प्रिन्ट आउट चे (भलतेच।) दर !
सध्या मी मुम्बै मधे राहात आहे. काल काहि कामासाटी प्रिन्ट आउट घेण्यासाथी नेट कफे मधे गेले.एकुन ६ प्रिन्ट
काढुन पैसे विचार्ले तर ते झाले होते ४१ रु ???.
मी चाट पडले कारन माझ्या हिशेबानुसार १० मि नेट = १५ रु + ६*२ = १२ रु प्रिन्ट असे २७ रु झाले होते.
नन्तर प्रिन्ट चा दर पाहिला तर १ प्रिन्ट ६ रु आहे असे कळाले.":(
जर पुणे , सोलापुर्, आणी इत र ठी काणी प्रिन्ट चा दर २ रु आहे तर मुम्बै ला का ६ रु आसे विचारल्या नन्तर "यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले"
जर कोणला जास्ती माहिती असेल तर क्रुपया सान्गा कारण ग्राहक पन्चायत कित्पत मदत करेल याची माहिती नाहि.
वाचने
7137
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
झालं.... मुंबै-पुणे वाद हा
झालं....
मुंबै-पुणे वाद हा जुनाच आहे त्यात सोलापूर पण अॅड झालं ;)
असो,
सर्वात पहिले तुम्ही दर माहिती करुन घ्यायला हवे होते. बरं नाही माहिती केले, पण तुम्ही पावती घेतलीत का?
अर्थात पावती मिळण्याबाबत साशंक आहे,, बहुदा अशा गोष्टींच्या पावत्या मिळत नाहीत.
>>यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले"
बास, झालं तर मग.. तुम्हाला उत्तर आधीच मिळालय. :)
अर्र्........... मनीमॉ फारच
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by मराठमोळा
अर्र्...........
मनीमॉ फारच नुकसान झाले ग
वाचुन वाईटट वाट्ले ....
( हतबल पियु )
झालं.... मुंबै-पुणे वाद हा
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by मराठमोळा
च्यामारी, इथे वाद कुठे दिसला भाऊ तुम्हाला? शहराबद्दलची कुठलीही टिप्पणी टीका म्हणून समजून घेऊन लगेच प्रत्युत्तर देत बसत नाहीत मुंबईची लोकं. मुंबई महाग आहे हे मान्य आहे. ते तसेच आवडते असे म्हणायला आम्ही ... जाऊ देत ;-)
आले का कट्टर छिद्रान्वेशी
In reply to झालं.... मुंबै-पुणे वाद हा by विश्वनाथ मेहेंदळे
आले का कट्टर छिद्रान्वेशी मुंबैकर पळत ;)
>>च्यामारी, इथे वाद कुठे दिसला भाऊ तुम्हाला?
धागाकर्ता/कर्तीने पुण्यात, सोपालुरात २ रुपये दर आहे आणि मुंबैत जास्त का असा वादग्रस्त प्रश्न विचारला आहे म्हणजेच शहरांची तुलना केली आहे (कोणत्याही कारणाने का होईना.) चेन्नैत एका ठिकाणी १ प्रिंटचे १५ रु. घेतले होते माझ्याकडून, पण ती लेखमाला अर्धीच सोडावी लागल्याने तो संदर्भ राहुन गेला. ;)
>>शहराबद्दलची कुठलीही टिप्पणी टीका म्हणून समजून घेऊन लगेच प्रत्युत्तर देत बसत नाहीत मुंबईची लोकं.
मग वरील प्रतिसाद काय आहे? :)
>>मुंबई महाग आहे हे मान्य आहे. ते तसेच आवडते असे म्हणायला आम्ही ... जाऊ देत
जाउ दे कशाला, येउ देत.. ;)
विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by मराठमोळा
विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट वाचला नाहीये अजून पंण एक मुंबईकर म्हणून धरुन एकत्र रहायला पायजे.. )
ओ गवि, पुण्यातल्या ब्याचलर
In reply to विमेंशी सहमत.. ( मुद्दा नीट by गवि
ओ गवि,
पुण्यातल्या ब्याचलर लाइफच्या पास्टशी तुम्ही प्रतारणा करु शकत नाही.. (मोनोगॅमी मिथ असो वा नसो) ;)
ममो, गवि पुण्याशी प्रतारणा
In reply to ओ गवि, पुण्यातल्या ब्याचलर by मराठमोळा
ममो, गवि पुण्याशी प्रतारणा नाही करत आहेत.
मुद्दा वाचला नसताना आपल्या शहरबंधुची बाजू घेणे हा पुण्याचाच गुण त्यांनी दाखवून दिला आहे वर.
आत्ता बोला...... ;-)
विमे आजोबा, "मुद्दा वाचला
In reply to ममो, गवि पुण्याशी प्रतारणा by विश्वनाथ मेहेंदळे
विमे आजोबा,
"मुद्दा वाचला नसताना आपल्या शहरबंधुची बाजू घेणे" हा पुण्याचाच (अधोरेखीत 'च' फार महत्वाचा आहे इथे.) गुण आहे हे सरसकट केलेले विधान मान्य करता येणार नाही.. हा कदाचित पुर्वग्रह असावा. पुरावे आणि दाखले द्या..अथवा पुणेकरांची जाहीर माफी मागा. :)
'अथवा पुणेकरांची जाहीर माफी
In reply to विमे आजोबा, "मुद्दा वाचला by मराठमोळा
'अथवा पुणेकरांची जाहीर माफी मागा'' हेच असंही वाचता येईल - अथवा जाहीर पुणेकरांची माफी मागा.
चालेल ना.
परवाच्या पुण्याच्या फेरीत एका
In reply to विमे आजोबा, "मुद्दा वाचला by मराठमोळा
परवाच्या पुण्याच्या फेरीत एका पाटीत असा "च" पहिला म्हणून विनोदाने टाकला. तो "च" मनावर घेतलाच पाहिजे असे नाही.
आले का कट्टर छिद्रान्वेशी
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by मराठमोळा
तुम्हीच ओळखले हो आम्हाला नीट... :-)
मी म्हणतो हेच. तो साधा प्रश्न आहे. मुंबईकर त्याला उगाच वादग्रस्त नाही करत बसणार. समंजस असतो हो आम्ही तसे.
कै च्या कै.... मी कुठेही प्रत्युत्तर दिले नाही. मुळात ती टीका मुंबई वर केली नसून त्या विशिष्ट दुकानावर केली आहे.
मुंबईकर अशी एका दुकानदारावर केलेली टीका उगाच अख्ख्या शहराला लावून घेत नाहीत आणि त्या दुकानदाराची फुकटची बाजू तर मुळीच घेत बसत नाहीत. ते सगळे पुण्यनगरीत (आज घासू गुर्जींची खूपच आठवण येते आहे)
तुम्ही म्हणता तर येऊ देत की.... काही लोकं तर पुढच्याच आठवड्यात येत आहेत म्हणे मुंबईत ;-)
विमे तात्या, मुद्द्याला धरून
In reply to आले का कट्टर छिद्रान्वेशी by विश्वनाथ मेहेंदळे
विमे तात्या,
मुद्द्याला धरून चर्चा होत नसल्याने आणि अवांतर फार झाल्याने चर्चा थांबवत आहेत. उरलेली चर्चा मुंबईतल्या कॅफेत करु ;) नाहीतर उगा संपादकांचे काम वाढायचे. :)
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ वाढलेल्या दुधाच्या दराबद्दल बोलत आहेत.
खीक्
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by ५० फक्त
मस्त रे ५० फक्त!
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by ५० फक्त
अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ वाढलेल्या दुधाच्या दराबद्दल बोलत आहेत.
हल्ली मनिमाऊ पण दुध विकत घेतात का...?
नाही हो, पण वाढीव दरामुळे लोक
In reply to अपेक्षाभंग, मला वाटलं मनिमौ by पक पक पक
नाही हो, पण वाढीव दरामुळे लोक आता जास्त दूध घेत नसावेत त्यामुळे मनिमाऊंना पण राशन लागले असावे.
मनीमौ
अलेले!! तुम्हल अलेल अनुभन वचुन वैत वत्ले....
मनिमौ....हे काहीच नाही आम्चे
मनिमौ....हे काहीच नाही आम्चे इकडे एका प्रिंटला १०/- रु घेतात..आता बोला
म्हणजे नेमके कुठेशी हो?
In reply to मनिमौ....हे काहीच नाही आम्चे by निवेदिता-ताई
म्हणजे नेमके कुठेशी हो?
झाऽऽलं!
In reply to म्हणजे नेमके कुठेशी हो? by प्रचेतस
पुणे मुंबै सोलापूर मारामार्या सुरू आहेत, आणखी सातारा अॅड करा त्यात!
विषण्ण करणारा अनुभव..
विषण्ण करणारा अनुभव..
हादरलो.. इतकी लूट.. दिवसाढवळ्या..
"यहा ऐसा ही है.. "... इतकी असंवेदनशीलता..?
भीषण वास्तव आहे हे आजचं..
एक मुंबईकर म्हणून आज शरम वाटली..काही न करु शकत असल्याबद्दल.. षंढ झालोत आम्ही..
विडंबनाच्या प्रतिक्षेत....
विडंबनाच्या प्रतिक्षेत.... ;)
परा
In reply to विडंबनाच्या प्रतिक्षेत.... by प्यारे१
कॉलिंग (सन्माननिय) परा..
>>विडंबनाच्या
In reply to विडंबनाच्या प्रतिक्षेत.... by प्यारे१
>>विडंबनाच्या प्रतिक्षेत....
+१
हल्ली या गोष्टीच फ्याड आहे मिपावर.............
प्रिंट
कॅफे कुठे आहे? मलबार हिल की पेडर रोड की चुनाभट्टी..? शिवाय प्रिंट आउट पांढरा-काळा की रंगीत? पेपरची गुणवत्त्ता? बॉन्ड पेपर की आणि कुठला? बाकी टिपिकल मराठी प्रश्न-
१) आधी चौकशी का नाही केलीत ?
२)मुंबई नगरी महाग आहे ह्याची कल्पना नव्हती का?
३)ग्राहक पंचायतीचा नंबर नेहमी जवळ असावा.
४)पैसे तर दिलेत पण पावती विचारलीत का? नाही ना? तिथेच चुकलात.
"यहा ऐसा ही है असे उत्तर
"यहा ऐसा ही है असे उत्तर मिळाले"
तुम्हाला अमराठी समजला तो?? अर्रर्रर्रर्रर्रर्रर्र!!
मी चाट पडले कारन माझ्या
दुकानदाराच्या हिशेबानुसार = ४१ रुपये. विषय संपला.
बाकी काय हो मनिमौ,
दुकानदाराने तर १० मिनिटाचे ५ रुपयेच लावलेले दिसतात. ह्याचाच अर्थ तिप्पट पैसे कमी लावले. त्याबद्दल तुम्ही अवाक्षर देखील काढलेले नाहीत. असे का बरे ?
वाटलेच मला तुम्ही त्याची तळी
In reply to मी चाट पडले कारन माझ्या by परिकथेतील राजकुमार
वाटलेच मला तुम्ही त्याची तळी उचलणार म्हणून.. कॅफेवाल्याच्या व्यावसायिक गैरवर्तनाला पाठीशी घालणे बंद करा.. पुण्यात चालत असेल.. आमच्याइथे रास्त दरच हवेत.
(डोळा मारण्याच्या स्माईलीची गरज आहे का? )
परा --
तुझा सल्ला हवाय..
सल्ला ?
In reply to परा -- by निवेदिता-ताई
च्यायला !
मी काय डोंबल सल्ला देणार ?
साधे सोपे सरळ कार्य म्हणजे नेट कॅफे वाल्याला सरळ हातावरती दोन रुपये टिकवावेत. (सध्या पुण्यात तरी दोन्ही सायबर कॅफे युनियनने (पुणे, पिंपरी-चिंचवड) हा प्रिंट आउटचा दर कायम केला आहे.) जर कॅफेचालकाने खळखळ केली तर सरळ त्याच्याकडे पक्के बिल मागावे. अगदी व्हॅट लावणार असेल तरी व्हॅट लावून पण पक्केच बिल घ्यावे. त्यानंतर सरळ सायबर कॅफे युनियन कडे तक्रार नोंदवावी. पुढचे सगळे ते बघून घेतात.
अर्थात 'येवढे सगळे कोण करत बसणार?' असा सूर आवळायचा असेल तर विषयच संपला. पण मग जाहिर धागे काढण्याआधी निदान त्याविरुद्ध काहितरी करण्याची तयारी तरी ठेवावी.
पराशेट... तुमच्या या
In reply to सल्ला ? by परिकथेतील राजकुमार
पराशेट... तुमच्या या प्रतिसादाने माझे डोळे उघडले.. माझा गैरसमज दूर झाला.
माझ्या वरील प्रतिसादाबद्दल ठाण्यात दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे.. आलात की कळवा.. दिलगिरीसाठी बसण्याचे ठिकाण तुम्हीच ठरवा..
गविशेठ
In reply to पराशेट... तुमच्या या by गवि
अहो, बसण्यासाठी म्हणूनच येतो की सरळ. ;)
बाकी मी वर जे सांगीतले ते फक्त सायबर कॅफे साठीच नाही, तर मेडीकल स्टोर्स, इलेक्ट्रिक गुडस, भांडे व्यापारी इ. ठिकाणी देखील लागू आहे. ह्या व्यापार्यांचा संघटना तुमच्या तक्रारीची दखल घेतातच घेतात.
वम
In reply to गविशेठ by परिकथेतील राजकुमार
पराशेठ, मनापासुन धन्यवाद ह्या महिती बद्दल. खुपच महत्त्वपुर्ण व उपयोगी माहिती. :)
हाहाहा
In reply to पराशेट... तुमच्या या by गवि
हाहाहा... आरसा, आरसा आहे तो गवि. ;)
(No subject)
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
:)
सूर आवळायचा असेल 'आळवायचा'
In reply to सल्ला ? by परिकथेतील राजकुमार
सूर आवळायचा असेल
'आळवायचा' असं म्हणायचं असावं.
हॅ हॅ हॅ हॅ!
In reply to सूर आवळायचा असेल 'आळवायचा' by रेवती
चालायचंच, पराशेठ सध्या 'मंदाकिनी'चा पुढचा भाग लिहीत असतील! ;)
अवांतर - पण बेसूरपणे सूर आळवणार्या गायकाचा सूर खरंच आवळून टाकावा असं वाटल्यास नवल नाही! ;)
(अ'सुरी')रंगा
पराशेठ जरा सिरीयसली घ्या
In reply to हॅ हॅ हॅ हॅ! by चतुरंग
पराशेठ जरा सिरीयसली घ्या
एकदम सुन्न झालो वाचून.....
एकदम सुन्न झालो वाचून..... डोळे पाणावले :(
;) ;)
मि त्र घ्रीच एक प्रिंट्र
मि त्र घ्रीच एक प्रिंट्र घेत्लाय. प्रिंट, स्कॅन अन झेरॉक्स कढुन मिल्ते. तुम्हीप्न घ्या. स्वस्तात पडेल.
मि प्न घेत्लय प्रिन्तेर अनि
In reply to मि त्र घ्रीच एक प्रिंट्र by शिल्पा ब
मि प्न घेत्लय प्रिन्तेर अनि चोपिएर.
पन खुप्च स्लो अहे. क्षेरोक्ष तर फर्फर हलु निघ्ते.
(No subject)
In reply to मि प्न घेत्लय प्रिन्तेर अनि by गवि
:D :D :D
यहा ऐसा ही है ????
त्या **व्याला (बुडव्याला) मराठी माणसाचा हिसका दाखवायचा ..
बाहेरून येउन इथे आम्हालाच चुना लावतो कारे ...असा सज्जड दम भरायचा ..
कोणत्याही एका सेनेचे नाव फेकायचे ..आणि बघुन घेतो असे म्हणायचे ...
एका मिनिटात सरळ होतात...
बाहेरून
In reply to यहा ऐसा ही है ???? by कपिलमुनी
बाहेरून ? मुंबईकर दोनच. कोळी आणि पाठारे प्रभु. बाकी सगळे बाहेरचे.
पॅरीटी
या निमित्त परा ला विविध मसाज सेंटर मधील दरामधे असलेली डीस्पॅरीटी दुर करण्याचे आंदोलन हाती घ्यावे अशी विनंती करतो.
अहो
In reply to पॅरीटी by विनायक प्रभू
अहो तिथे "गुणवत्ते'प्रमाणे डीस्पॅरेटी असणारच. सगळ्या हॉटेलात थाळीचा दर एकच असतो का ?
पावती दिलीच पाहिजे ह्यासाठी त्यांच्यांवर राजकिय पक्षांना सोडता येईल.
प्रिन्ट
"प्रिन्ट आउट" एकच असतो ना?
कागदाची गुणवत्ता
In reply to प्रिन्ट by विनायक प्रभू
कागदाची गुणवत्ता, प्रिंटरचा दर्जा, शाई, कॅफे वातानुकुलित आहे की नाही? हे सगळे नाय पकडायचे किंमतीत?
प्रसन्नापण पेटलाय घरी सांगु
In reply to कागदाची गुणवत्ता by चिरोटा
प्रसन्नापण पेटलाय
घरी सांगु का रे ;)
कुथे लहाता ?
@ निवेदिता=ताई, तुम्हाला एका प्रिंटला दहा रुपये पडले ? ते डाईंग हाउस मधले साडीवरचे प्रिट आहे का ? " की तुम्ही एवलेस्त वर लहाता ?
पीजे
पीजे वॉर्निंग>
प्रिंटाउटचा कागद अ-फाट असेल !
घरीछ प्रिंटर घ्या..इथे का
घरीछ प्रिंटर घ्या..इथे का बोअर मारताय