✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दुष्काळाच्या झळा

प — पाषाणभेद, Tue, 04/24/2012 - 06:26
दुष्काळाच्या झळा दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा पुर्वप्रकाशित - पाषाणभेद

प्रतिक्रिया द्या
1483 वाचन

💬 प्रतिसाद (5)

दुष्काळाचं दाहक वर्णन एकदम

प्रचेतस
Tue, 04/24/2012 - 06:50 नवीन
दुष्काळाचं दाहक वर्णन एकदम जीवंतपणे उतरलवत पाभे.
  • Log in or register to post comments

भयावह

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/24/2012 - 10:00 नवीन
भयावह परिस्थितीचे वर्णन यथार्थ उतरले आहे.
  • Log in or register to post comments

भिडल मनाला !!!!

पियुशा
Tue, 04/24/2012 - 12:37 नवीन
भिडल मनाला !!!!
  • Log in or register to post comments

सुरेख..

प्रभाकर पेठकर
Tue, 04/24/2012 - 16:04 नवीन
व्यथित मनाच्या वेदना. मन, सर्वार्थाने, हेलाऊन टाकणार्‍या.
  • Log in or register to post comments

@कोरड्या मातीमध्ये कसे कसावे

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/24/2012 - 16:23 नवीन
@कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून... >>> हे तर तंतोतंत लागु पडणारं रुपक आहे. --^-- @दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई >>> दुष्काळग्रस्तांच्या उरातली धग समोर आणलीत पा.भे... सलाम तुम्हाला ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा