Skip to main content

जीवन असेच पुढे सरकत असते...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 30/11/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली कोंबड्याने बांग दिली मग चिमण्या पाखरांचा कलकलाट ऐकू आलां सायकलची घंटी वाजली चला पेपर आला. हे रोजचेच असते सकाळ झाली की उठणे भाग पडते चहाचा गंधही झिरपत येत असतो चहा पितापिता पेपर चाळत बसतो संप ,अपघात ,उपोषण ह्यांच्या शिवाय तो काय वाचतो ...? सिनेमाची जाहिरात बघत नाही घरबसल्या सिनेमा बघता येतो कोणताही महागाई तर वाढत असते नको ईतकी खिशाला पडलेले भोक वाढत असते तिळातिळाने.... कालच लोकलच्या डब्यात स्फोट झाला किती मेली अधिकृत ..? किती गेली अनाधिकृत ..? तो जिवंत आलाय ही देवाची कृपा बायको रोज देवापुढे हात जोडून प्रार्थना करते आजकाल देवा सुखरूप येउदे नवर्याला आताशी कोठे सुरवात आहे नुकतेच झाड फुलत आहे स्फोट झाल्यावर २-३ दिवस असेच चालते नवस प्रार्थना मग अलगद विसरले जाते जीवन असेच पुढे सरकत असते ...!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1030
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

खरंच नुसतचं सरकतं आहे जीवन... :(

वास्तववादी कविता. अभिनंदन.

असेच पुढे सरकत असते.. छान . कविवर्य त्यासाठी म्ह्णून गेले- जन पळभर म्हणतील हाय हाय..!