मुल्ला नसीरुदीन
लेखनप्रकार (Writing Type)
काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे. त्यातच कधी अद्वैतचे आजी आजोबा खाउ खायला बोलवत, गोष्टी सांगत, पुस्तके वाचायला देत.
अकबर-बिरबल, तेनालीराम, मुल्ला नसीरुद्दीन, इसापनीती , पंचतंत्र, विक्रम्-वेताळ अशा साध्या साध्या कथातून रंजक पण संदेशयुक्त असे वैचारिक खाद्य डोक्याला मिळे.(तेव्हा फक्त रंजक म्हणूनच वाचले. त्याचे उपयुक्तता मूल्य आज जाणवते आहे, तेही विशेष्तः "self help"च्या नावाखाली दिवसाला डझनावारी निघणार्या पुस्तकांच्या जमान्यात.)
अशाच काही गोष्टी आठवतील तशा इथे देतोय. ह्या सर्व परंपरेने सांगितल्या गेलेल्या लोककथा आहेत :-
ह्याच्या बर्याच गोष्टीतून हे व्यक्तिमत्व कधी यडपट तर कधी वाक्चतुर, कधी लबाड्/धूर्त्/कावेबाज, कधी थेट जीवनावर खट्याळ भाष्य करनारे, कधी सूफी तत्वज्ञान मांडणारे दिसते. कधी सामान्याची ,दरिद्री माणसाची व्यथा मांडत R K Laxman ह्यांच्या common man च्या व्यंगचित्राचेच शब्द रूप वाटते.
गोष्ट १:-
कुठल्याही इतर ख्यातनाम विद्वानाप्रमाणे(सॉक्रेटिस्,कन्फ्युशिअस वगैरे) मुल्ल नसीरुदीन दरिद्री व कर्जबाजारी होताच. एकदा त्याच्याकडे राहिलेल्या थकबाकीला तो काहिच दाद देत नाही म्हणून एका सावकाराने त्याची एका काझीकडे/न्यायाधीकडे तक्रार केली. खटला सुरु झाल्यावर मुल्लाने प्रथम बोलायला सुरुवात केली.
मुल्ला:- "मी माझी गाय व घोडा विकून सदर सावकाराचे पैसे परत करण्यास तयार आहे. खटला मिटवावा."
सावकारः- "छे छे काझी साहेब. ह्या कफल्लक भिकार्याकडे गाय, घोडा काहिच नाही. धडधडित खोटे बोलतोय हा
ह्यायाकडे तर खायला पैसेही नाहित अन् नेसायला कपडेही नाहित."
मुल्ला:- "बघा. म्हणजे ह्याला ठावूक आहे की मजकडे खरोखरच पैसे नाहित. मी काही माझ्याकडे असूनही ह्यला देत
नाही असे नाही. तस्मात्, मला शिक्षा करूनही ह्यला काहीही मिलण्याची शक्यता नाही. बाहेर राहिलो तर
एखादेवेळेस काम धंदा करून पैसे देइन."
आणि मुल्ला सुटला!
गोष्ट२:-
एकदा दिल्लीच्या गजबलेल्या बाजारात साहेब पोचले. स्वस्थ बसलेल्या दुकानदाराकडे पाहून साहीब सुरु:-
मुल्ला:- तुमच्याकडे चामडे आहे काय?
दुकानदारः- हो. किती हवे?
मुल्ला:- नुसते ते घेउन काय करु? शिवायला दोरा व दाभण आहे काय?
दुकानदारः- हो तेही आहे. दोन्ही घ्या की आमच्याकडनच.
मुल्ला:- बस्स मग. आता फक्त दोन लहान खिळे मिळाले की पुरे.
दुकानदार(आशेने व अजिजीने) :- हो. हो. खिळे सुद्धा आहेत की. हे घ्या आत्ता देतो काढून.
मुल्ला:- एवढे सगळे आहे, तर रिकामा का बसला आहेस? जरा बूड हलवून उत्तम जोडे शिवत का बसत नाहिस? :)
गोष्ट३:-
मुल्ला जी आपल्या झोपडीवजा घराबाहेर शिळ्यापोळीचे तुकडे टाकत असताना शेजार्याने कुतुहलाने विचारले:-
शेजारी:- "काय हुजूर काय हे काय चाल्लय?"
मुल्ला:- (स्थिर चित्त)"काही नाही. इकडे वाघ फिरकू नये म्हणून शिळ्या पोळिचे तुकडे टाकतोय."
शेजारी:- "अरे पण ह्या इलाख्यात कुठे वाघ आहेत?"
मुल्ला:- (विजयी स्वरात)"तेच तर म्हणतोय. बघ माझा इलाज कस्ला यशस्वी झालाय!"
गोष्ट ४:-
मुल्लाच्या दोन्ही बायका त्याला विचारत "आमच्यापैकी कुनावर तुझे अधिक प्रेम आहे?"
तो वैतागून जाई. एकदा त्याने एकांतात प्रत्येकीला एक एक माणिक दिले. व सांगितले की "दुसरीला सांगशील तर ती असूयेने तुझा मणी घेईल. तुलाच त्रास होइल."
ह्या भीतीने दोन्ही बायका कधीच एकमेकींना आपल्याकडे मणी आहे हे सांगू शकल्या नाहित.
पुन्हा जेव्हा कधी मुल्लाला "अधिक प्रिय कोण" हा प्रश्न त्या बायका विचारत, तेव्हा तो गंभीर होउन म्हणे:
"माझे खरे प्रेम जिच्यावर आहे तिला मी माणिक दिलेलाच आहे. पण दुसरीही इतकी समजूतदार आहे की ती पहिलीचा हेवा न करता हे मान्य करते व सुखासमाधानाने आमच्यासोबत राहते. तिचा हा मोठेपणा!"
दोन्ही बायका आपणच त्याच्या कशा लाडक्या व दुसरी समजूतदार आहे म्हणून ऐकून तरी घेते असा सहानूभूतीपूर्ण उसासा मनात टाकत मनोमन खुश होत!!
गोष्ट५:-
मुल्ला हे अतीव प्रसिद्ध व लोकप्रिय व्यक्तिमत्व झाल्याने साहजिकच काहीजण त्याच्यावर जळतही असत, द्वेषही
करत.त्यात दरबारातले सरदार, काझी ही मंडळीही होती. एकदा मुल्ला रस्त्याने जाताना एका अनोळखी माणसाने त्याला फाडकन एक थोबाडित लगावली. व पुढच्याच क्षणी मुल्लाचा चेहरा निरखत तो माफी मागू लागला. "माफ करा साहेब.. मला वाटलं आपण दुसरेच कुणी आहात. चुकून लगावली."
मुल्ला मात्र ऐकेना. त्याने सरळ त्या माणसाला धरून काझीसमोर उभे केले. काझीचेच हे कारस्थान असल्याचे त्याच्या थोड्याच वेळात लक्षात आले. काझीने निवाडा दिला तो असा :-
"सदर माणसाने मुल्लाला केवळ चापट मारली आहे.कोनतीही इतर वित्तहानी वगैरे केलेली नाही. त्याबद्दल तो माफीही मागतो आहे.सबब, त्याने मुल्लाला रु१ दंड म्हणून द्यावा ; मग त्याला सोडण्यात येत आहे."
मुल्ला:- (मनातून वैतागून व वरवर गंभीरपणे):- "एखाद्याला थोबाडित मारल्यावर इतकी शिक्षा खरोखरच पुरेशी आहे
असे वाटते का?"
काझी:- "होय . नक्कीच.कारण त्याने माफिही मागितली आहे."
मुल्लाने तत्क्षणी खाडकन् सगळ्यांदेखत काझीला कानाखाली लगावली.वर "काझीजी,तुमची माफी मागतो " असे म्हटले व त्या अनोळखी माणसाकडून येणारा रुपया तुम्हीच ठेउन घ्या असेही सांगितले!!
अजूनही पुष्कळ किस्से आहेत. सवड झाल्यास आथवतील तसे टंकत जाईन.
प्रतिक्रिया
शेवट्चा जबरी........
सिंदबाद झाला, मुल्ला
छान आहेत कथा ..
हुशार....
सगळ्या कथा अवडल्या...पण चवथी
आधुनिक (आंतरजालीय) मुनची
बाबौ...पण्णासराव,,,खत्री
बोंबला तिच्यायला...
म्हटले असेल तरी असेच टाकत
छे छे मन १ तुला उद्देशुन नाही
ओ 'हर्षद छत्रपति' ? (नुसता
एकदम फिट्ट बसतोय प्रकाटाआ चा
ठो ~~~~~>
मस्त कथा
किस्से छान आहेत !!
हा हा.