१०/०५/२००५ साली मंत्रालयाच्या दारात एका शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता .ती घटना इतकी मनात कोरली की आजही ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिल कि अंगावर काटा उभा राहतो. ती व्यथा तुमच्या समोर मांडली आहे.
मंत्रालयाच्या दारातल्या उपेक्षिताचं मनोगतं
शिणलेल्या आयुष्याच्या पार एक दु:खाची किनार
ओसाड डोळ्यांतल्या प्रत्येक कडा वारंवार ओल्या करत
या वेळी तरी पाऊस पडेल आणि चार दाणे पिकतील
फाटक्या छप्पराखाली सुखाचे चार घास पोरं खातील
एवढी एकच एक आशा जीवन जगायला लावतं
आयूष्याची लक्तर झालीत लक्तरचं लक्तर
अशिक्षित असलो तरी मोजता येतात या डोळ्यांना
उघडया पोटच्या पोरांच्या बरगड्यान बरगड्या
आमच्या वयाचा छाती पुढे करुन आम्हाला सांगतो
तुमच्यापेक्षा आम्ही जास्त उन्हाळे बघितले अनं काढले
आमची पाठ आणि पोट एक झालेत उन्हाळेच उन्हाळे मोजून
उभ्या आयुष्यात तुम्ही जेवढे उन्हाळे बघितले नसतील
त्यापेक्षा जास्त उन्हाळे आमच्या लेकरांनी सोसलेत
पोरगी म्हणते बा पोटाला भाकरीचा तुकडा दे की रे
मी म्हणतो सगळ देईन माझ्या लाडक्या तेवढं मागू नको
बायको म्हणते काळीज देईन कापून ते सुद्धा सुरकतलेलं
देवामायबापा या वेळेला तरी पाऊस पडूदे माझ्या मळ्यात
चार दाणे पिकतील पोरं बाळं सुखाचे दोन घास खातील
नाहीतर शिणलेल्या आयुष्याच्या पारं एक दु:खाची किनार
ओसाड डोळ्यांतल्या प्रत्येक कडा वारंवार ओल्या करतीलचं
रघू सावंत
वाचने
2082
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
.
In reply to :( by पैसा
चांगला
+१
In reply to चांगला by श्रावण मोडक
साहेब
In reply to चांगला by श्रावण मोडक
मस्त हो सावंत भाउ. आवडले...
In reply to साहेब by रघु सावंत
.
उत्तम आहे कविता. त्यामधल्या
..
धन्यवाद साहेबा हो
नि:शब्द