बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा!
आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा
टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा
लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही
प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही
अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या
अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या
वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा
-प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3447
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!!
सुरे़ख!!!
निव्वळ अप्रतिम
मस्त रचना
वा!
+१
In reply to वा! by क्रान्ति
मस्तच.
In reply to वा! by क्रान्ति
छान गं तायडे.
छान आहे कविता ! घाल कविते दान
छान कविता...
सुंदर आहे कविता आवडेश
मनापासून आभार सर्वांचे!
वा! आवडली!
मस्त!