वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा!
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||
देव खंडोबा मार्तंड मल्हारी
मणी मल्ल दैत्य संहारी
चढलो नवलाख पायरी
देव आहे जेजुरी गडावरी
जवळ बसली म्हाळसा सुंदरी
नवस देवाचा आता पुरा ग करू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१||
तळी उचलून करू चौक भरणी
परसन्न करू देवाची करणी
माथा झुकवूनी त्याच्या चरणी
बेल भंडार उधळू गगनी
तेजानं दिवटी बुधली ग पेटवू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२||
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||
- वाघ्या पाषाणभेद
वाचने
1607
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर.
छान
जाववु म्हणजे कळाले नाही..
जाववु म्हणजे कळाले
In reply to जाववु म्हणजे कळाले नाही.. by गणेशा
मस्त !
>>>> मिळून जागरण करू... रात