Skip to main content

वसा..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 16/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा! आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा -प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3447
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सुंदर रचना!!

सुंदर! घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या हे खासच! वारसा तर तुला दिलाच आहे कवितेनं. :)

In reply to by क्रान्ति

वारसा तर तुला दिलाच आहे कवितेनं - सहमत. शेवटचे कडवे अतिशय सुंदर! राघव

In reply to by क्रान्ति

घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या हे खासच! वारसा तर दिलाच आहे कवितेनं सेम टू सेम बोल्तो. -दिलीप बिरुटे

गेले काही दिवस मिपाच्या या दालनात चांगल दान पडतय. आनंद जाहला. :)

कविता खूप आवडली.