आकाश उजळले होते,,,
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली.
s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>
टीपः- अधिक गझलांसाठी http://www.sureshbhat.in/sbpoetry या वेब साईटवर पहा. भटांच्या अजुन काही गझला तेथे तुंम्हाला भेटतील. => गझलवेडा अन्नू
" आकाश उजळले होते "
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते? मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते----(गझलसम्राट सुरेश भट)
टीपः- अधिक गझलांसाठी http://www.sureshbhat.in/sbpoetry या वेब साईटवर पहा. भटांच्या अजुन काही गझला तेथे तुंम्हाला भेटतील. => गझलवेडा अन्नू

व्वा...व्वा...अन्नू जी,आज
अन्नु,
अर्थातच