Skip to main content

भळ्ळकन ..

गवि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला.. कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार.. डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा.. कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(पूर्वप्रकाशित)
इनिगोय

अपेक्षाभंग. ३-४ वर्षांपूर्वी "लिहिलेले" (सुचलेले नव्हे) आहे, म्हणून असे झाले असावे, अशी समजूत घालून घेतली आहे.. आदरपूर्वक..
11/04/2012 - 18:03 Permalink
परिकथेतील राजकुमार

सुभाष घई आणि त्रिमुर्तीची आठवण झाली. किंवा रामगोपाल वर्मा आणि राम गोपाल वर्मा की आग म्हणले तरी चालेल. गवि ह्यांनी तातडीने टंचनिकेला कामाला लावून काहितरी सुखद व सकस लिहून ह्या पापाचे प्रायश्चित करावे. पराशास्त्री प्रभुणे
11/04/2012 - 18:27 Permalink
पिवळा डांबिस

मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! पण असं का हो? खुल्ला आवाज द्यायचा ना त्या सूर्व्याला!!! सालं एका गगनविहार्‍याने दुसर्‍या गगनविहार्‍याला असं नडायचं म्हणजे काय? भाईचारा भी कोई चीज होती है, जनाब!! :)
12/04/2012 - 04:55 Permalink
पैसा

हायड्रोजन दिवा निघाला तो! काय लोकहो, गविना टाइपकास्ट कशाला करताय हो? वेगवेगळ्या प्रयोगांची मजा घ्या जरा!
11/04/2012 - 21:58 Permalink
धनंजय

In reply to by नंदन

+०.७५ प्रसंग भावनांचा उद्रेक करणारा असू शकतो. (-०.२५ कशाला? गविंच्या कौशल्याच्या मानाने फुसके.)
12/04/2012 - 23:35 Permalink
चाफा

पैसा + १ एखाद्याला एकाच प्रकारच्या लेखनात अडकवून ठेवण्यासारखे पाप नाही दुसरे ;)
11/04/2012 - 22:21 Permalink
बाळ सप्रे

अहो जरी सूर्याऐवजी खरा हॅलोजन असता तरी... दिवसा हॅलोजन लाईट लावला म्हणून लगेच "काळ्या पैशाची पैदास" अहो पुढे जाउ द्या म्हणून सिग्नल दिलेला असू शकतो.. गविंचा आयडी हॅक झाल्याची शंका नाही.. खात्री आहे... ओरिजिनल गवि, please confirm .
12/04/2012 - 12:41 Permalink
गवि

In reply to by बाळ सप्रे

दिवसा हॅलोजन लाईट लावला म्हणून लगेच "काळ्या पैशाची पैदास" अहो पुढे जाउ द्या म्हणून सिग्नल दिलेला असू शकतो..
असू शकतो.. लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण आणि संतुलित विचारांचाच असला पाहिजे का?
12/04/2012 - 12:58 Permalink
तुमचा अभिषेक

In reply to by शैलेन्द्र

"लेखक हा चांगल्या न्यायपूर्ण आणि संतुलित विचारांचाच असला पाहिजे का?" क्या बात है ! +७८६ अन्यायपुर्ण आणि असंतुलित विचारसरणी तशीच म्हणून पोहोचवणे हे लेखकाचे यशच !
04/05/2014 - 01:38 Permalink
ऋषिकेश

म्हंजे तु 'सूर्य पाहिलेला माणूस' झालास तर! ;) जोक्स अपार्ट, स्फूट अतिशय आवडलं.. मनाची आंदोलने, (उगाच असणारा) न्यूनगंड, त्या न्यूनातही विसावलेला अहंगंड सारे काही थोडक्या शब्दांत मस्त फुलवले आहे.. लगे रहो!
12/04/2012 - 13:39 Permalink
माझीही शॅम्पेन

तांत्रीक उहापोह न करता समजून घ्यायचा प्रयत्न केला .. एवढाच अर्थ निघाला की आपल्या-पैकी कोणीही कधीही चुकू शकतो , सदैव दुसर्याला दोष देण्यात काही अर्थ नाही
04/05/2014 - 07:53 Permalink