✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

द
दादा कोंडके यांनी
Fri, 02/03/2012 - 15:48  ·  लेख
लेख
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला. हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत. पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत. या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न, १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41487 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

काय पण घनघोर चर्चा!

नगरीनिरंजन
Sat, 02/04/2012 - 19:04 नवीन
आहाहा! मजा आली. जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे. राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल. मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर.. मुलीला लग्नाची

JAGOMOHANPYARE
Sun, 02/05/2012 - 11:34 नवीन
अगदी बरोबर.. मुलीला लग्नाची गरजच वाटत नाही आहे... लग्नानंतरही अशी मुलगी टिकणार नाही.. एखादे मूल झाले की मुलासकट माहेरीच निघून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हम्म...

दादा कोंडके
Sun, 02/05/2012 - 14:36 नवीन
जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे.
खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.
राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल. मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.
लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

लोभी आईवडील

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 21:08 नवीन
हे दोन शब्द 'म्युचुअली एक्स्क्लुसिव्ह' आहेत असे वाटत नाही तुम्हाला? कमीतकमी ज्या शैक्षणिक दर्जाच्या मुला/मुलीच्या विवाहा संबंधी चर्चा इथे सुरू आहे त्याबद्दल तरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

खूपदा मुली लोभी आईवडील आणि

नगरीनिरंजन
Mon, 02/06/2012 - 12:35 नवीन
खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.
तो सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेप्रमाणे आणि भिडस्तपणाच्या प्रमाणानुसार त्याचे उत्तर शोधेल.
लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.
लग्न झालेच पाहिजे का एवढाच प्रश्न नसून सगळ्या अटी पूर्ण होऊन लग्न झालेच पाहिजे का असा प्रश्न आहे. जसजशी इतर अटींची तीव्रता कमी होत जाते आणि लग्नाची गरज वाढू लागते तसतशी लग्न होण्याची शक्यता वाढत जाते. त्यात सरसकट धोरण ठरवण्याचे कारण नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

"कामाच्या" औषधाच्या

टवाळ कार्टा
Sat, 02/04/2012 - 20:50 नवीन
"कामाच्या" औषधाच्या ;)
  • Log in or register to post comments

माझे तर परखड मत आहे की,

कवितानागेश
Sun, 02/05/2012 - 16:59 नवीन
माझे तर परखड मत आहे की, मुलींनी, सुनांनी कुणालाही पैसे देउ नयेत. आपले पैसे आपणच कधीमधी उडवावेत/ एरवी स्वतःसाठीच नीट वापरावेत/ नियमित साठवावेत! :) शिवाय भावाला, नवर्‍याला, वडलांना आणि सासर्‍यांना व दीराला गाड्याबिड्यांवर उडवण्यासाठी बिल्कुल देउ नयेत, एकवेळ आईला, बहिणीला, सासूला आणि नणदेला त्यांच्या खर्चासाठी थोडेफार दिले तरी चालतील. शेवटी एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीच्या मदतीला येणार असते हे नेहमी लक्षात ठेवावे! ;)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद मस्तच! मी तर आणखीही

रेवती
Sun, 02/05/2012 - 21:20 नवीन
प्रतिसाद मस्तच!;) मी तर आणखीही एक गोष्ट करते. आई, सा. बा. , नणंद यांच्यामध्ये मीच वयानं लहान असल्याने त्यांच्याबरोबरच खरेदीला जाते. मला कुठ्ठे म्हणून पैसे खर्च करू देत नाहीत. बाजारात काय हवं ते घे म्हणतात. कधीकधी तर मला दोन किंवा तीन प्रकारचे कपडे फार्फार आवडतात. मोह सोडवत नाही, किंमत बघवत नाही; मग त्या "अगं घे ना!" असं म्हणतात. खरच या बायकाच माझ्यासारख्या मुलीच्या मदतीला येतात.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हा लेख वाचून ''बटाट्याच्या

निनाद मुक्काम …
Sun, 02/05/2012 - 18:02 नवीन
हा लेख वाचून ''बटाट्याच्या चाळीने पूर्वी मुलींची लग्ने कशी होणार ह्या विवंचनेत असणारया बापांची पिढी पहिली होती. व आता त्यांची लग्ने झाली तर आपले काय अश्या चिंतेत असणारे बाप पहिले''. ह्या विधानाची आठवण झाली. माझ्या पाहण्यात अनेक मुली माहेरी सढळ हाताने अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करतात. ह्यात नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या दोन्ही आल्या. पण मुलगा व मुलगी असलेल्या घरात मुलाने उच्च शिक्षण घेणे बहुदा अभियांत्रिकी आणी परदेशी शिकायला जाणे हे प्रमाण मुलींपेक्षा पेक्षा जास्त असते. मुली परदेशी बहुदा लग्ने होऊन जातात.( ह्यात कितीतरी वेळा भाऊ आणी बहिणी मध्ये सर्वच बाबतीत बहिण ही भावापेक्षा हुशार असली तरी ) मालमत्तेत समान वाटणी कायद्याने मान्य असली तरी प्रत्यक्षात ते घडतांना दिसत नाही. मुलींनी उदार मनाने तडजोड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. म्हणूनच मुलीने लग्नानंतर आपला पैसा आपली मुले व स्वतःसाठी व जोडीदारासाठी राखून ठेवावा. बहुतेक पालकांनी अपत्ये जन्माला घालण्या अगोदर त्यांचे पालन पोषण, शिक्षण आपल्या पगारात होणार आहे का ? ह्याचा सारासार विचार करून ती जन्माला घातली तर ही समस्या निर्माण होणार नाही. तेव्हा '' अंथरूण पसरून पाय पसरावे'' ''जराशी सावधानी ,जिंदगी भर आसानी''
  • Log in or register to post comments

गेले तासभर चर्चा वाचली.

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 21:35 नवीन
मधे मधे फुटकळ प्रतिसादही लिहिले. कोंडके दादांनी चांगला विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. वरिल प्रस्तावातून वेगवेगळे सूर उमटत आहेत. १. मी कमविलेल्या पैशाचे मी काय करेन हे कोण ठरविणार. २. जोडीदार शोधून 'संसार' थाटणे हे उद्दिष्ट आहे, की हा खरेदी विक्री व्यवहार आहे? ३. उपवर्/उपवधूंनी एकमेकांस काय प्रश्न विचारले पाहिजेत? 4. How to decide priorities. मला वाटते, ४था प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. अन या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात एक 'इगो' गुंफिला गेलेला आहे. पहिला प्रश्णः मी कमावते. मी 'माझ्या घरी' देणार. 'तू' विचारायचं नाहीस. हा म्हणतो, तू 'माझी' बायको. (होणार) मग हे चालणार नाही.. मग 'सौदा' फिसकटतो..!? प्रायॉरिटी कशाला? तिने पैसे कमवून आणण्याला? तुझ्यावर प्रेम करण्याला? तुझ्या मातापित्यांची काळजी घेण्याला? तुझी पिल्लं जन्माला घालून मोठी करण्याला? की तिच्या आईबापांना पैसे देण्याला? इथे येतो मुद्दा २. संसार सुरू करता आहात की सौदा? Starting a family. असा एक सुंदर शब्दसमूह इंग्रजीत आहे. तुम्ही एका कुटुंबाची सुरुवात करीत आहात. सुरुवातीला, आधी तुमच्या अन तिच्या कुटुंबाची 'काँटेक्स्ट' असणारच आहे. (हे पाश्चात्य जग नाही. तिकडे मुले/मुली १६-१८ ची झाली की घरटे सोडून उडून जातात म्हणे?) हळू हळू, तुमचे घर, अन तिचे घर पक्षी सासर्/माहेर मोडून एक नवे 'तुमचे' घरटे तयार होते. त्याचे घर होते. कुटुंब होते. मग तुमच्यावर तुमच्या पिलांची जबाबदारी येते. तुम्हाला समजते मुलगा/मुलगी असल्यावर तुमच्या जिवाचे काय होते ते. तोवर तुमचे आई/बाबा तुम्हाला 'समजायला' लागलेले असतात.या स्टेजला पोहोचल्यावर मग 'तुझ्या' बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आला अन 'मी' बिल भरलं हे उरतच नाही. ते तोपर्यंत आपल्या पोरांचे आजोबा झालेले असतात. अन आपलेही मित्र, गाईड. बायकोचे वडील असोत की नवर्‍याचे. हा ३डी अन दूरचा विचार केला, तर तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर समजू लागतं, की एकमेकांना काय विचारलं पाहिजे. एकमेकांना प्रचंड सेल्फिश होऊन विचारा. फक्त तू अन मी बद्दल. तुम्ही दोघे काँपॅटिबल आहात की नाही त्याबद्दल. बाकी आइ/बाप, भाऊ/बहीण, पैसा क्षुल्लक आहेत. तुम्ही दोघे एकमेकांशी जुळलात तर सोनं. नाही तर सोन्याचा मुलामा दिलेलं मातीचं खेळणं. असा तो संसार आहे. शेवटी प्रश्ण प्रायॉरिटीजचा आहे? म्हातारपणी कंबर दुखत असली, की तीच 'तुमची बायको' गरम पाण्याची पिशवी आणून देते, अन कपाळावर हात ठेऊन चौकशी करते, की तिकडे तोंड करून झोपी जाते? हे महत्वाचे. तिने आयुष्यभर पगाराचे महिना १ लाख रुपडके तुम्हाला दिले असलेत तरी ते काय कामाचे? -कंबरेखाली एक गरम पाण्याची पिशवी घेऊन आनंदी झालेला- गोपाळ
  • Log in or register to post comments

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही

कवितानागेश
Sun, 02/05/2012 - 23:13 नवीन
अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे? एकमेकांच्या घरी राहून, ४ दिवस 'म्हातारा-म्हातारी' खेळून बघायची पद्धत सुरु करावी लागणार लवकरच! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

ते म्युचुअल असतं.

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 23:34 नवीन
म्हातारपण खेळून पहाता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लग्नाचा बाजार मांडला की हे

शिल्पा ब
Mon, 02/06/2012 - 10:49 नवीन
लग्नाचा बाजार मांडला की हे व्हायचंच!!! कशाच्या बदल्यात काय मिळतंय हे लोकं पाहणारचं नै का? बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी सहमती आहे.
  • Log in or register to post comments

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही

५० फक्त
Mon, 02/06/2012 - 10:49 नवीन
अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे? या साठी म्हातारं व्हायची गरज नाही, ज्यांना हे चेक करायचं आहे, त्यांनी हात पाय तोडुन घेउन पहावे (आपापले), लक्षात येईल लगेच.
  • Log in or register to post comments

म्हातारपण!

कवितानागेश
Mon, 02/06/2012 - 11:30 नवीन
खरं तर त्याची पण गरज नाही, नुस्तीच परिक्षा घ्यावी एकमेकांची..... पाणी पुरेसे तापवता येते का? आणि तापलेले पाणी शेकण्याच्या पिशवीत ओतता येते का? ....या अशा परिक्षा उत्तीर्ण झाल्यास 'इन्वेस्टमेंट' करायला हरकत नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नोकरी करणारीच बायको पाहिजे

JAGOMOHANPYARE
Mon, 02/06/2012 - 11:20 नवीन
नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? अशी तडजोड होऊ शकत नाही. न करणे चांगले.. दीड वर्षनेही माहेरच्या लोकांचा पगाराच्गा हट्ट चालूच रहाणाण्याची शक्यता असते आणि दीड वर्षाने संसार मोडण्याचीच शक्यता जास्त असते...
  • Log in or register to post comments

९७ झालेत

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 02/06/2012 - 12:57 नवीन
मी आणखी एक रन काढतो. अजून कोणीतरी दोन रन्स काढा म्हणजे सेंच्युरी होईल.
  • Log in or register to post comments

हम्म.......... सर्व

पियुशा
Mon, 02/06/2012 - 13:05 नवीन
हम्म.......... सर्व प्रतिसाद,मते वाचली छान आहेत माझ एक प्रामाणीक मत नम्रपणे सान्गु इच्छीते सुनेने पगार / अर्धा पगार गरज असेल तर " माहेरी द्यावा " हे बोलायला जितक सोप्प आहे तितक आचारणात आणायला कठीण आहे , या अनुषगाने नेहमीच प्रश्न उपस्थित राहणार सुन पगार /अर्धा पगार माहेरी देतेय हे सासरच्या लोकाना ( अपवाद वगळ्ता) कितीही नाही म्हण्ले तरी कठीण जाणार हे निश्चित ! अन १००% सत्य आहे :)
  • Log in or register to post comments

हे असेच असते हो... (वरील बरेच

गणेशा
Mon, 02/06/2012 - 16:55 नवीन
हे असेच असते हो... (वरील बरेच रिप्लाय वाचलेत आणि काही नाही वाचले) पण सुनेने अर्धा पगार माहेरी द्यावा हे मान्य (पण काही रिप्लाय मधुन पुरुष आणि पुरुषी अहंकार असे शब्दशः नसले तरी उच्चार/अर्थ जाणवले त्याबद्दल २ ओळी लिहितो ) सुनेने अर्धा पगार घरी द्यावा .. मान्य.. पण याला विरोध कसा होतो ते पहा .. १. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन .. २. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन .. अशी बरीच वेगवेगळी चित्रे समाजात दिसतात .. त्यामुळे फक्त आणि फक्त पुरुषप्रधान संस्कृती ही एकच गोष्ट याला कारणीभुत नाही असे ध्यानात ठेवावे .. तसेच अनेक गोष्टी .. स्त्री ला मुल होत नसेन तर तिला पुरुषां पेक्षा जास्त टोचने/विटंबन केले जाते ते इतर स्त्री कडुनच.. स्त्री चे लग्न होत नसेन तर तिच्या बद्दल भलते सलते बोलले जाते ते इतर स्त्री वर्गाकडुनच ,.. तेंव्हा स्त्रीस जर खरेच उत्कर्ष हवा आहे तर त्यांनीच स्त्री बद्दल आदर बाळगावा ... आई रुपी जी पहिली स्त्री मुलांच्या(मुलगी आणि मुलगा)आयुष्यात असते त्यामुळे स्त्री बद्दल आदर कसा निभवावा हे पुरुषाला ही ठावुक असते आणि स्त्री ला पण.. पण हेवे दावे आणि अहम या कारणा मुळे उलट बिचार्‍या पुरषांना हकनाक बळी जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मित्रा,

वपाडाव
Mon, 02/06/2012 - 17:01 नवीन
१. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन .. २. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन ..
बालबुद्धीला हे झेपलं नाही... इस्कटुन सांगितलंस तर कदाचित पुन्हा एखादा प्रयत्न करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

घर A : 'अ' ही सुन असते आणि ,

गणेशा
Mon, 02/06/2012 - 19:13 नवीन
घर A : 'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते. १. अ जेंव्हा तिच्या माहेरी ' घर B' पैसे देते. त्याच वेळी 'ब' ही सुद्दा तिच्या माहेरी ' घर A' पैसे द्यायला लागली. की 'सा' जी की 'ब' ची आई असते, ती म्हणते पोरी तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, नाहितर ही 'अ' आहे ना, ती भवानी तिचय घरी सगळे पैसे देत जाईन. घर C 'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते. २. 'ब' ही मुलगी लग्न करुन गेली तरी कर्तव्य म्हणुन घरी (घर C) पैसे देत असेन तर सासु ती घेत असते, आणि सेम थिंग जेंव्हा तीची सुन ' अ' तिच्या माहेरी ( घर D) पैसे देत असेन तर . तु तिकडे पैसे देवु नकोस असे सांगत असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

छान.

वपाडाव
Mon, 02/06/2012 - 20:32 नवीन
मालक, एकदा सुनेच्या रुपात घुसल्यास फक्त नणंद जरी लिहिले असते तरीही ते कळालेच असते... A-B-C वापर्ण्याची गरज पडली नसती. असो, A-B-C वापरुन इस्कटुन सांगितल्याने कळाल्या गेले आहे. स्वगत : चला आता केबीसी (KBC-KBC) खेळु...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आता जरा उलट विचार करूया.

इरसाल
Tue, 02/07/2012 - 11:47 नवीन
नवरा गरीब, बायको माहेरकडून श्रीमंत, दोघे नोकरीला आता नवऱ्याचे माहेर गरीब म्हणून नवऱ्याचा अर्धा किंवा पूर्ण पगार त्याच्या आईवडलांना द्यावा काय ? कि हे गृहीत धरून चालले आहेत लग्न म्हणजे एनीहाऊ नवऱ्याची जिम्मेदारी.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

नगरीनिरंजन
Tue, 02/07/2012 - 11:54 नवीन
मुलाचे आईवडील मुलाकडे राहतात किंवा हवे तेव्हा येऊ जाऊ शकतात आणि मुलगाही त्यांना हवी तेवढी, हवी तशी मदत करू शकतो हे गृहीत धरलेले आहे नेहमीप्रमाणे, प्रत्यक्षात स्थिती काहीही असली तरी. :) (युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहे. ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

+१

वपाडाव
Tue, 02/07/2012 - 14:42 नवीन
युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहे
कॉलिंग युयुत्सु....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

- फिर ना कहना

मयुरपिंपळे
Wed, 02/08/2012 - 14:03 नवीन
- फिर ना कहना मेरे दोस्त माइकल दारू पीके दंगा करता है Image removed.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Sat, 10/10/2015 - 20:49 नवीन
. लिहिण्यासारखे भरपूर अहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा