Skip to main content

नभांगण...!!

लेखक वेणू
गुरुवार, 15/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सुरावटींनी सजलेल्या, तर कधी उधळल्या गेलेल्या मैफिली.... घमघमलेली सांजरात अन् अर्धोन्मिलीत मोगरा.... 'आठवतंय का ते?'- सालांनंतरच्या भेटीतला, तुझा निरागस प्रश्न तेच, विस्मयी डोळे न् दुमडलेले ओठ! तुला विचारायचेच राहून गेले कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...? तू नेहमीच काठाशी वावरणारी..... 'अपनी धुन में मस्त' असं अधोरेखित जगणारी... जितकं तुला ओढू पाहिलं, अडकवु पाहिलं, तितकी निसटत गेलेली... 'बांधील प्रेमाचा व्यापार का?' ह्याच भोवती धुमसणारी समजलो नव्हतो, बंधनात अडकणारी तू नाहीस, जितकं स्वातंत्र्य नात्यात, तितकी माझी होशील ते! उमजताच, आलो हाक मारायला तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस.... हाका पोकळीतच विरल्या....!!
लेखनविषय:

वाचने 2240
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत असं म्हणणार होते, पण मग लक्षात आलं, गेल्या वर्षी तुम्ही एक कविता प्रकाशित करून गायब झालात! कविता चांगल्या आहेत दोन्ही. नियमित लिहीत चला.

कविता आवडली. चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा

In reply to by प्रचेतस

चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा ओ वल्ली आम्ही बे काम झालो त्याच काय..? ;) आत्ता जरा कुठे चांगल चालल होत अन लगेच ही बेकारी... :sad: :sad: :sad:

सुंदर रचना जमलिये.. :-) @चला, मागच्या काही दिवसांत पडलेल्या घाऊक विडंबनांचा योग्य परिणाम झालाय म्हणायचा>>> येस दॅट्स दी वर्क +++++++++ ११११११११११११११ @आत्ता जरा कुठे चांगल चालल होत अन लगेच ही बेकारी... >> आंम्हाला पूर्ण बेकार रहाण्यात अतिशय आनंद आहे...

In reply to by अत्रुप्त आत्मा

आंम्हाला पूर्ण बेकार रहाण्यात अतिशय आनंद आहे... आपणा मुळेच आम्हि देखिल 'बेक्कार' झालो आहोत... ;) मोठे सांगत होते , संगत चांगली ठेव !! पण ऐकल नाही . :) अन आता आम्हाला सुद्धा बेकार रहाण्यात अतिशय समाधान आहे... :) :)

मला कविता कळलीच नाही माझी मति पळलीच नाही पंचाईत माझी टळलीच नाही काव्य दृष्टी मजकडे वळलीच नाही

आवडली.

धुळवड अजून संपलेली नसल्यामुळे जिकडे तिकडे पिचकार्‍या मारणं चालू असताना एक छान कविता वाचायला मिळाली.