✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्न पाहवे करून पार्ट -२

व
विवेकखोत यांनी
Wed, 11/30/2011 - 16:21  ·  लेख
लेख
सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. ) माझे आजोबा नेहमी म्हणायचे कि "लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून " या गोष्टी आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणतात . घर अहून बांधायचे आहे पण लग्न मात्र करतो आहे . हा तर मंडळी माझा सांगायचा उद्देश असा होता कि enganement चा प्रवास हा खूप छान होता. असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता. लग्न आपल्या कडे एक कुटुंब संस्था म्हणून प्रचलित आहे. म्हणजे नुसते सोबत राहून (लीवइन ) खरच ती भावना, ते प्रेम किंवा जे बंधन आहे ते निर्माण होते का ? विषयांतर करत नाही पण जे लोक लग्नाची इंनिंग सुरु करता तेच खूप मोठी खेळी खेळतात. मला तर खूप छान vaatte आहे कि आपल्या सोबत अजून एक व्यक्ती आहे हक्काची जी नेहमी मला एक प्रेरणा स्थान असेल. माझ्या मध्ये बरेच चांगले बदल झाले आहेत. लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो. पण असो माझ्या साठी तर लग्न हि गोष्ट खूप छान बदल घेऊन आली आहे. माझी career growth पण छान झाली. कॉलेज मध्ये असताना जो माझ्या तला कवी व लेखक (म्हणू शकता ) जो कामाच्या रगाड्यात मेला होता, तो तिच्या मुळे जागा झाला व मी माझा पहिला वाहिला पोस्ट लिहिला आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे. मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. तुमी म्हणत होता कि आता पासून बायकोचे ऐकता, पण जर चांगल्या सवयी जोपासत असतील तर काय हरकत आहे. आणि त्या रूपाने मी. पा. ला एक नवीन लेखक पण मिळाला (हि हि हि ). तर मंडळी आयुष्याची नवीन खेळी साठी मला तुमच्या सर्वाच्या आशीर्वादा ची आणि शुभेछ्या ची गरज आहे.

Book traversal links for लग्न पाहवे करून पार्ट -२

  • ‹ लग्न पाहावे करून.
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
21269 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

_/\_

धमाल मुलगा
गुरुवार, 12/01/2011 - 11:15 नवीन
वा र लो! हसता हसता, बसल्या खुर्चीतून कोसळलो राव! ओ रामदासकाका, च्यायला, प्रतिसादापुर्वी 'वैधानिक इशारा' देत चला हो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
गुरुवार, 12/01/2011 - 11:24 नवीन
ठ्ठो !!! :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

तुंबलेले खोत आहेत. .हळूहळू

सुहास..
गुरुवार, 12/01/2011 - 14:21 नवीन
तुंबलेले खोत आहेत. .हळूहळू मोकळे होतायत >> खिक्क ! ओ रामदासकाका ! लोकं हाफिसात असतात की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+/-

अन्या दातार
Wed, 11/30/2011 - 18:24 नवीन
>>लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. - पालक किंवा भाउ बहीण हे करत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? पालक्/भाऊ-बहिण सांभाळून घेत नाहीत असे नाही, पण नातं आड येत असावे. प्रत्येकाची लेव्हल एकच असत नाही. कुणी लहान असते किंवा मोठे. एकाच वयाचे असतील तर जरा ठिक आहे. >>आय अ‍ॅम बेटर मॅन ' हा इगो माझ्यामते जोडीदाराबरोबर बोलताना येत असावा. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आपला धागा वाचताना

jaypal
Wed, 11/30/2011 - 17:55 नवीन
वाटल की पुढिल काही धाग्यांच्या लिंका आपणास उपयोगी ठरतील म्हणुन ही सप्रेम भेट. Image removed.Image removed." http://www.misalpav.com/node/19792 http://www.misalpav.com/node/19808
  • Log in or register to post comments

थांबा हो

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 18:00 नवीन
अजुन लग्न व्हायचा आहे .. मिपा करांना भारी घाइ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

शुभ॓चा

farnaz naikwadi
Wed, 11/30/2011 - 18:35 नवीन
खउप शुभ॓चा भावि आयुषअसटि.
  • Log in or register to post comments

दंपत्यो: अविच्छिन्ना

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/30/2011 - 18:48 नवीन
दंपत्यो: अविच्छिन्ना प्रीतिरस्तु...। :-) ह्या आणी त्या कायमच्या गाठ पडणाय्रा दोन्ही धाग्यांबरोबर आपला संसार प्रीतिमय,सुखाचा होवो.... :-) हिच सदिच्छा...! जवळ जवळ येता मिलनाचा मुहुर्त... उभय तरुण जीवा शब्द वाटतीलं व्यर्थ... :-) झटपट पटपट आता अंतःपट दुर सारा... अन अधिर बहुत होता पंख येतिल हारा बोला....शुभ मंगलं सावधान...। अवांतर:-हा आमचा लग्नात मंगलाष्टकात सगळ्यात शेवटी उडवायचा फ्यान्सी अ‍ॅटम आहे.... इथे लग्न या विषयावरुन ( आणी खालुनही ;-) ) इतकी चर्चा चालली आहे की हे म्हटल्या शिवाय रहावलेच नाही... :-)
  • Log in or register to post comments

बुवा

मी-सौरभ
Wed, 11/30/2011 - 23:53 नवीन
तुमाला लग्नाची सुपारी मिळणार हे नक्की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तारा बलं

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/01/2011 - 00:01 नवीन
तदेवलग्नं सुदिनं तऽऽदेदेवऽऽ ताऽऽराऽऽबलं चंद्र बलंत देऽवऽ विद्याऽबलंऽ दैवबलंततदेऽऽऽवऽऽऽऽ लक्ष्मी पतेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ * (तदैव लग्नं सुदिनं तदैव, ताराबलं चंद्रबलं तदैव, विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मिपतिम तेंघ्रियुग्मस्मरामि) म्हाइतै. पन ते भड्जी म्हंतात ते टाईप्लंय वर्ती. अन लक्ष्मी पते नंतर ते ब्यांडवाले वाजाडू वाजाडु काय आइकू येईना करतात.* (आनंदी होऊन ब्यांड बडविणारा) गोपाळ
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच.

साती
गुरुवार, 12/01/2011 - 01:24 नवीन
स्वतःचं लग्न ठरल्यामुळे एवढा आनंदी होणारा मुलगा मी पहिल्यांदाच बघतेय. तुमच्या आनंदाने आणि उत्साहानेच मला आनंद वाटतोय. खोतसाहेब,लिहित जा हो अधूनमधून(च). लग्नानंतर एक दिवसाने,एक महिन्याने,एक वर्षाने आणि मग दरवर्षी असं लिहिलेली दैनंदिनि नंतर वाचा आणि आम्हाला वाचायलाही द्या. (थोडक्यात त्यापेक्षा जास्त फ्रिक्वेंटली स्वतःच्या लग्नाचा विचार करत बसू नका.)
  • Log in or register to post comments

हे बघा खोतानु, मिपाकर खांदा

स्पंदना
गुरुवार, 12/01/2011 - 06:14 नवीन
हे बघा खोतानु, मिपाकर खांदा देण्यात कंदीबी माग नाय हटायच तर आता तुम्हाला आनंद झाला अन थोडा बहुत दुसर्‍यांच्या खांद्यावर उधळावासा वाटला तरी मिपाकरांचे खांदे माग हटणार नाहीत, अन एक सा आठ म्हैन्यान जवा तुमाला धबाधबा रडायला परत कुटला खांदा शोधु अस वाटल तवा बी ह्ये खांदे असेच तयार असतील , तवा उधळा उधळा अपना च खांदा समझके ...
  • Log in or register to post comments

ख च्या ठिकाणी क वाचले आणि

अन्या दातार
गुरुवार, 12/01/2011 - 08:14 नवीन
ख च्या ठिकाणी क वाचले आणि फुटलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

फक्त वाचुनच "फुटलास"? अवघड

मृत्युन्जय
गुरुवार, 12/01/2011 - 10:02 नवीन
फक्त वाचुनच "फुटलास"? अवघड आहे लेका तुझे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

असा काही नाही हे अनुभवणारा मी

प्रचेतस
गुरुवार, 12/01/2011 - 08:56 नवीन
असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता.
अनुभव पिक्चर पाहिलाय का तुम्ही? नसल्यास जरूर अनुभव पाहून अनुभव घ्या.
  • Log in or register to post comments

रोजनिशी

विनायक प्रभू
गुरुवार, 12/01/2011 - 10:04 नवीन
रोजनिशी रोज लिहा बर का? चार पाच दिवसांनी एकदाच नको.
  • Log in or register to post comments

मला रोज निशी लिहिण्याची सवय

मृत्युन्जय
गुरुवार, 12/01/2011 - 10:05 नवीन
मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. दिसतेच आहे. समर्थ म्हणुनच गेले आहेत 'दिसामाजी लिहित जावे' आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे. वाय्झेड कोण तो प्रतिसाद देणारा?
  • Log in or register to post comments

अग्ग्ग्ग्गं!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/01/2011 - 11:24 नवीन
काय तर इदरकल्याणी म्हणायचं पब्लिक! त्या खोताला आधी बोहल्यावर तर चढू द्या की. लगिन ठरलंय खोताचं, आन खुळावलीए जन्ताच. घ्या खोतसायेब, बेगानी शादीमें किती अब्दुल्ले दिवाने हैत का नाय? आता येक करायचं, लग्नाची पत्रिका हितं मिपावर द्याची, सगळ्यांना आमंत्रण करायचं..येतोच सगळे आहेरात चांदीचा पेला, तुळशीच्या मंजुळा, कांद्याचे गड्डे घेऊन. क्काय? :D
  • Log in or register to post comments

पार्ट ३

विनायक प्रभू
गुरुवार, 12/01/2011 - 11:28 नवीन
हस्तकला ते चित्रकला- एक प्रवास कवी आणि लेखक बरोबर चित्रकार पण जागृत होणारच ना.
  • Log in or register to post comments

परवानगी पत्र

योगप्रभू
गुरुवार, 12/01/2011 - 13:00 नवीन
जावक क्र.११११११/शै. प./परवाना ०३३ प्रति, श्री. विवेक खोत विषय - वर्ग बदलून मिळणेबाबत संदर्भ - आपण शाळा व्यवस्थापनास पाठवलेले पत्र भाग १ व २ स. न.वि.वि. उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते, की आपल्या विनंतीनुसार आपल्याला प्रशिक्षण वर्ग बदलून देण्यात आला आहे. आपण यापुढे हस्तकला वर्गाऐवजी 'प्रत्यक्ष कार्यानुभव' वर्गाला उपस्थिती लावावीत. मात्र प्रत्यक्ष कार्यानुभव वर्गातील प्रशिक्षण सुरू असताना आपणास हस्तकला वर्गातील साधने वापरता येणार नाहीत, अथवा एका वर्गातील साधने दुसर्‍या वर्गात नेता येणार नाहीत, याची नोंद घ्यावी. काही अपवादात्मक स्थितीत, जसे की कार्यानुभव वर्गातील मार्गदर्शक वैयक्तिक कारणाने अनुपस्थित असणे किंवा बाहेरगावी गेले असताना आपणास हस्तकला स्वाध्याय करता येईल. मात्र त्याचा व्यत्यय अन्य विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणार नाही, ही आपली जबाबदारी असेल. केलेले काम इतरांना दाखवता येणार नाही. प्रत्यक्ष कार्यानुभव वर्गाची सुरवात ही प्रथेप्रमाणे समारंभपूर्वक होत असते. अभ्यासक्रमाच्या सुरवातीलाच आपणास शैक्षणिक सहल हा प्रकल्प पूर्ण करावा लागेल. यात सूट मिळणार नाही. त्याचप्रमाणे सहल सुरू होण्यापूर्वी आपणास कोणत्याही स्थितीत मार्गदर्शकांना कार्यपाठ वेळेआधी सुरू करण्याची विनंती करता येणार नाही. प्रशिक्षक/मार्गदर्शकांना तशा सूचना त्यांच्या वरिष्ठांकडून दिलेल्या असतातच. आपण विद्यार्थी असल्याने ही स्वतंत्र सूचना. कार्यानुभव प्रशिक्षणात दुसर्‍या टप्प्यात आपल्याला गृहशास्त्र व बालसंगोपन हा भाग पूर्ण करावा लागेल. त्याचा काळ आणि वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. प्रशिक्षक/मार्गदर्शकांशी बोलून आपण ते ठरवावे. आपल्याला नवीन अभ्यासक्रम व प्रशिक्षण वर्गासाठी हार्दीक व सहर्ष शुभेच्छा. :) आपला सखाराम दादोबा लगटकर (स. दा. लगटकर) मुख्याध्यापक जीवनविद्या प्रशाला
  • Log in or register to post comments

_/\_

मोहनराव
गुरुवार, 12/01/2011 - 13:58 नवीन
=)) =)) फुटलो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

बास्सच !!! सर्वात खंग्री प्रतिसाद

कपिलमुनी
गुरुवार, 12/01/2011 - 14:12 नवीन
धुव्वा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

क ह र !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/01/2011 - 14:55 नवीन
खल्लास खल्लास ! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. बर्‍याच दिवसांनी बेक्कार हसलोय. भोगप्रभू आपल्याकडून पुढील श्रमपरिहाराला तुम्हाला एक बिर्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

__/\__

सोत्रि
गुरुवार, 12/01/2011 - 15:13 नवीन
दंडवत घ्या हो योगप्रभू माझा! :) -('जीवनविद्या प्रशाले'चा माजी विद्यार्थी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

आरारारा! बेक्कार बा जा र!

मेघवेडा
गुरुवार, 12/01/2011 - 15:20 नवीन
आरारारा! बेक्कार बा जा र! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

केलेले काम इतरांना दाखवता

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/01/2011 - 16:50 नवीन
केलेले काम इतरांना दाखवता येणार नाही. :-D आडवं तिडवं पडुन लोळुन उड्या मारत हसणारी स्मायली :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मी बोलले होते न कि हे असले

किचेन
Fri, 12/02/2011 - 15:37 नवीन
मी बोलले होते न कि हे असले लोळत हसणारे चेहरे परा सोडून इतर कोणाकडेच नाहीत. पराकाका आम्हाला पण सांगा ते कसे टंकायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो

तिमा
गुरुवार, 12/01/2011 - 19:58 नवीन
योगप्रभू, लोकं सिक्सर मारतात पण बॉल सापडतो तिथपर्यंतच! आता बॉल हरवल्यावर इतरांनी खेळायचं कसं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

योग प्रभु गुरुजी ( माताय हा

विजुभाऊ
Fri, 12/02/2011 - 14:39 नवीन
योग प्रभु गुरुजी ( माताय हा बहुतेक या शब्दाचाच गुण असावा ) तुमच्या तीव्र इच्छेला मान देवून ऑस्ट्रीया सरकारने ही सोय केलेली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10953342.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तुमच्या विनन्तीला मान देवून

विजुभाऊ
Fri, 12/02/2011 - 14:41 नवीन
तुमच्या विनन्तीला मान देवून ऑस्ट्रीया सरकाराने ही सोय केली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10953342.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

ज ह ब र्‍या

मी-सौरभ
Fri, 12/02/2011 - 17:50 नवीन
खपल्या गेलो आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

(No subject)

दिपक
Sat, 12/03/2011 - 09:43 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल

विजुभाऊ
गुरुवार, 12/01/2011 - 14:42 नवीन
आत्ता कळाले की ईव्ह ने अ‍ॅपल का खाल्ले होते. सालं बाबा अ‍ॅडमच्या जमान्यापासून हे चालत आलय शादीसे पहले जय हनुमान शादी के बाद जय श्रीराम
  • Log in or register to post comments

बाब्बाबा.....

मन१
Wed, 01/04/2012 - 11:22 नवीन
ठा..........र. राम्दास काकांचा "तुंबलेले खोत " काय योगप्रभूंचे पर्वानगी पत्र काय... कहर आहे. मिपा आहे म्हणून हापिस सुसह्य आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा