गझल
लेखनविषय:
काव्यरस
चाफेकळी नाक होते
गालावर श्वास होते
डोळे मिटुनीया तेंव्हा
ओठ हे पहात होते
चैत्र होता अंगामध्ये
सूर त्यात रंगलेले
ऊर त्यात रंगलेले
प्रीतगाणे गात होते
उष्ण होती संध्याकाळ
सोनेरी त्या प्रकाशात
प्राजक्ताच्या देठापरी
रंगलेले हात होते
स्वप्नांच्या सोपेपणात
गुंतलेलो होतो मग
वास्तवाचे भान तेंव्हा
कुणाला रहात होते
कुठे गेले वेडे पक्षी
स्मरणांची उरे नक्षी
भग्न झाल्या देवालयी
अंधारून रात होते
तारकांच्या देशाकडे
उन्हांतून जाणे झाले
गवसल्या उल्का काही
हेच नशिबात होते
(मि.पा. वरील वैय्याकरण्यांनी आणि इतर ज्येष्ठ कवीमंडळीनी वरील गझलेत काही चूक आढळल्यास उदार हृदयाने ती पोटात घालावी अशी विनंती आहे. हि गजल आजच लिहलेली आहे आणि पहिल्यांदाच मिपावर प्रकाशित करत आहे.
मागच्या काही दिवसांतील कवींचा उठलेला बाजार बघता हि गझल इथे टाकतांना मनामध्ये भीती आहेच. )
वाचने
2062
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हारून, तुमचा बाजार उठणार
मलाही आवडली. छान काव्य रचले
In reply to मलाही आवडली. छान काव्य रचले by प्रचेतस
वल्ली आणि जयंतजी धन्यवाद.
वाह...व्वा...व्वा..व्वा...!
In reply to वाह...व्वा...व्वा..व्वा...! by अत्रुप्त आत्मा
तुम्हाला जिंकून खरच खूप आनंद झाला.
डर ना नही...
In reply to डर ना नही... by ajay wankhede
आता नाही डरनार
चाफेकळी नाक होते, गालावर
In reply to चाफेकळी नाक होते, गालावर by सांजसंध्या
धन्यवाद !!
मस्त...
मस्त आहे गझल. आणखी उत्तमोत्तम
बहुत खूब मियाँ... (गझल म्हटली
का हो महाराज , अजून काही