मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

हारुन शेख · · जे न देखे रवी...
चाफेकळी नाक होते गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही हेच नशिबात होते (मि.पा. वरील वैय्याकरण्यांनी आणि इतर ज्येष्ठ कवीमंडळीनी वरील गझलेत काही चूक आढळल्यास उदार हृदयाने ती पोटात घालावी अशी विनंती आहे. हि गजल आजच लिहलेली आहे आणि पहिल्यांदाच मिपावर प्रकाशित करत आहे. मागच्या काही दिवसांतील कवींचा उठलेला बाजार बघता हि गझल इथे टाकतांना मनामध्ये भीती आहेच. )

वाचने 2062 वाचनखूण प्रतिक्रिया 13

वाह...व्वा...व्वा..व्वा...! प्रत्येक शेराला सलाम... ---^--- अता कसं बरं वाट्टय...बरेच दिवसानी सुकामेवा तरी मिळाला... अजुन येऊ द्या हो..., (आंम्हाला)जिंकलेले शेख :-) अवांतर- @मागच्या काही दिवसांतील कवींचा उठलेला बाजार बघता हि गझल इथे टाकतांना मनामध्ये भीती आहेच.-अरे शेखसाहब, जिंदादिल को डर कैसा..? वो तो खुले आम जिता है..। पानी हो या शराब,सबके सामने पिता है..॥

In reply to by अत्रुप्त आत्मा

हारुन शेख 03/03/2012 - 09:35
तुम्हाला जिंकून खरच खूप आनंद झाला. पुढची कविता याच्याहून चांगली लिहीन. तुमचीच भीती वाटली होती. आता नाही भिणार. धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------

ajay wankhede 03/03/2012 - 04:35
">डर ना नही...Facebook smileys ........................................................................................................................... ''तू मुझे विरासत मे मिली है ऐ जिंदगी मै तुझे रेल कि पटरी पर कैसे लिटा दुं ऐ जिंदगी '' अजय

In reply to by ajay wankhede

हारुन शेख 03/03/2012 - 09:30
धन्यवाद , आता नाही डरनार. चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याने भीड चेपली. आणि हो तुमच्या स्वाक्षरीतला शेर अव्वल आहे ! -------------------------------------------------------------------------------------------------

सांजसंध्या 03/03/2012 - 05:28
चाफेकळी नाक होते, गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा, ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये, सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले, प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ, सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी, रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात, गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा, कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी, स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी, अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे, उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही, हेच नशिबात होते माफ करा. पण गझल अशा आकृतिबंधात वाचायची सवय आहे. मात्रावृत्त आहे का हे ? मला फारसं कळत नाही , जाणून घ्यायला आवडेल. लहान तोंडी मोठा घास आहे पण स्वप्नांच्या सोपेपणात इथे सोपेपणी हा शब्द लयीत येईल असं वाटतंय. गझलेतला भाव पोहोचला.

In reply to by सांजसंध्या

हारुन शेख 03/03/2012 - 09:25
तुमची सूचना योग्य आहे आणि पुढील वेळेस काळजी घेईन. वृत्त मलाही माहित नाही, पहिला शेर सुचल्यावर पुढचं आपोआप सुचत गेलं. 'सोपेपणात' हा शब्द त्यावेळेस जसा आला तसा लिहिला आहे. शब्द काजव्यान्सारखे चमकत असतात, पुसटशी ओळींची दर्शने होत असतात , आता आहे आता नाही असा सगळा मामला, तेव्हा जे सुचतंय ते उतरवण्याची घाई जास्त असते. आणि आता त्यात बदल करावासा वाटत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

गवि 03/03/2012 - 09:57
मस्त आहे गझल. आणखी उत्तमोत्तम गझला वाचायला मिळतील ही अपेक्षा. ताजा कलम : आम्ही येथे केलेल्या लेले नामक गझलेची दखल फ़ारशी (किंवा अरबी) कोणी घेतली नाही याचा खेद वाटतो. :(