Skip to main content

कवितेचा कीड़ा

Published on गुरुवार, 16/02/2012
कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो करितो यमकांची जुळवा-जुळवी ताबा तोंडाचा घेतो फिरतो सैर-भैर तो. कानात बोळे घालूनी भयक्रांत बायको वावरते घरी. पोरे ही म्हणती पपा होतो अभ्यासाचा हर्जा. हातात चोपड़ी पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्याची लाट आटली निस्तब्ध शांती घरी पसरली. आता रात्रीच्या एकांती बैसुनी माझी मीच ऐकतो कविता. आप्त ही म्हणती 'वैनी' गेले हो पार कामातुनी आता. दाखवाहो 'ह्याना' एकदा नेवून वेड्यांच्या इस्पिताळी. वाया गेला एक 'माणूस' लागून कवितेच्या नादी.
लेखनविषय:

वाचन संख्या 1392
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कतिता हा साहित्यप्रकारच असा आहे की तिच्याशी आपले थोडेतरी गुतर्र्र्गुम व्हावे असे प्रत्येकाला वाटते.हौशे नवशे गौशे सारे पळतात तिच्या मागे. आमच्या एका मित्राने " मृदुंगाच्या तुटल्या तारा " असा तारा कवितेत तोडला होता .( जे न देखे रवि !!!!!) विशेष असे जी हा मित्र पुढे एका मिनि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही झाला. अशी चिकाटी ठेवावी महाराजा !

मिरचीचा ठेचा जेंव्हा पोटात शिरतो करितो आतड्यांची जळवा-जळवी ताबा पोटाचा घेतो उडतो आत टण-टण तो नाकाला पदर लावूनी भयक्रांत बायकोही वावरते जवळी पोरे ही म्हणती पपा आता तरी, संडासातच गर्जा! हातात लोटा पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्यांची ती लाट आटली पोटाची गडगडाटी जी घरी पसरली आता रात्रीचा संडासात बैसोनी माझी मीच ऐकतो ही पिंपाणी आप्त ही म्हणती "वैनी" झाले हो इथेच, न्या की संडासामंदी आता तरी दाखवाहो "ह्यांच" एकदा नेवून पोटाच्या इस्पितळी पिचकारत गेला एक "माणूस" ­­­­लागून मिरचीच्या ठेच्याच्या नादी.