Skip to main content

कविता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/10/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय कोण आहे? सारखी टक टक टक . . . सहन होत नाहीये आता कोण आहे आत? . . . बहुतेक एक कविता अडकली आहे . . गोजीर्‍या शब्दांची, साजीर्‍या उपमांची, खूप काळ लोटला आहे अडकली आहे, तळघरात . . तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा पण सगळं निष्फळ . . . . . एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली . . . बाहेर पडलीय तर छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ . . . डॉक्टर म्हणाले आता ती अन् तिचे नशीब |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१०/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1464
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान अहे कविता !! सोउमित्र यन्च्या हार्ट सर्गरि सरखि भासते !!!

खूप छान - गोजीर्‍या शब्दांची, साजीर्‍या उपमांची, खूप काळ लोटला आहे अडकली आहे, तळघरात .आवडली कविता

माझी कविता थोडी वेगळी आहे .स्तुनामी सारखी न येता सगळे पहारे चुकवून येते. डोळे झाकते . कानात गुणगुणते . क्या करते हो साजना तुम हमसे दूर रहके

मिका.. आता ती अन् तिचे नशीब कवितेचे नशीब अत्यंत उत्तम आहे.. काळजी नसावी.. कारण अतिशय दमदार हेल्दी कविता आहे.