वळण
आयुष्याच्या वळणवर, वळताना
नजर गेली इथवरच्या मार्गावरती
दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे
कधी योग्य, कधी अयोग्य
कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध
भयभीत वा निर्भिड
थबकलो क्षणभर,
स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले
हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे
..पण अगदि सत्य
शहारलो,
किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला..
वाट माझी खुणवत होती
मन मात्र सुन्न होत्
सावरलो,
अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला
पूढच्या वळणावर थबकण्या करता..
कविता आवडली!
:)
पू. ले. शु.
छान
पुलेशु
सिंहावलोकन