Skip to main content

काय हा अफाट दर ???

लेखक मनिमौ यांनी गुरुवार, 19/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिन्ट आउट चे (भलतेच।) दर ! सध्या मी मुम्बै मधे राहात आहे. काल काहि कामासाटी प्रिन्ट आउट घेण्यासाथी नेट कफे मधे गेले.एकुन ६ प्रिन्ट काढुन पैसे विचार्ले तर ते झाले होते ४१ रु ???. मी चाट पडले कारन माझ्या हिशेबानुसार १० मि नेट = १५ रु + ६*२ = १२ रु प्रिन्ट असे २७ रु झाले होते. नन्तर प्रिन्ट चा दर पाहिला तर १ प्रिन्ट ६ रु आहे असे कळाले.":( जर पुणे , सोलापुर्, आणी इत र ठी काणी प्रिन्ट चा दर २ रु आहे तर मुम्बै ला का ६ रु आसे विचारल्या नन्तर "यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले" जर कोणला जास्ती माहिती असेल तर क्रुपया सान्गा कारण ग्राहक पन्चायत कित्पत मदत करेल याची माहिती नाहि.

वाचने 7046
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

झालं.... मुंबै-पुणे वाद हा जुनाच आहे त्यात सोलापूर पण अ‍ॅड झालं ;) असो, सर्वात पहिले तुम्ही दर माहिती करुन घ्यायला हवे होते. बरं नाही माहिती केले, पण तुम्ही पावती घेतलीत का? अर्थात पावती मिळण्याबाबत साशंक आहे,, बहुदा अशा गोष्टींच्या पावत्या मिळत नाहीत. >>यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले" बास, झालं तर मग.. तुम्हाला उत्तर आधीच मिळालय. :)

In reply to by मराठमोळा

झालं.... मुंबै-पुणे वाद हा जुनाच आहे त्यात सोलापूर पण अ‍ॅड झालं
च्यामारी, इथे वाद कुठे दिसला भाऊ तुम्हाला? शहराबद्दलची कुठलीही टिप्पणी टीका म्हणून समजून घेऊन लगेच प्रत्युत्तर देत बसत नाहीत मुंबईची लोकं. मुंबई महाग आहे हे मान्य आहे. ते तसेच आवडते असे म्हणायला आम्ही ... जाऊ देत ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आले का कट्टर छिद्रान्वेशी मुंबैकर पळत ;) >>च्यामारी, इथे वाद कुठे दिसला भाऊ तुम्हाला? धागाकर्ता/कर्तीने पुण्यात, सोपालुरात २ रुपये दर आहे आणि मुंबैत जास्त का असा वादग्रस्त प्रश्न विचारला आहे म्हणजेच शहरांची तुलना केली आहे (कोणत्याही कारणाने का होईना.) चेन्नैत एका ठिकाणी १ प्रिंटचे १५ रु. घेतले होते माझ्याकडून, पण ती लेखमाला अर्धीच सोडावी लागल्याने तो संदर्भ राहुन गेला. ;) >>शहराबद्दलची कुठलीही टिप्पणी टीका म्हणून समजून घेऊन लगेच प्रत्युत्तर देत बसत नाहीत मुंबईची लोकं. मग वरील प्रतिसाद काय आहे? :) >>मुंबई महाग आहे हे मान्य आहे. ते तसेच आवडते असे म्हणायला आम्ही ... जाऊ देत जाउ दे कशाला, येउ देत.. ;)

In reply to by मराठमोळा

विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट वाचला नाहीये अजून पंण एक मुंबईकर म्हणून धरुन एकत्र रहायला पायजे.. )

In reply to by गवि

ओ गवि, पुण्यातल्या ब्याचलर लाइफच्या पास्टशी तुम्ही प्रतारणा करु शकत नाही.. (मोनोगॅमी मिथ असो वा नसो) ;)

In reply to by मराठमोळा

ममो, गवि पुण्याशी प्रतारणा नाही करत आहेत. मुद्दा वाचला नसताना आपल्या शहरबंधुची बाजू घेणे हा पुण्याचा गुण त्यांनी दाखवून दिला आहे वर. आत्ता बोला...... ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे आजोबा, "मुद्दा वाचला नसताना आपल्या शहरबंधुची बाजू घेणे" हा पुण्याचा (अधोरेखीत 'च' फार महत्वाचा आहे इथे.) गुण आहे हे सरसकट केलेले विधान मान्य करता येणार नाही.. हा कदाचित पुर्वग्रह असावा. पुरावे आणि दाखले द्या..अथवा पुणेकरांची जाहीर माफी मागा. :)

In reply to by मराठमोळा

'अथवा पुणेकरांची जाहीर माफी मागा'' हेच असंही वाचता येईल - अथवा जाहीर पुणेकरांची माफी मागा. चालेल ना.

In reply to by मराठमोळा

परवाच्या पुण्याच्या फेरीत एका पाटीत असा "च" पहिला म्हणून विनोदाने टाकला. तो "च" मनावर घेतला पाहिजे असे नाही.

In reply to by मराठमोळा

आले का कट्टर छिद्रान्वेशी मुंबैकर पळत
तुम्हीच ओळखले हो आम्हाला नीट... :-)
धागाकर्ता/कर्तीने पुण्यात, सोपालुरात २ रुपये दर आहे आणि मुंबैत जास्त का असा वादग्रस्त प्रश्न विचारला आहे म्हणजेच शहरांची तुलना केली आहे (कोणत्याही कारणाने का होईना.)
मी म्हणतो हेच. तो साधा प्रश्न आहे. मुंबईकर त्याला उगाच वादग्रस्त नाही करत बसणार. समंजस असतो हो आम्ही तसे.
>>शहराबद्दलची कुठलीही टिप्पणी टीका म्हणून समजून घेऊन लगेच प्रत्युत्तर देत बसत नाहीत मुंबईची लोकं. मग वरील प्रतिसाद काय आहे?
कै च्या कै.... मी कुठेही प्रत्युत्तर दिले नाही. मुळात ती टीका मुंबई वर केली नसून त्या विशिष्ट दुकानावर केली आहे. मुंबईकर अशी एका दुकानदारावर केलेली टीका उगाच अख्ख्या शहराला लावून घेत नाहीत आणि त्या दुकानदाराची फुकटची बाजू तर मुळीच घेत बसत नाहीत. ते सगळे पुण्यनगरीत (आज घासू गुर्जींची खूपच आठवण येते आहे)
>>मुंबई महाग आहे हे मान्य आहे. ते तसेच आवडते असे म्हणायला आम्ही ... जाऊ देत जाउ दे कशाला, येउ देत..
तुम्ही म्हणता तर येऊ देत की.... काही लोकं तर पुढच्याच आठवड्यात येत आहेत म्हणे मुंबईत ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे तात्या, मुद्द्याला धरून चर्चा होत नसल्याने आणि अवांतर फार झाल्याने चर्चा थांबवत आहेत. उरलेली चर्चा मुंबईतल्या कॅफेत करु ;) नाहीतर उगा संपादकांचे काम वाढायचे. :)

In reply to by ५० फक्त

अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ वाढलेल्या दुधाच्या दराबद्दल बोलत आहेत. हल्ली मनिमाऊ पण दुध विकत घेतात का...?

In reply to by पक पक पक

नाही हो, पण वाढीव दरामुळे लोक आता जास्त दूध घेत नसावेत त्यामुळे मनिमाऊंना पण राशन लागले असावे.

अलेले!! तुम्हल अलेल अनुभन वचुन वैत वत्ले....

विषण्ण करणारा अनुभव.. हादरलो.. इतकी लूट.. दिवसाढवळ्या.. "यहा ऐसा ही है.. "... इतकी असंवेदनशीलता..? भीषण वास्तव आहे हे आजचं.. एक मुंबईकर म्हणून आज शरम वाटली..काही न करु शकत असल्याबद्दल.. षंढ झालोत आम्ही..

कॅफे कुठे आहे? मलबार हिल की पेडर रोड की चुनाभट्टी..? शिवाय प्रिंट आउट पांढरा-काळा की रंगीत? पेपरची गुणवत्त्ता? बॉन्ड पेपर की आणि कुठला? बाकी टिपिकल मराठी प्रश्न- १) आधी चौकशी का नाही केलीत ? २)मुंबई नगरी महाग आहे ह्याची कल्पना नव्हती का? ३)ग्राहक पंचायतीचा नंबर नेहमी जवळ असावा. ४)पैसे तर दिलेत पण पावती विचारलीत का? नाही ना? तिथेच चुकलात.

"यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले" तुम्हाला अमराठी समजला तो?? अर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!

मी चाट पडले कारन माझ्या हिशेबानुसार १० मि नेट = १५ रु + ६*२ = १२ रु प्रिन्ट असे २७ रु झाले होते.
दुकानदाराच्या हिशेबानुसार = ४१ रुपये. विषय संपला. बाकी काय हो मनिमौ,
माझ्या हिशेबानुसार १० मि नेट = १५ रु
दुकानदाराने तर १० मिनिटाचे ५ रुपयेच लावलेले दिसतात. ह्याचाच अर्थ तिप्पट पैसे कमी लावले. त्याबद्दल तुम्ही अवाक्षर देखील काढलेले नाहीत. असे का बरे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाटलेच मला तुम्ही त्याची तळी उचलणार म्हणून.. कॅफेवाल्याच्या व्यावसायिक गैरवर्तनाला पाठीशी घालणे बंद करा.. पुण्यात चालत असेल.. आमच्याइथे रास्त दरच हवेत. (डोळा मारण्याच्या स्माईलीची गरज आहे का? )

तुझा सल्ला हवाय..

In reply to by निवेदिता-ताई

च्यायला ! मी काय डोंबल सल्ला देणार ? साधे सोपे सरळ कार्य म्हणजे नेट कॅफे वाल्याला सरळ हातावरती दोन रुपये टिकवावेत. (सध्या पुण्यात तरी दोन्ही सायबर कॅफे युनियनने (पुणे, पिंपरी-चिंचवड) हा प्रिंट आउटचा दर कायम केला आहे.) जर कॅफेचालकाने खळखळ केली तर सरळ त्याच्याकडे पक्के बिल मागावे. अगदी व्हॅट लावणार असेल तरी व्हॅट लावून पण पक्केच बिल घ्यावे. त्यानंतर सरळ सायबर कॅफे युनियन कडे तक्रार नोंदवावी. पुढचे सगळे ते बघून घेतात. अर्थात 'येवढे सगळे कोण करत बसणार?' असा सूर आवळायचा असेल तर विषयच संपला. पण मग जाहिर धागे काढण्याआधी निदान त्याविरुद्ध काहितरी करण्याची तयारी तरी ठेवावी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेट... तुमच्या या प्रतिसादाने माझे डोळे उघडले.. माझा गैरसमज दूर झाला. माझ्या वरील प्रतिसादाबद्दल ठाण्यात दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे.. आलात की कळवा.. दिलगिरीसाठी बसण्याचे ठिकाण तुम्हीच ठरवा..

In reply to by गवि

अहो, बसण्यासाठी म्हणूनच येतो की सरळ. ;) बाकी मी वर जे सांगीतले ते फक्त सायबर कॅफे साठीच नाही, तर मेडीकल स्टोर्स, इलेक्ट्रिक गुडस, भांडे व्यापारी इ. ठिकाणी देखील लागू आहे. ह्या व्यापार्‍यांचा संघटना तुमच्या तक्रारीची दखल घेतातच घेतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, मनापासुन धन्यवाद ह्या महिती बद्दल. खुपच महत्त्वपुर्ण व उपयोगी माहिती. :)

In reply to by गवि

पराशेट... तुमच्या या प्रतिसादाने माझे डोळे उघडले.. माझा गैरसमज दूर झाला.
हाहाहा... आरसा, आरसा आहे तो गवि. ;)

In reply to by रेवती

चालायचंच, पराशेठ सध्या 'मंदाकिनी'चा पुढचा भाग लिहीत असतील! ;) अवांतर - पण बेसूरपणे सूर आळवणार्‍या गायकाचा सूर खरंच आवळून टाकावा असं वाटल्यास नवल नाही! ;) (अ'सुरी')रंगा

मि त्र घ्रीच एक प्रिंट्र घेत्लाय. प्रिंट, स्कॅन अन झेरॉक्स कढुन मिल्ते. तुम्हीप्न घ्या. स्वस्तात पडेल.

त्या **व्याला (बुडव्याला) मराठी माणसाचा हिसका दाखवायचा .. बाहेरून येउन इथे आम्हालाच चुना लावतो कारे ...असा सज्जड दम भरायचा .. कोणत्याही एका सेनेचे नाव फेकायचे ..आणि बघुन घेतो असे म्हणायचे ... एका मिनिटात सरळ होतात...

या निमित्त परा ला विविध मसाज सेंटर मधील दरामधे असलेली डीस्पॅरीटी दुर करण्याचे आंदोलन हाती घ्यावे अशी विनंती करतो.

In reply to by विनायक प्रभू

अहो तिथे "गुणवत्ते'प्रमाणे डीस्पॅरेटी असणारच. सगळ्या हॉटेलात थाळीचा दर एकच असतो का ? पावती दिलीच पाहिजे ह्यासाठी त्यांच्यांवर राजकिय पक्षांना सोडता येईल.

"प्रिन्ट आउट" एकच असतो ना?

In reply to by विनायक प्रभू

कागदाची गुणवत्ता, प्रिंटरचा दर्जा, शाई, कॅफे वातानुकुलित आहे की नाही? हे सगळे नाय पकडायचे किंमतीत?

@ निवेदिता=ताई, तुम्हाला एका प्रिंटला दहा रुपये पडले ? ते डाईंग हाउस मधले साडीवरचे प्रिट आहे का ? " की तुम्ही एवलेस्त वर लहाता ?

पीजे वॉर्निंग> प्रिंटाउटचा कागद अ-फाट असेल !