'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे.
http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm
हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे.
'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे?
विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते.
माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शीर्षक
पी व्ही नरसिंहराव हे कसे
हे
अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......
माझ्या वैयक्तिक मते तर विजय
>>पु.ल.देशपांडे यांच्या
साहित्य अकादमी
तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य