्या त्यातला सोपा मार्ग शोधला... (मधे येथेच वाचल्याप्रमाणे गांधीजी म्हणाले होते की अवघड मार्ग सहसा बरोबर असतो... ;) )
27 Apr 2012 - 6:31 pm | अजितजी
शेअर करते इतर ठिकाणी तुमच्या नवा सकट ----अंजली गद्रे
27 Apr 2012 - 8:20 pm | अमोल केळकर
धन्यवाद :)
27 Apr 2012 - 9:33 pm | JAGOMOHANPYARE
केळकर मामा,
तुम्ही भविष्य, कुंडल्या बघता म्हणे... सचिन तुम्हाला असा धक्का देणार आहे हे आधी कुठल्या ग्रहाने किंवा राशीने नाही का सांगितले? :)
सचिनची खासदारकी नक्की आहे ना? नाहीतर या केळकराची अभद्र नजर लागायची आणि तो उद्या नकार द्यायचा! :(
27 Apr 2012 - 11:34 pm | पैसा
पण तुम्हा आम्हाला कोण विचारतोय?
28 Apr 2012 - 12:08 am | यकु
मस्त जमलंय.
28 Apr 2012 - 9:14 am | अमितसांगली
मस्त मस्त....