✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फुलांच्या रांगोळ्या-२

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Tue, 01/03/2012 - 19:59  ·  लेख
लेख
गेल्या वेळेस टाकलेल्या ''माझ्या फुलांच्या रांगोळ्यां''ना स-मस्त मिपाकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्या नंतर हा भाग टाकेपर्यंत मधे बराच वेळ गेला.या वेळी टाकलेले फोटो हे गेल्या३ महिन्यात-म्हणजेच आमच्या भटजीगिरीच्या फुल्ल सिझन मधे काढलेल्या रांगोळ्यांचे आहेत,त्यामुळे थोडं रिपिटेशनं(ही) आलेलं आहे...असो,अता टॉस नंतरच्या समालोचनात फार वेळ न घालवता,डायरेक म्याच सुरु करतो...तेंव्हा लेट्स एंनजॉय दी गेम... :-) सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत,कृपया चांगले दिसवुन घ्यावेत ;-) (नवा क्यामेरा लवकरच येत आहे.)

Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-२

  • ‹ माझ्या फुलांच्या रांगोळ्या
  • Up
  • फुलांच्या रांगोळ्या-सप्तपदी विशेष ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
57263 वाचन

💬 प्रतिसाद (94)

प्रतिक्रिया

निर्विवादपणे सुंदर

प्रचेतस
Tue, 01/03/2012 - 20:19 नवीन
निर्विवादपणे सुंदर रांगोळ्या. _/\_ भटजीबुवा तुम्ही खरेच हाडाचे कलाकार आहात.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ! झक्कास ! जबरदस्त

पियुशा
Wed, 01/04/2012 - 11:42 नवीन
अप्रतिम ! झक्कास ! जबरदस्त ! लय भारी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पियुशा बै...

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 16:00 नवीन
@-लय भारी ;-) >>> :-~ :puzzled: आँ... पियुशा बै...लय भारी को डोळा क्युं मारी...? ..ऐसा लागत है,की श्रीखंड के सामने आई चाय के साथ खाने की खारी :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

नयनरम्य रांगोळ्या.

गणपा
Tue, 01/03/2012 - 20:25 नवीन
नयनरम्य रांगोळ्या.
  • Log in or register to post comments

अगदी हेच म्हणते.

रेवती
Tue, 01/03/2012 - 20:37 नवीन
अगदी हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वा... सुंदर ! (कला प्रेमी)

मदनबाण
Tue, 01/03/2012 - 21:20 नवीन
वा... सुंदर ! :) (कला प्रेमी) :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

स्मिता.
Tue, 01/03/2012 - 21:21 नवीन
या भागातल्याही सर्वच रांगोळ्या खूप खूप आवडल्या. कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही. एवढ्या काटेकोरपणे या रांगोळ्या काढायला बराच संयम लागत असेल ना? फोटो क्र. ५, ८, ११ मधल्या रांगोळ्या सगळ्यात आवडल्या. निशिगंध की तत्सम फुलांना एकात एक घालून केलेली झालर क्लासच दिसतेय.
  • Log in or register to post comments

स्मिताजी धन्यवाद...!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 00:22 नवीन
@-कितीही वेळा पाहिल्या तरी समाधान होत नाही>>> हा हा हा...थँक्यू @-एवढ्या काटेकोरपणे या रांगोळ्या काढायला बराच संयम लागत असेल ना?>>> संयम लागतोच,पण पुढे पुढे सवयीचं होऊन गेल्यावर चिकाटी जास्त लागते... कारण रांगोळी काढता/काढता कंटाळा यायला लागला,तर उपयोगी पडते ती चिकाटीच...! @-निशिगंध की तत्सम फुलांना एकात एक घालून केलेली झालर क्लासच दिसतेय...>>> फुलांच्या रांगोळीतलं हे सर्वात कंटाळा अणवणारं काम आहे,आधी तो निशिगंध कडक हवा,मऊ पडलेला नको हे पहावं लागतं,नंतर तो जिथे बेंड होतो तिथे तोडून मग एकात एक अडकवणे हे काम,ते झालं की मग तो एकापुढे एक रचत रचत तिरके गोल आकार देत जायचं... म्हणुन ती झालर आल्यासारखी दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

_/\_

स्मिता.
Wed, 01/04/2012 - 16:40 नवीन
फुलांच्या रांगोळीतलं हे सर्वात कंटाळा अणवणारं काम आहे,आधी तो निशिगंध कडक हवा,मऊ पडलेला नको हे पहावं लागतं,नंतर तो जिथे बेंड होतो तिथे तोडून मग एकात एक अडकवणे हे काम,ते झालं की मग तो एकापुढे एक रचत रचत तिरके गोल आकार देत जायचं... म्हणुन ती झालर आल्यासारखी दिसते.
तुमच्या चिकाटीला सलाम हो भटजीबुवा! (एवढा संयम आणि चिकाटी बहुदा भटजी लोकांत दिसत नाही) राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

---

वपाडाव
Wed, 01/04/2012 - 16:46 नवीन
राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता...
ही चुक आम्ही होउ देणार नाही.... भटजी फिस्क करा एकदाचं.... तारीख अन पोरगी नंतर ठरवु....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

@-राहून राहून वाटतं की आधी

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 21:49 नवीन
@-राहून राहून वाटतं की आधी माहिती असतं तर आमच्या लग्नातल्या पुजेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच दिला असता... >>> पुजा श्रावणात(ही) किंवा अन्य वेळीही करातात*... ;-) *आधार-या पुजनाला दिवस मुहुर्त यांचं आगत्य नाही,पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही दिवशी आपले मन प्रसन्न असेल अश्यावेळेला-तोच उत्तम मुहुर्त समजून हे पूजन करावे... ..(सत्य-नारायण कथा-अध्याय पहिला मधुन सा-भार..आणी साभार उचलू दिल्या बद्दल कथा लेखक-सूत महर्षी यांचे आभार ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

अप्रतिम!!!!

अन्या दातार
Tue, 01/03/2012 - 21:24 नवीन
अप्रतिम!!!!
  • Log in or register to post comments

छान!

पैसा
Tue, 01/03/2012 - 21:27 नवीन
पण याना मी रांगोळीपेक्षा पुष्पवल्ली म्हणेन!
  • Log in or register to post comments

सगळ्या रांगोळ्या सुंदर आहेत

जाई.
Tue, 01/03/2012 - 21:47 नवीन
सगळ्या रांगोळ्या सुंदर आहेत
  • Log in or register to post comments

वल्ली,गणपा,मदनबाण,अन्या,पैसा,

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 00:09 नवीन
वल्ली,गणपा,मदनबाण,अन्या,पैसा,जाईसाहित्ययात्री... धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

रांगोळ्या सुंदर आहेत ह्यात

मराठे
Tue, 01/03/2012 - 21:58 नवीन
रांगोळ्या सुंदर आहेत ह्यात वादच नाही. एक छोटी सूचना कराविशी वाटते, बघा पटतेय का. रांगोळीच्या खाली एखाद्या डार्क (डार्क निळा, जांभळा वगैरे) किंवा ब्राईट (केशरी, पिवळा वगैरे) रंगाचं कापड जर घातलं तर रांगोळी चांगली उठून दिसेल असं वाटतं. वरील बहुतेक सगळ्या रांगोळ्या फरशीवर आहेत ज्या बरेचदा पांढर्‍या रंगाच्या असतात; त्यात काही काही रंग फारसे उठून दिसत नाहीत. एखाद्या प्लेन रंगाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे/पानांचे रंग मस्त दिसतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments

मलाही तसच वाटतं. पांढर्‍या

रेवती
Tue, 01/03/2012 - 22:30 नवीन
मलाही तसच वाटतं. पांढर्‍या फरशीवर निशिगंध उठून दिसत नाही. काहीजणांकडे नक्षिदार टाईल्स असतात, त्यावेळी भटजीबुवांची ही कला उठून दिसण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. मी पुन्हा पुन्हा धाग्यावर येऊन फोटू पाहून जात आहे.;) गुरुजी, तुम्ही अल्बम बनवलाय का? त्यातून यजमान रांगोळी निवडू शकतील असे काही करता का? तुमच्या नवीन क्यामेर्‍यावर फोटू काढा आणि चिकटवा अशी विनंती करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

भटजी बुवा, तुम्ही यजमांनांना

५० फक्त
Tue, 01/03/2012 - 22:45 नवीन
भटजी बुवा, तुम्ही यजमांनांना वास्तुरंगावलीशास्त्रानुसार टाइल्स बदलायला लावत जा, टाइल बदलायचं कंत्राट मला द्या, पार्टनरशिप मध्ये करु अपण धंदा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणखी काही? तुमचा पाय बरा

रेवती
Tue, 01/03/2012 - 23:24 नवीन
आणखी काही?;) तुमचा पाय बरा झालेला दिसतोय्.......म्हणूनच सुचतायत या गोष्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पार्टनरशिप मध्ये करु अपण

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/03/2012 - 23:46 नवीन
पार्टनरशिप मध्ये करु अपण धंदा...>>> पन्नासराव,यजमानांच्या माझ्या न तुटणार्‍या कायमच्या धाग्यावर माझा बाजार उठवायचा इचार हाय काय तुमचा..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

रेवतीजी धन्यवाद...

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 00:24 नवीन
@-पांढर्‍या फरशीवर निशिगंध उठून दिसत नाही. काहीजणांकडे नक्षिदार टाईल्स असतात, त्यावेळी भटजीबुवांची ही कला उठून दिसण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे>>> उपाय सुचवत रहा...! मी त्याचा उपयोग रांगोळ्यांचं प्रदर्शन भरवणार आहे,तेंव्हा करणार आहे...! @-मी पुन्हा पुन्हा धाग्यावर येऊन फोटू पाहून जात आहे.>>> ह्हा ह्हा ह्हा...थँक्यू @-गुरुजी,तुम्ही अल्बम बनवलाय का? त्यातून यजमान रांगोळी निवडू शकतील असे काही करता का?>>>अल्बम आहे...यजमान निवडतात त्यातुन बरेच प्रकार... @-तुमच्या नवीन क्यामेर्‍यावर फोटू काढा आणि चिकटवा अशी विनंती करते.>>> क्यामेरा उद्या येणार आहे... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मराठे साहेब..तुमच्या सुचना

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/03/2012 - 23:57 नवीन
मराठे साहेब..तुमच्या सुचना मला माझ्या कामाच्या जागी वर्कऔट करणं मुष्किल आहे.या सर्व रांगोळ्या मी पुजा चालू असताना मिळेल त्या वेळात,जश्या मिळेल तश्या जागेत काढत असतो... वरिल सर्व सुचनांचा विचार मला जेव्हा माझं खास रांगोळ्यांचं प्रदर्शन भरवायचं आहे तेंव्हा नक्की करता येइल... नव्हे,मी तो करणारच आहे,,,सुचक प्रतिक्रीयेबद्दल मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

सर्वच रांगोळ्या सुरेख

सूड
Tue, 01/03/2012 - 22:43 नवीन
सर्वच रांगोळ्या सुरेख आहेत. शेवटून चौथ्या रांगोळीच्या दोन्ही बाजूला जी उभ्या सर्परेषांची नक्षी आहे ती पण तुम्हीच काढलीयेत का ? छान दिसतेय ती .
  • Log in or register to post comments

त्यासाठी रांगोळीने जाड नक्षी

रेवती
Tue, 01/03/2012 - 23:27 नवीन
त्यासाठी रांगोळीने जाड नक्षी काढून त्यातून बोट फिरवतात असे वाटते. तू शिकून घे बेसिक रांगोळ्या. लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील.;) तुझी हितचिंतक, आज्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

''तू शिकून घे बेसिक

५० फक्त
Tue, 01/03/2012 - 23:37 नवीन
''तू शिकून घे बेसिक रांगोळ्या. लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील.'' वा वा, म्हणजे सुडचं काम झालेलं दिसतंय, मी म्हणलंच होतं त्याला इथला युजर आयडि लहान करुन घे, लगेच काम होईल, अशी अजुन एक दोन उदाहरणं आहेत, अंधश्रद्धा नाही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सोकाजीरावांनी पण आपला युजर

हंस
Fri, 01/06/2012 - 16:22 नवीन
सोकाजीरावांनी पण आपला युजर आयडी लहान करुन घेतल्याचे पाहीले.....................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आज्जी इज़ बॅक अगेन !!

सूड
Wed, 01/04/2012 - 17:19 नवीन
अरे वा !! आज्जी इज़ बॅक अगेन !! >>लग्नकार्य, सत्यनारायण, मंगळागौर, हळदीकुंकू अश्या समारंभांना तुलाच उपयोगी पडतील. शेवटचे दोन पाशवी शक्तींचे सोहळे असल्याने त्यात पाशवी शक्तींनीच रांगोळ्या काढाव्या असं मत आहे. आणि आता तर पहिल्या दोनचाही प्रश्न नाही भटजींनाच बोलावणार रांगोळ्या काढायला. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

@-उभ्या सर्परेषांची नक्षी आहे

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/03/2012 - 23:43 नवीन
@-उभ्या सर्परेषांची नक्षी आहे ती पण तुम्हीच काढलीयेत का ? छान दिसतेय ती .>>> होय ती बाजुची रांगोळीपण मीच काढलेली आहे... एकदा जमायला लागल्या की बोटांनी काढायच्या रांगोळ्यापण झकास येतात.रांगोळीची एक सरळ जाड लाइन टाकुन,मग एकाटोकापासुन इंग्रजी एस शेपमधे शेवटपर्यंत बोट फिरवत अणायचं,नंतर पुन्हा त्याच टोकाकडून उलट्याबाजुनी एसशेपमधे बोट फिरवायचं..झाली नागमोडी तयार... फुलांच्या रांगोळ्यांपेक्षा रांगोळीची फुलं काढणं सोप्प आहे.. :-) या बोटानी काढायच्या रांगोळ्या हल्ली झीमराठी वर सकाळी रामराम महाराष्ट्र मधे दाखवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

क्लास !!!

धन्या
Tue, 01/03/2012 - 23:20 नवीन
क्लास !!!
  • Log in or register to post comments

आपले अभिनंदन! फारच छान

दीपा माने
Wed, 01/04/2012 - 00:25 नवीन
आपले अभिनंदन! फारच छान रांगोळ्या आहेत. फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात. फुलातल्या फुलातही काही फुले लौकर कोमजतात तर काही उशीरा!
  • Log in or register to post comments

@-फुलांच्या रांगोळ्याना

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 09:15 नवीन
@-फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात.>>> आमचे काही यजमान फुलं कोमेजू नयेत यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरुन रांगोळी ४-४/५-५ दिवस ठेवतात,असाही अनुभव आहे. @-फुलातल्या फुलातही काही फुले लौकर कोमजतात तर काही उशीरा!>>> हे बाकी खरं आहे,ते फुला-फुलांवर अवलंबुन आहे... ;-) निसर्गाची करणी,त्याच्यावर आपण किती मारणार पाणी..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

@-फुलांच्या रांगोळ्याना

धनुअमिता
Wed, 01/04/2012 - 14:01 नवीन
@-फुलांच्या रांगोळ्याना नेहेमीच्या रांगोळ्यांप्रमाणे जास्त दिवस जतन करता येत नाही कारण फुलं कोमजतात.>>> आमचे काही यजमान फुलं कोमेजू नयेत यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरुन रांगोळी ४-४/५-५ दिवस ठेवतात,असाही अनुभव आहे. आम्हांलाही सांगा कि राव ती युक्ती निसर्गाची करणी,त्याच्यावर आपण किती मारणार पाणी..? हसुन हसुन डोळ्यात पाणी आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@-आम्हांलाही सांगा कि राव ती

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 22:53 नवीन
@-आम्हांलाही सांगा कि राव ती युक्ती...>>>....या युक्या किंवा उपाय,हवामान पाहुन करायच्या आहेत... १) दर १ दिवसानी अ‍ॅस्प्रिनच्या पाण्याचा स्प्रे मारणे...थंडीत नुसतं पाणी चालतं. २)२दिवसातुन एकदा-बाटलीभर पाण्यात चिमुटभर साखर टाकुन.त्याचा स्प्रे मारणे,यामुळे फुलं कडक राहतात. ३)उन्हाळा खूप असेल तर रांगोळीच्या खोलीत थंडावा राहिलसे पहाणे,(अगदी एसी सुद्धा लावातात काही जण)... ४)आणी सर्वात महत्वाचं-लहान मुलां***पासुन रांगोळीचं रक्षण करणे... ***उदा--- लाहान्या-आई..आई हे ब,काय? आई-काय..? लहान्या-हापी बद्दे...मी शगले गुलाब आन्ले...! आई-कुठुन ते..? लाहान्या-गुल्जींच्या लांगोलीत पल्लेवते...! (आणी गुलाब उचलताना लहान्या अमच्या रांगोळीत पडलावता=रांगोळीची इतिश्री)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनुअमिता

खुप खुप आभार तुमचे ही युक्ती

धनुअमिता
गुरुवार, 01/05/2012 - 11:43 नवीन
खुप खुप आभार तुमचे ही युक्ती सांगितल्या बद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आपल्या हातात कला आहे गुरूजी

पाषाणभेद
Wed, 01/04/2012 - 00:37 नवीन
आपल्या हातात कला आहे गुरूजी
  • Log in or register to post comments

सुरेख!!

कौशी
Wed, 01/04/2012 - 03:34 नवीन
खुप छान आहेत रांगोळ्या ..
  • Log in or register to post comments

व्वा व्वा.... इतक्या सुंदर

सुहास झेले
Wed, 01/04/2012 - 06:51 नवीन
व्वा व्वा.... इतक्या सुंदर रांगोळ्या काढता, तरी तुमचा आत्मा अतृप्त कसा ;) सुंदर कलाकुसर आहे, हा भाग देखील आवडला .... लगे रहो :) :)
  • Log in or register to post comments

इतक्या सुंदर रांगोळ्या काढता,

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 09:05 नवीन
इतक्या सुंदर रांगोळ्या काढता, तरी तुमचा आत्मा अतृप्त कसा ?>>> मुद्याचं बोल्लात...! आत्मा अत्रुप्त आहे,म्हणुन तर नव्यानव्या रांगोळ्या सुचतात...(आणी सौंदर्य(ही) राहतं ;-) )...! आत्मा त्रुप्त झाला,तर मुक्ति मिळेल...पक्षी-कामात पाट्या टाकल्या जातील,म्हंणजे खेळ खल्लास...आमचाही आणी रांगोळ्यांचाही..! काय म्हणता.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

यप्प... असेच अतृप्त रहा

सुहास झेले
Wed, 01/04/2012 - 09:12 नवीन
यप्प... असेच अतृप्त रहा ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असेच अतृप्त रहा>>> ते आमचं

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 09:20 नवीन
असेच अतृप्त रहा>>> :-) ते आमचं आत्मलिखित(च) आहे... :-) (पूर्ण इहलौकिक)-अत्रुप्त आत्मा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

फुलोंकी रंग से........

जयंत कुलकर्णी
Wed, 01/04/2012 - 07:52 नवीन
फुलोंकी रंग से........
  • Log in or register to post comments

@@@@ व्वा अप्रतिम बोले तो झक्कास @@@@

लीलाधर
Wed, 01/04/2012 - 08:50 नवीन
व्वा व्वा भटजीबुवा मन कसं प्रफुल्लीत झालं हो सकाळी सकाळी. शेवटी ही जी कला आहे ही देखील नैसर्गिक आहे. एकच म्हणेन हे निसर्गाचं दान आहे आणि भटजी बुवांच्या हाती कलेचं मैदान आहे. व्वा व्वा बुवा मजा आला. येऊ द्यात अशाच रांगोळ्या आणि लवकरात लवकर रांगोळ्यांचे प्रदर्शन भरो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

धन्या,दिपा

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 08:59 नवीन
धन्या,दिपा माने,पा.भे,कौशी,जयंत कुलकर्णि,सुहास झेले,चतुर चाणक्य...सर्वांना धन्यवाद..!
  • Log in or register to post comments

मस्तच आहेत सगळ्या

किसन शिंदे
Wed, 01/04/2012 - 09:23 नवीन
मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या. वरून ५ व्या फोटोत ती गुलछडी एकात एक गुंफताना झाडूच्या काडिचा वापर केला होता कि अशीच एकमेकांत गुंफली आहेत?
  • Log in or register to post comments

@-झाडूच्या काडिचा वापर केला

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/04/2012 - 17:48 नवीन
@-झाडूच्या काडिचा वापर केला होता कि अशीच एकमेकांत गुंफली आहेत?>>> डायरेक्ट एकमेकात गुंफलेली आहेत... :-) अवांतर- रांगोळी या प्रकारात आंम्ही कुठेही काडी करत नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कला आणि साधन..

प्रभाकर पेठकर
Wed, 01/04/2012 - 10:28 नवीन
सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत आपल्या हातातील कला आणि मोबाईल दोन्ही उच्च प्रतिचे आहे. प्रदर्शन भरवाल तेंव्हा आधी जरूर जरूर जरूर कळवा. भारतात असलो तर १००% भेट देईन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मी-सौरभ
Wed, 01/04/2012 - 10:59 नवीन
बुवा: तुम्हाला आता अजुन प्रसिद्धी मिळेल अन कार्यं पण... ;) अवांतरः पेठकर काका तुम्ही कुठल्या देशात् असता??
  • Log in or register to post comments

मस्कत..

प्रभाकर पेठकर
Wed, 01/04/2012 - 13:56 नवीन
पेठकर काका तुम्ही कुठल्या देशात् असता?? गेली ३० वर्षे मी, अरबस्थानातील एक देश, सल्तनत ऑफ ओमान (पुर्वाश्रमीचे 'मस्कत') इथे कार्यरत आहे. हा देश भारतापासून, विमानाने, अंदाजे अडीच तास अंतरावर आहे. दुबई-शारजा पासून, रस्त्याने, ४ तासांचा प्रवास आहे. म्हणजे आपल्या पुणे-मुंबई सारखेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

@-तुम्हाला आता अजुन प्रसिद्धी

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 15:46 नवीन
@-तुम्हाला आता अजुन प्रसिद्धी मिळेल अन कार्यं पण... :-D अस्स काय...! मग सत्य-साई...बा...बां...सारखं मी ही म्हणतो,माय वर्क इज माय व्हिजिटिंग कार्ड ;-) कशे वाट्टे...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

जबरदस्त.

जागु
Wed, 01/04/2012 - 11:38 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा