Skip to main content

मंत्रालयाच्या दारातल्या उपेक्षिताचं मनोगतं

लेखक रघु सावंत यांनी रविवार, 11/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
१०/०५/२००५ साली मंत्रालयाच्या दारात एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता .ती घटना इतकी मनात कोरली की आजही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिल कि अंगावर काटा उभा राहतो. ती व्यथा तुमच्या समोर मांडली आहे. मंत्रालयाच्या दारातल्या उपेक्षिताचं मनोगतं शिणलेल्या आयुष्याच्या पार एक दु:खाची किनार ओसाड डोळ्यांतल्या प्रत्येक कडा वारंवार ओल्या करत या वेळी तरी पाऊस पडेल आणि चार दाणे पिकतील फाटक्या छप्पराखाली सुखाचे चार घास पोरं खातील एवढी एकच एक आशा जीवन जगायला लावतं आयूष्याची लक्तर झालीत लक्तरचं लक्तर अशिक्षित असलो तरी मोजता येतात या डोळ्यांना उघडया पोटच्या पोरांच्या बरगड्यान बरगड्या आमच्या वयाचा छाती पुढे करुन आम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा आम्ही जास्त उन्हाळे बघितले अनं काढले आमची पाठ आणि पोट एक झालेत उन्हाळेच उन्हाळे मोजून उभ्या आयुष्यात तुम्ही जेवढे उन्हाळे बघितले नसतील त्यापेक्षा जास्त उन्हाळे आमच्या लेकरांनी सोसलेत पोरगी म्हणते बा पोटाला भाकरीचा तुकडा दे की रे मी म्हणतो सगळ देईन माझ्या लाडक्या तेवढं मागू नको बायको म्हणते काळीज देईन कापून ते सुद्धा सुरकतलेलं देवामायबापा या वेळेला तरी पाऊस पडूदे माझ्या मळ्यात चार दाणे पिकतील पोरं बाळं सुखाचे दोन घास खातील नाहीतर शिणलेल्या आयुष्याच्या पारं एक दु:खाची किनार ओसाड डोळ्यांतल्या प्रत्येक कडा वारंवार ओल्या करतीलचं रघू सावंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2082
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

भयानक वास्तव. हे जग विसरून आम्ही इथे टाईमपास करणे म्हणजे आम्ही सुधारल्याचं लक्षण मानतो आहोत.

In reply to by पैसा

सहमत.

चांगला प्रयत्न. थोडे कष्ट घेऊन सफाई आणता येईल. पण निखळ अभिव्यक्ती म्हणून बोलायचं झालं तर या रचनेला प्रयत्न म्हणणार नाही. शिणलेल्या आयुष्याच्या पार एक दुःखाची किनार ही कल्पना आवडलीच. बरगड्या मोजण्यातून मांडलेलं जगण्याचं गणीतही उत्तम. ओसाड डोळ्याच्या कडा ओल्या होणं हीही कल्पना उत्तम. या तीनच गोष्टींतून व्यक्त होणारी कविता झाली असती तर...? म्हणूनच सफाईची गरज आहे, असं म्हटलं. :)

In reply to by श्रावण मोडक

अगदी....तस्सच !

In reply to by श्रावण मोडक

साहेब मि मनापासून प्रयत्न करिन

.

अहो श्रावन, तुम्हि आनुन दाखव सफाइ

धन्यवाद साहेब , तरीच मी विचार करत होतो. लिखाणाच्या बाजूला "अपडेटेड " कसं काय हायलाईट होत आहे. अशीच साथ सोबत करा आणि मला तुमच्या पंक्तीत येऊ द्या , "काठी नि घोंगड घेउद्या कि वं ,मला बि जत्रंला येउद्या कि वं"