सुरावटींनी सजलेल्या, तर कधी
उधळल्या गेलेल्या मैफिली....
घमघमलेली सांजरात अन्
अर्धोन्मिलीत मोगरा....
'आठवतंय का ते?'-
सालांनंतरच्या भेटीतला,
तुझा निरागस प्रश्न
तेच, विस्मयी डोळे न्
दुमडलेले ओठ!
तुला विचारायचेच राहून गेले
कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...?
तू नेहमीच काठाशी वावरणारी.....
'अपनी धुन में मस्त'
असं अधोरेखित जगणारी...
जितकं तुला ओढू पाहिलं,
अडकवु पाहिलं,
तितकी निसटत गेलेली...
'बांधील प्रेमाचा व्यापार का?'
ह्याच भोवती धुमसणारी
समजलो नव्हतो,
बंधनात अडकणारी तू नाहीस,
जितकं स्वातंत्र्य नात्यात,
तितकी माझी होशील ते!
उमजताच, आलो हाक मारायला
तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस....
हाका पोकळीतच विरल्या....!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2240
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान मुक्तक
(No subject)
खरच छान .....
कविता आवडली. चला, मागच्या
चला, मागच्या काही दिवसांत
In reply to कविता आवडली. चला, मागच्या by प्रचेतस
छान आहे कविता
सुंदर रचना जमलिये.. @चला,
आंम्हाला पूर्ण बेकार रहाण्यात
In reply to सुंदर रचना जमलिये.. @चला, by अत्रुप्त आत्मा
अप्रतिम .. शब्दांची रचना
मला काही कळले नाही
फारच छान कविता... प्रेमाच्या
सुंदर!!
ब्येष्ट...!
तुम्हां सगळ्यांचे
सुंदर कविता !!!