Skip to main content

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/02/2012 05:14 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा! वाघ्या मी मुरळी देवाची ग तू मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ|| देव खंडोबा मार्तंड मल्हारी मणी मल्ल दैत्य संहारी चढलो नवलाख पायरी देव आहे जेजुरी गडावरी जवळ बसली म्हाळसा सुंदरी नवस देवाचा आता पुरा ग करू वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१|| तळी उचलून करू चौक भरणी परसन्न करू देवाची करणी माथा झुकवूनी त्याच्या चरणी बेल भंडार उधळू गगनी तेजानं दिवटी बुधली ग पेटवू वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२|| वाघ्या मी मुरळी देवाची ग तू मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ|| - वाघ्या पाषाणभेद
लेखनविषय:

वाचने 1612
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आता मुरळ्या राहिल्यात कुठे? जागरणंही कमीच झालीत. आताशा वराती ,धेडवा हे म्युझिक सिस्टीमच्या तालावर नाचवले जातात. जागरणातही लंगर तुटेपर्यंत फक्त वाघेच जागे असतात. अवांतर- रात देवाची जावू .इथे व ऐवजी ग हवा होता का?

जाववु म्हणजे कळाले नाही.. बाकी सरव नेहमीप्रमाणे फक्कड .. @ भिडस्त : आताच घरी जागरण झाले. एकदम पुर्वी सारखे.

>>>> मिळून जागरण करू... रात देवाची जाववू मंडळी ते जागवू असेच वाचावे. स्वसंपादनाची सुविधा मला नसल्याने दुरूस्त करता आलेले नाही. वाचक, प्रतिसादकांचे जाहिर आभार. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय मराठी, जय महाराष्ट्र.