✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

द
दिपोटी यांनी
Sat, 10/08/2011 - 03:09  ·  लेख
लेख
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्‍या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे? विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते. माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27084 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी

चेतन सुभाष गुगळे
Sat, 10/08/2011 - 12:46 नवीन
विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी यांनी बरंच एकांगी आणि वादग्रस्त लिहून ठेवलंय. विजय तेंडूलकरांनी तर जे वादग्रस्त लिहीलंय तेही बर्‍यापैकी रटाळ आणि फारसं नावीन्य नसलेलं आहे. कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात. दडपशाही आणि हिंसेचा विरोध करणार्‍या या साहित्यिकाला शेवटी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याची इच्छा व्हावी यातच त्यांचे अपयश ठळकपणे दिसून येते. जयवंत दळवी यांनी गंमतीच्या गोष्टी सारखी पुस्तके लिहीली ज्यात अतिशय असभ्य मजकूर वापरून कथा लिहील्या आहेत. बरे एवढे करूनही त्या रंजक तर नाहीच. या दोन्ही साहित्यिकांनी इतर काही चांगली साहित्यनिर्मीती केली असली तरी वर उल्लेखित बाबींमुळे त्यांना ज्ञानपीठ सारखा मानाचा पुरस्कार देणे इष्ट ठरणार नाहीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. ज्ञानपीठ कुणाला द्यायचे हे ठरविण्याचा ज्यांना अधिकार आहे ते काय तो अंतिम निर्णय घेतीलच म्हणा.
  • Log in or register to post comments

तेंडुलकर, दळवी, ...

दिपोटी
Sat, 10/08/2011 - 16:51 नवीन
विजय तेंडूलकरांनी तर जे वादग्रस्त लिहीलंय तेही बर्‍यापैकी रटाळ आणि फारसं नावीन्य नसलेलं आहे.
तेंडुलकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा आरोप मान्य नसला तरी कळण्यासारखा आहे ... सर्वांची मते सारखी नसल्याने असे वाद निश्चितच उदभवू शकतात पण 'तें'चं साहित्य 'रटाळ व फारसं नावीन्य नसलेलं'?? हा आरोप मात्र मुळातच मजेदार/गमतीशीर व बिनबुडाचा वाटतो. काळाच्या व तत्कालीन साहित्याच्या पुढे असलेल्या 'तें'च्या साहित्यात नावीन्य नाही?!! खरे तर त्यांच्या साहित्यातील नावीन्यच तत्कालीन 'संस्कृतीरक्षकां'च्या पचनी पडले नाही म्हणून तर पुढील वाद निर्माण झाले (जे नंतर कालौघात शमले).
हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात. दडपशाही आणि हिंसेचा विरोध करणार्‍या या साहित्यिकाला शेवटी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याची इच्छा व्हावी यातच त्यांचे अपयश ठळकपणे दिसून येते.
'अर्धसत्य' सारखा वास्तववादी व नितांतसुंदर चित्रपट अपवादानेच निर्माण होतो. यातील हिंसा ही या चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने व ओघाने आली आहे ... हिंसेचा प्रसार व प्रचार करणे (किंवा गर्दी खेचणे) हे लेखकाचे उद्दिष्ट आहे असे यात कोठेही दिसून येत नाही. अर्थात आता फक्त goody-goody चित्रपट पहायची एखाद्याची आवड असेल तर त्याला/तिला हे चित्रपट 'हिंसेचे प्रचारक व कमी प्रभावी वाटतात' हे मग समजण्यासारखे आहे.
जयवंत दळवी यांनी गंमतीच्या गोष्टी सारखी पुस्तके लिहीली ज्यात अतिशय असभ्य मजकूर वापरून कथा लिहील्या आहेत. बरे एवढे करूनही त्या रंजक तर नाहीच.
दळवींच्या सर्वच साहित्यात असभ्य मजकूर असता तर तो एखाद्या विशिष्ट वाचकवर्गाला आकृष्ट करण्यासाठी केलेला स्टंट आहे असे आपण म्हणू शकलो असतो. पण अर्थात असे नाही आहे. 'गंमतीच्या गोष्टी' असे त्यांचे पुस्तक माझ्या तरी ऐकिवात/वाचनात नाही, त्यामुळे या पुस्तकाबद्दल काही बोलू/लिहू शकत नाही. मात्र एक खरे ... साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही. The very first step towards resolving a problem is acknowledging and accepting it (rather than pushing it under the carpet and denying its existence). या तत्वाचा एकदा स्वीकार केला की मग साहित्यातील (आशयाच्या व अभिव्यक्तीच्या अनुषंगाने आलेली) हिंसा, शिवराळपणा, इत्यादि असभ्य वा आक्षेपार्ह न वाटता तो साहित्यानुभव सकस बनवण्यास त्याचा हातभारच लागतो - नपेक्षा बाळबोध साहित्य वाचनापलीकडे आपली मजल पोचणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अर्धसत्य चित्रपट मी फ्रेम टू

चेतन सुभाष गुगळे
Sat, 10/08/2011 - 17:55 नवीन
अर्धसत्य चित्रपट मी फ्रेम टू फ्रेम पाहिलाय. ज्या मूळ सूर्य ह्या कथेवर तो बेतलाय ती देखील माझ्यापाशी आहे. चित्रपटात ह्या कथेचा व्यवस्थित विचका केला गेलाय. कमला हा चित्रपटही मी पाहिलाय. ऑनलाईन उपलब्ध असल्याने आपणही पाहू शकाल. रटाळ आणि प्रचारकी ही विशेषणे हा चित्रपट अगदी सार्थ ठरवितो. मला वाटतं आपण मुद्दा समजुन घेण्यात काहीतरी गल्लत केलीय. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या हिंसेविषयी माझा आक्षेप नाहीये. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते जे काही जाहिर रीत्या वादग्रस्त विधानं करीत होते त्यावर आहे. त्यांनी असं म्हंटलं की मला कुणीतरी एक पिस्तूल आणून दिलं तर मी नरेंद्र मोदींना संपवेन; त्याचप्रमाणे अजुन एका साहित्यिकाला त्यांनी मनोहर जोशींच्या हस्ते पुरस्कार घेऊ नका असा जाहीर सल्ला दिला (जो अर्थातच त्या सन्माननीय साहित्यिकांनी जुमानला नाही). बाकी त्यांना जसं लिहायचं तसं ते लिहीणारच... फक्त तुमच्या लेखात तुम्ही पुरस्कार देण्याविषयीचं मत मागितलंत आणि एक वाचक म्हणून मी ते नोंदविलं. माझं मत इतर कुणाला पटलंच पाहिजे असा माझा तेंडुलकरी दुराग्रह नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

'अर्धसत्य'

दिपोटी
Sat, 10/08/2011 - 18:17 नवीन
मला वाटतं आपण 'अर्धसत्य' हा चित्रपट समजून घेण्यात काहीतरी गल्लत केली आहे. तेंडुलकरांनीच नमूद केल्याप्रमाणे या चित्रपटाच्या पटकथेचा फक्त एक छोटासा भाग श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर बेतला गेला आहे, कथानकाचा उरलेला व बराचसा भाग तेंडुलकरांची निर्मिती आहे. तेव्हा 'या चित्रपटात या कथेचा विचका केला गेला आहे' हे विधान थोडे अतिशयोक्तीपूर्ण व खोडसाळ वाटते. 'अर्धसत्य' सारख्या सुंदर चित्रपटाला रटाळ म्हणता तेव्हाच आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडत असतील व रंजक वाटत असतील याची थोडीफार कल्पना येते. अर्थात येथे 'एकेकाची आवड' असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

<< तेंडुलकरांनीच नमूद

चेतन सुभाष गुगळे
Sat, 10/08/2011 - 18:40 नवीन
<< तेंडुलकरांनीच नमूद केल्याप्रमाणे या चित्रपटाच्या पटकथेचा फक्त एक छोटासा भाग श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर बेतला गेला आहे, कथानकाचा उरलेला व बराचसा भाग तेंडुलकरांची निर्मिती आहे. >> हे वेल्डींग च चूकले आहे अस माझे स्पष्ट मत आहे. << तेव्हा 'या चित्रपटात या कथेचा विचका केला गेला आहे' हे विधान थोडे अतिशयोक्तीपूर्ण व खोडसाळ वाटते. 'अर्धसत्य' सारख्या सुंदर चित्रपटाला रटाळ म्हणता तेव्हाच आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडत असतील व रंजक वाटत असतील याची थोडीफार कल्पना येते. अर्थात येथे 'एकेकाची आवड' असे म्हणावे लागेल. >> मत मागितले असता प्रांजळ मत द्यायला हवे. त्यात खोडसाळ असे काहीही नाही. उलट मोठ्या आशेने व बर्‍याच अपेक्षा ठेवून मी मोठ्या कष्टाने तो चित्रपट मिळवला होता. असो. याच न्यायाने वर ठळक केलेले आपले वाक्यही खोडसाळ म्हणावे लागेल. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही असे म्हणणे हा खोडसाळपणा ठरत नाही. नाहीतर आपल्याला फक्त आपण सूचविलेल्या लेखकांच्या बाजुनेच प्रतिसाद अपेक्षित होते अशी शंका वाटून जाते. असो आपला ह्या http://www.youtube.com/watch?v=r6AJ8gAzejA&feature=watch-now-button&wide=1 चित्रपटाबाबतचा अभिप्राय जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

कृपया भरकटू नका ...

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 06:18 नवीन
आपले मत (कसेही असले तरी) येथे मांडण्याचा आपला अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - तशी अपेक्षाही अजिबात नाही. मात्र आपल्या त्या मताचे समर्थन करण्याची अपेक्षा इतरांनी ठेवण्यात काहीही गैर नाही हे आपल्यालाही मान्य असावे - नाहीतर पुढील चर्चेचा मार्गच खुंटतो. प्रवाहाविरुध्द जाण्यात काहीही गैर नाही (खरे तर काही बाबतीत ते आवश्यकही ठरते), मात्र एखाद्या सर्वमान्य सुंदर चित्रपटाला 'रटाळ' व 'प्रचारकी'सारखी शेलकी विशेषणे सरसकट बहाल करताना त्या विशेषणांमागील कारणांचा खुलासा केला नाही तर जाणूनबुजून वा खोडसाळपणे प्रवाहाविरुध्द (जायचे आहे म्हणूनच) जाण्यात आपल्याला स्वारस्य आहे की काय अशी शंका मनाला चाटून जाते. 'कमला' हिंदी चित्रपट मी पाहिलेला नाही (मात्र मराठी नाटक पाहिले आहे). मात्र त्या चित्रपटाचा या धाग्याशी काय संबंध? वर धाग्यात 'ज्ञानपीठ' पुरस्कारासाठी माझ्या वैयक्तिक मते जे विजय तेंडुलकर पात्र आहेत, ते या चित्रपटाचे पटकथाकार आहेत तरीही या चित्रपटाचा या धाग्याच्या मूळ विषयाशी सरळसरळ संबंध नाही आहे. आपल्या मते तेंडुलकरांच्याऐवजी इतर कोणी पुरस्कारासाठी पात्र अवश्य असू शकते - खरा मुद्दा तो नाही आहे. धाग्याचा खरा मुद्दा आहे जर 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भाषांतील साहित्यापेक्षा जास्त सरस आहे' हे गृहितक (assumption) वा जनमानसातील विचार खरा मानला तर त्याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत का दिसत नाही? असे प्रतिबिंब दिसत नाही याचे कारण या दोहोंपैकी कोणते : (अ) मूळात हे गृहितक वा जनमानसातील विचार चुकीचा आहे किंवा (ब) गृहितक खरे आहे पण 'पडद्यामागील हालचालीं'मुळे वस्तुस्थिती व पुरस्कार-विजेत्यांची यादी मध्ये तफावत आहे ? असो. मला वाटते चर्चा येथे मूळ धाग्यापासून दूर भरकटत आहे.थोडेफार अवांतर होऊ-चालू शकते मात्र धाग्याच्या मूळ विषयावर मत द्यावे अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

अजिबात भरकटत नाहीये.. हा

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/09/2011 - 10:33 नवीन
अजिबात भरकटत नाहीये.. हा तुमचा मूळ प्रश्न << माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?>> त्याला हे माझे उत्तर. माझ्या मते पर्यायांमध्ये सूचविलेल्या नावांपैकी विजय तेंडूलकर आणि जयवंत दळवी ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र नाहीत / नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

मला तुमच्या ज्ञानाबद्द्ल कायम

शिल्पा ब
Sun, 10/09/2011 - 10:57 नवीन
मला तुमच्या ज्ञानाबद्द्ल कायम आदरच वाटत आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

आभारी आहे.

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/09/2011 - 11:00 नवीन
<< मला तुमच्या ज्ञानाबद्द्ल कायम आदरच वाटत आलेला आहे. >> आज हे व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मूळ मुद्याबाबतीत आपले काय मत आहे?

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 15:37 नवीन
चेतन सुभाष गुगळे, पुरस्काराला कोण पात्र वाटते यावर दहा जणांना विचारले असता अकरा मते मिळू शकतील ... प्रत्येकाचे वाचन व प्रत्येकाचा व्यासंग निराळा असतो. मला पात्र वाटणारे साहित्यिक इतरांना वाटतील असे जरुरी नाही. तेव्हा 'कोण पात्र आहे' हा मुद्दा या धाग्यासाठी (पूर्ण गौण नसला तरी) तसा दुय्यम आहे. एकतर 'इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याच्या दर्ज्याबद्दल सर्वसामान्य मराठी समाजात जो समज आहे, तो समज सर्वथा वृथा/खोटा तरी आहे' किंवा ''ज्ञानपीठ' पुरस्काराच्या निवडप्रक्रियेत lobbying सारख्या बाबींमुळे घोळ तरी आहे' अशा दोन शक्यता असताना यातील कोणती शक्यता खरी आहे यावर चर्चा व्हावी यासाठी हा धागा टाकला होता. (धाग्यातील 'आपले मत काय आहे?' हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी होता ... फक्त शेवटच्या वाक्यासाठी नाही). असे असताना या मूळ मुद्द्याला संपूर्ण बगल-कलाटणी देऊन फक्त शाब्दिक कीस पाडण्यात काय हशील? मूळ मुद्याबाबतीत (उदाहरणार्थ lobbying असावे वा नसावे) आपले मत ऐकण्यास उत्सुक आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

पुन्हा एकदा माझे मत विस्ताराने मांडतो.

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/09/2011 - 18:12 नवीन
<< एकतर 'इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्याच्या दर्ज्याबद्दल सर्वसामान्य मराठी समाजात जो समज आहे, तो समज सर्वथा वृथा/खोटा तरी आहे' >> असा समज करून घेणे मला तरी इष्ट वाटत नाही. << (धाग्यातील 'आपले मत काय आहे?' हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी होता ... फक्त शेवटच्या वाक्यासाठी नाही). असे असताना या मूळ मुद्द्याला संपूर्ण बगल-कलाटणी देऊन फक्त शाब्दिक कीस पाडण्यात काय हशील?>> पण तो देखील आपल्या संपूर्ण लेखातलाच एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचे मी उत्तर दिले. खरे तर माझ्या त्या उत्तरामुळे तुमच्या << मूळ मुद्याबाबतीत (उदाहरणार्थ lobbying असावे वा नसावे) आपले मत ऐकण्यास उत्सुक आहे. >> या मूळ प्रश्नाचे उत्तर देखील सोदाहरण आपोआपच मिळून जाते. हवे तर मी अधिक विस्ताराने इथे मांडतो. पुरस्कार एक आणि निर्णय घेणाराही एक असेल तर प्रश्नच उद्भवत नाही. पुरस्कार एक आणि निर्णय घेणारे एकाहून जास्त असतील तर मग पुरस्कार कुणाला द्यावा याचे एकाहून अधिक पर्याय संभवतात. अर्थातच एकाला पुरस्कार मिळणार असल्याने पर्यायातील नावांचे समर्थन / विरोध ही प्रक्रिया सुरू होते. या समर्थन / विरोधाच्या प्रक्रियेलाच आपण लॉबींग अस म्हणणार का? आता हे समर्थन / विरोध अपरिहार्य च असतात कारण त्यानंतरच पर्यायांमधील इतर नावे वगळली जाऊन एका अंतिम नावावर शिक्कामोर्तब होते. प्रश्न इतकाच आहे की हे समर्थन / विरोध कशाच्या आधारे केले जाते? जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषिकता, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन या निकषावर केल्या जाणार्‍या समर्थन / विरोधाचा निषेधच करायला हवा. पण यापलिकडे जाऊन कोणी एखाद्या विशिष्ट कारणास्तव एखाद्या पर्यायाचे समर्थन / विरोध करीत असेल तर त्याविषयी आक्षेप घेतला जाऊ नये. उदाहरणार्थ एका पुरस्कार प्रसंगी उंबरठा हा मराठी चित्रपट (हिंदी रुपांतर - सुबह) समिती तील सदस्यांच्या समोर आला असता ज्येष्ठ माननीय सदस्य श्री. बलदेव राज चोप्रा यांनी या चित्रपटास कडाडून विरोध केला. कारण या चित्रपटात नायिका आपल्या पतीला सोडून देते असे दाखविले होते. चोप्रांनी त्यांच्या कारकीर्दीत या विषयावर जेवढे चित्रपट बनविले त्या प्रत्येकात त्यांनी नायिकेला पतीबरोबर नांदतानाच (प्रेम असो वा नसो) दाखविले होते. त्यांची या विषयावर काही ठाम मते होती. त्यामुळे त्यांनी उंबरठा बाबत नोंदविलेला आक्षेप हा त्यांच्या आयुष्यभरातील भूमिकेशी सुसंगत असाच होता. त्याच समितीत श्री. गिरीश कर्नाड देखील होते. त्यांनी मात्र या चित्रपटाचे जोरदार समर्थने केले जे त्यांच्या खुल्या विचारसरणीशी सुसंगत होते. शेवटी उंबरठाला पुरस्कार देण्याविषयी निर्णय झाला. परंतू चोप्रांच्या विरोधावर किंवा कर्नाडांच्या समर्थनावर कोणीही biased असल्याचा आक्षेप नोंदविला नाही (जरी स्वत: कर्नाड यांनी उंबरठा चित्रपटात काम केले होते तरीही) कारण हे दोघेही जे काही समर्थन अथवा विरोध करीत आहेत ते तात्विक कारणाने हे सर्वांनाच पटले होते. आता इथेही आपण तेंडूलकर आणि दळवी या नावांचे समर्थन करीत आहात त्यामागे आपल्याला त्यांच्या कलाकृती तील विचार पटले, त्यातून आनंद मिळाला हीच कारणे असणार असे मी गृहीत धरतो. त्याचप्रमाणे मी त्यांच्या नावाला विरोध करतोय कारण त्यांच्या साहित्यकृती मला तितक्याशा मानवल्या नाहीत. वर उल्लेखिलेले घातक निकष (जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषिकता, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन) न लावता आपण दोघेही या लेखकांचे समर्थन / विरोध केवळ एक चोखंदळ रसिक ह्या भूमिकेतून करीत आहोत हे लक्षात घेता अशा प्रकाराला निकोप लॉबींग समजण्यास काहिच हरकत नाही. असे लॉबींग होत असेल तर त्यास नावे ठेवणे योग्य नव्हे. परंतू लॉबींग घातक निकषांवर होत असेल (तसे होतेय की नाही हे ठाऊक नाही) तर त्याचा जरूर निषेध व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

लॉबिंग

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 14:58 नवीन
खाली 'चिरोटा' यांच्या एका प्रतिसादाला 'लॉबिंग' या शीर्षकाखाली मी एक प्रतिसाद दिला आहे, तो आपल्या या वरील प्रतिसादाला पण लागू आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

चेतन सुभाष गुगळे

नगरीनिरंजन
Sun, 10/09/2011 - 14:59 नवीन
आपली मते नेहमीच क्रांतिकारी आणि गैरसमजुतींच्या उच्चभ्रू तुमानी खेचणारी असतात हे मी पाहिलंच आहे. पण ती तशी का आहेत हे प्रत्येकाला कळेलच असे नाही, म्हणून जरा खुलासेवार सांगाल का?
कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात
या चित्रपटांमध्ये कसला प्रचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. अर्धसत्य पाहून मी प्रभावित झालो होतोच शिवाय सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल ही नाटके आणि मित्रा, बेडूक, थोटूक, बॅकसीट इत्यादी कथा वाचून आणि त्यात तेंडुलकरांनी त्या काळात (आणि अजूनही) अब्रह्मण्यम अशा समजल्या जाणार्‍या विषयांवर किती मार्मिक आणि संवेदनशीलतेने लिहीलं आहे हे पाहून थक्क झालो. त्यांच्या लेखनात हिंसा असे कारण स्वतःच्या सभोवती असलेली हिंसा त्यांनी टिपली. पण त्यांनी कधीही त्या हिंसेच्या विरोधात प्रचार केला असे वाटत नाही. उलट निष्पक्षपातीपणे ती टिपल्यानेच त्यांच्या लेखनाला एक सर्वकालिक संदर्भ मिळाला. जयवंत दळवींच्याही प्रत्येक कलाकृतीत असभ्य भाषा नाही आहे. त्यांची स्पर्श ही कथा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. (त्यात कोणाला कुष्ठरोगाविरुद्धचा प्रचार दिसू शकतो.) त्यांच्या चक्र कादंबरीत तुम्ही म्हणता तशी असभ्य भाषा आहे पण ती नसती तर ती पात्रं झोपडपट्टीतली न वाटता तुमच्या दिवाणखान्यात बसून बोलताहेत असं वाटलं नसतं का? बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही. शिवाय त्यांच्या विनोदी कथाही चांगल्या आहेत. ठणठणपाळ हे त्यांचं रुप तर खूपच गाजलं. अशी माझी सध्याची मते आहेत. ती तुमचा खुलासा ऐकून कदाचित बदलता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

+१

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 16:10 नवीन
नगरीनिरंजन,
बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही.
अगदी बरोबर ... हाच मुद्दा मी वर मांडला आहे की 'साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही.' परत दळवींच्या सर्वच साहित्यात असा अनाचार बोकाळलेला दिसला असता तर 'एक प्रतिभावान साहित्यिक' म्हणून त्यांच्या प्रतिमेविषयी फेरविचार झाला असता. पण 'बॅरिस्टर' व 'पुरूष' सारखी उत्तम नाटके लिहिणार्‍या लेखणीतूनच 'संध्याछाया' वा 'नातीगोती' सारख्या हृदयस्पर्शी कलाकृती देखील उतरल्या. 'सारे प्रवासी घडीचे' सारखी कोकणच्या पार्श्वभूमीवरील एक अत्युत्तम कादंबरी सुध्दा या लेखणीनेच प्रसवली. आपण लिहिल्याप्रमाणे 'ठणठणपाळ' हे त्यांचे सदर गाजले ते समकालीन साहित्यिकांवर-प्रकाशकांवर ताशेरे ओढूनही त्यातील निखळ, निर्विष व निर्भेळ विनोदामुळे. विनोदाचा हा अनोखा साहित्यप्रकारच त्यांनी जन्माला घातला. -दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सविस्तर खुलासा

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/09/2011 - 21:25 नवीन
<< आपली मते नेहमीच क्रांतिकारी आणि गैरसमजुतींच्या उच्चभ्रू तुमानी खेचणारी असतात हे मी पाहिलंच आहे. >> हे वाक्य फारच स्फोटक आहे, पण तरीही यात तथ्यांश असल्याचं मान्य करतो. यात माझ्या कौतुकाचा भाग असेल तर (आणि नसेल तरीही) त्याचा विनम्र स्वीकार करतो. << पण ती तशी का आहेत हे प्रत्येकाला कळेलच असे नाही, म्हणून जरा खुलासेवार सांगाल का? कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांमध्ये कसला प्रचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. >> अर्धसत्य आपण पाहिलाच आहे. केव्हा पाहिलाय? मी तो पाहून जेमतेम वर्षच झालंय त्यामुळे फ्रेम टू फ्रेम लक्षात आहे. त्यात पोलिस अधिकारी असलेल्या नायकावरील ताणाचं जे समर्थन केलंय ते अगदीच न पटणारं आहे. यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. नायकाला जो काही त्रास होतो तो त्याच्या स्वत:च्या चूकांमुळेच हे स्पष्ट दिसते. तरीही त्याचा दोष शेट्टीच्या किंवा इतरांच्या माथी मारणे ही नायकाची पळवाट आहे. मुख्य म्हणजे मूळ सूर्य कथेत बाप आणि मुलगा यातला संघर्ष आहे. बाप मुलाला त्याच्या इच्छे विरुद्ध आपल्या कल्पनेनुसार घडवितो हा विषय आहे. अर्धसत्य मध्येही तो मांडलाय. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं? (मुख्य म्हणजे त्याशिवाय इतर अनेक पर्याय खुले असताना) चांगली कथा, चांगले अभिनेते असूनही ठिसूळ पटकथे मुळे रसभंग झाला. कमला चित्रपटाचा दुवा मी दिला आहेच. तो आपण स्वत:च पाहावा, कदाचित आपली तेंडूलकरांविषयीची मते बदलुही शकतील. << त्यांच्या लेखनात हिंसा असे कारण स्वतःच्या सभोवती असलेली हिंसा त्यांनी टिपली. पण त्यांनी कधीही त्या हिंसेच्या विरोधात प्रचार केला असे वाटत नाही. उलट निष्पक्षपातीपणे ती टिपल्यानेच त्यांच्या लेखनाला एक सर्वकालिक संदर्भ मिळाला. >> त्यांच्या नाटकांचे खेळ बंद पाडले गेले तेव्हा त्यांनी या दडपशाहीचा / हिंसेचा विरोध केला होता. त्यानंतर दोन दशकांनी मात्र त्यांनीच मला कुणीतरी पिस्तुल आणुन दिले तर मी मोदींची हत्या करील असे विधान केले. त्याचप्रमाणे एका मान्यवर साहित्यिकाने मनोहर जोशींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारू नये असा जाहीर सल्ला त्यांनी दिला होता. आयुष्यात आधी हिंसेला विरोध व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन व नंतर त्यांच्या अगदी उलट वर्तन मला त्यांच्या जीवनातला हा विरोधाभास दाखवून द्यायचा होता. शिवाय तेंडूलकरांनी अजुन एक विचित्र प्रकार केला. साहित्यनिर्मितीतून त्यांनी वैयक्तिक हिशेब चुकते केले. काही वर्षांपूर्वी त्यांचे लोकसत्ता मध्ये रामप्रहर या सदरात लिखाण येत असे. मीही ते रोज आवडीने वाचत असे. नंतर मात्र त्यांनी आपल्या वैयक्तिक वैर्‍यांना या सदरातून टिपणे सुरू केले. यामूळे अनेक वाचक वैतागले. एकाने तर राम प्रहर चे नाव बदलून आता त्यास विजय प्रहार हे नाव द्या असेही सूचविले. नंतर हे सदर बंद झाले. पुढे काही कालावधीनंतर या सर्व लेखांचे संकलन करून राम प्रहर हे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. अशा काही कारणांमूळे माझा तेंडूलकरांच्या नावाला आक्षेप आहे. तुम्ही दळवींविषयी व्यक्त केलेली मते ही ठीकच आहेत. परंतू त्यांनी गंमतीच्या गोष्टी सारखे बाजारू लिखाण करून ठेवले. त्याचप्रमाणे ***** वगैरेसारख्या उपमा वापरण्याचा प्रकार मला तरी अतिशय अश्लाघ्य वाटतो. अशा साहित्यिकाने इतर कितीही चांगली साहित्यनिर्मिती केली तरी त्यास साहित्य पुरस्कारातून वगळावे असे माझे वैयक्तिक मत आहे. << अशी माझी सध्याची मते आहेत. ती तुमचा खुलासा ऐकून कदाचित बदलता येतील. >> माझ्या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. ***** इथले शब्द हे जयवंत दळवी यांनी आपल्या पुस्तकात वापरलेले होते. परंतू इथे प्रकाशित करण्याएवढे उचित नसल्याने संपादकांच्या सूचनेवरून काढून टाकण्यात आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

साशंक आहे

नगरीनिरंजन
Mon, 10/10/2011 - 08:27 नवीन
यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. नायकाला जो काही त्रास होतो तो त्याच्या स्वत:च्या चूकांमुळेच हे स्पष्ट दिसते. तरीही त्याचा दोष शेट्टीच्या किंवा इतरांच्या माथी मारणे ही नायकाची पळवाट आहे. मुख्य म्हणजे मूळ सूर्य कथेत बाप आणि मुलगा यातला संघर्ष आहे. बाप मुलाला त्याच्या इच्छे विरुद्ध आपल्या कल्पनेनुसार घडवितो हा विषय आहे. अर्धसत्य मध्येही तो मांडलाय. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं?
एखाद्या कथेतले पात्र आपल्या नेहमीच्या आयुष्यात माणसं जशी वागतात तसे का नाही वागले वगैरे विचारणे मलातरी पूर्णपणे गैरलागू वाटते. हे म्हणजे पंचतंत्र वाचताना 'सिंह कधी बोलतो का?' असं विचारल्या सारखंच आहे. शिवाय शेट्टीचा निगरगट्टपणा कोणाला सहज स्वीकारार्ह वाटेल आणि कोणाला तो अत्यंत त्रासदायक वाटेल. तुमच्या मतानुसार जे तार्किक वागणे आहे तसे नायक न वागणे म्हणजे तो लेखकाने केलेला प्रचार ठरू शकत नाही. अशा घटना खर्‍या आयुष्यातही घडतात आणि जे त्या घटनेचा भाग नसतात ते 'असं कोणी कसं वागू शकतं?' असं आश्चर्य व्यक्त करतात.
त्यांच्या नाटकांचे खेळ बंद पाडले गेले तेव्हा त्यांनी या दडपशाहीचा / हिंसेचा विरोध केला होता. त्यानंतर दोन दशकांनी मात्र त्यांनीच मला कुणीतरी पिस्तुल आणुन दिले तर मी मोदींची हत्या करील असे विधान केले.
यात मला कुठेही विरोधाभास दिसत नाही. दिसली तर त्यांची वाढत गेलेली उद्विग्नताच दिसते. त्यांच्या नाटकाचे खेळ बंद पाडले म्हणून त्यांनी दडपशाहीचा/हिंसेचा विरोध केला असेल पण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते असा त्यावरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. किंबहुना ते तत्त्ववेत्ते असल्याचा आणि काही तत्त्वे अंगिकारल्याचा त्यांनी कधी कुठला दावाही केला नव्हता मग दडपशाहीविरुद्ध आणि हिंसेविरुद्ध झालेल्या त्यांच्या मनुष्यसहज उद्रेकाला दुटप्पीपणा ठरवणे हा त्यांच्यावर अन्याय होईल असे वाटते. रामप्रहर मी वाचलेले नसल्याने तुमचे मत मी ग्राह्य धरतो.
परंतू त्यांनी गंमतीच्या गोष्टी सारखे बाजारू लिखाण करून ठेवले. त्याचप्रमाणे ***** वगैरेसारख्या उपमा वापरण्याचा प्रकार मला तरी अतिशय अश्लाघ्य वाटतो.
तुम्ही कोणत्या उपमेबद्दल लिहीलंय ते मला कळलं नाही आणि गमतीच्या गोष्टी मी वाचलेल्या नाहीत पण बाजारू या शब्दावरून त्यात अश्लील किंवा चावट असं काही असावं असं वाटतंय. ज्ञानपीठसाठी ठराविक प्रकारचेच लेखन केलेले असणे ही अट असेल तर हा मुद्दा योग्य आहे. अन्यथा अश्लीलता, बीभत्सता आणि क्रौर्य हे ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असल्याने त्यावर थेट आणि खुलेपणाने लिहीण्यात वावगे नाही. एकंदरीतच माझ्या शंका अजून फिट्ल्या नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे साधारणपणे त्या लेखकांचे चारित्र्य, तत्त्वभूमिका किंवा लेखनविषयांची निवड या बाबतीत आहेत. लेखनाच्या वैपुल्यावर आणि दर्जावर तुम्ही काही सांगू शकाल काय? ज्ञानपीठ पुरस्कार (माझ्या मते) चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसून तो साहित्यातील कर्तृत्वासाठी आहे असे मला वाटते. त्यासाठी लेखक कधी काय बोलला, कोणाशी भांडला वगैरे गोष्टी मध्ये येऊ नयेत असे वाटते. लेखनाच्या दर्जाविषयी बोलल्यास आणि इतर मराठी वा अमराठी लेखक का श्रेष्ठ आहेत यावर आपण प्रकाश टाकलात तर ते धागाप्रवर्तकाच्या मूळ मुद्यालाही धरून होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुमच्या सर्वच शंकांचे निराकरण मी करू शकत नाही.

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 15:07 नवीन
<< लेखनाच्या दर्जाविषयी बोलल्यास आणि इतर मराठी वा अमराठी लेखक का श्रेष्ठ आहेत यावर आपण प्रकाश टाकलात तर ते धागाप्रवर्तकाच्या मूळ मुद्यालाही धरून होईल. >> याविषयी डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे. त्याचप्रमाणे वर एका प्रतिसादात मी समर्थन / विरोधा विषयी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ती पुरेशी आहे. << एकंदरीतच माझ्या शंका अजून फिट्ल्या नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे साधारणपणे त्या लेखकांचे चारित्र्य, तत्त्वभूमिका किंवा लेखनविषयांची निवड या बाबतीत आहेत. लेखनाच्या वैपुल्यावर आणि दर्जावर तुम्ही काही सांगू शकाल काय? ज्ञानपीठ पुरस्कार (माझ्या मते) चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसून तो साहित्यातील कर्तृत्वासाठी आहे असे मला वाटते. त्यासाठी लेखक कधी काय बोलला, कोणाशी भांडला वगैरे गोष्टी मध्ये येऊ नयेत असे वाटते. >> कुठलाच पुरस्कार चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसतो. परंतू या बाबत माझी भूमिका अशी आहे की कुठल्याही पुरस्कारासाठी सूचविली जाणारी व्यक्ती चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकाच्या निकषावरही वादातीत असलीच पाहिजे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. कुणावर ते लादण्याची लादेन प्रवृत्ती माझ्यात नाही, परंतू याबाबत माझ्या भूमिकेत फरक पडण्याची सूतराम शक्यता नाही. तेव्हा वाद निरर्थक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद

नगरीनिरंजन
Mon, 10/10/2011 - 15:21 नवीन
माझाही 'कलात्मक म्हणजे नेमके कसे आणि प्रचारकी म्हणजे नेमके कसे' असा मुळातच गोंधळ उडाला असल्याने बाकीच्या शंका तुर्तास सोडून देतो. सगळी मते वैयक्तिक असल्याने वाद असा नव्हताच हे फक्त नम्रपणे नमूद करतो. जाता जाता, बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मराठीच्या बाहेरचे भारतीय लेखन फारसे वाचलेले नसल्याने फक्त लॉबिंग वगैरे मुद्यांवर चर्चा झाली/होतेय. या धाग्यावर तुलनात्मक काही चर्चा झाली तर आनंद वाटेल. जाणकारांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ताणतणाव आणि वैफल्यग्रस्त अवस्था....

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 13:32 नवीन
यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. कुठल्याच ताणतणावाचे हिंसेत झालेले रुपांतर समर्थनिय नाही असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण उपासमारीने मरायला टेकलेल्या माणसाने केलेली खाद्यपदार्थाची चोरी आणि वैफल्यग्रस्त माणसाच्या हातून घडलेले असे एखादे कृत्य, कायद्याच्या चौकटीत गुन्हाच असला आणि नैतिकतेच्या पातळीवर समर्थनिय नसला तरी, क्षम्य आहे. कायद्यातही कुठल्या मानसिक अवस्थेत हिंसा घडली ह्यावर विचार करून शिक्षा कडक किंवा सौम्य ठरवली जाते. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. ह्याला कारण नायक हा पोलीस अधिकारी आहे आणि आपण सामान्य नागरिक. पोलीस अधिकार्‍याची जबाबदारी गुन्हेगारांना अटक करून शासन करणे. ती जबाबदारी सामान्य नागरिकाची नसते. पोलीस अधिकार्‍याकडून, प्रशिक्षणा दरम्यान, तशी शपथही घेतली जाते. जेव्हा, एखादा अधिकारी त्या शपथेला आणि आपल्या कर्तव्याला स्मरून गुन्हेगारांना अटक करतो आणि राजकारणी त्या गुन्हेगाराला सोडवितात तेंव्हा तो अधिकारी वैफल्यग्रस्त होतो. शेट्टीने वैयक्तिक काही त्रास नायकाला दिलेला नसला तरी गुन्हेगारांचा सामान्य नागरिकांना, समाजाला, सहनशक्तीच्या पलिकडे, त्रास होत असतो. आणि जेंव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी आपले कर्तव्य बजावण्याच्या भावनेतून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याला त्या गुन्हेगारांचा सामान्य जनतेपेक्षा जास्त त्रास होतो. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं? पोलीस होण्यामागिल अनिच्छेचे कारण नायकाच्या बालमनावर झालेला परिणाम आहे. त्याचे वडील (अमिरिश पुरी) पोलीसात असतात आणि ते स्वतःच्या पत्नीला म्हणजेच नायकाच्या आईला मारहाण करीत असतात. त्यामुळे पोलीसांबद्दल त्याच्या मनात एक तिडिक निर्माण झालेली असते. पण जेंव्हा तो पोलीस दलात भरती होतो तेंव्हा एक आदर्श अधिकारी बनू पाहतो. आपले कर्तव्य नीट पार पाडू इच्छितो पण भ्रष्ट राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे तो गुन्हेगारांना चाप लावू शकत नाही ह्याने इतर अनेक पोलीस अधिकार्‍यांप्रमाणे त्याच्या मनात वैफल्य भावना निर्माण होते. ह्याही पुढे, जखमेवर मीठ चोळावे त्या प्रमाणे तोच गुन्हेगार, रामा शेट्टी, निवडणूक लढवून जिंकतो आणि त्याच गुन्हेगाराच्या विजय मिरवणूकीत नायकासारख्या कर्तव्यकठोर अधिकार्‍याला, बंदोबस्तासाठी जावे लागते. हा त्याच्या भावनांचा कडेलोट असतो. आणि त्यामुळेच, ह्या किड लागलेल्या व्यवस्थेवर इतर कुठलाही उपाय नाही ह्या विचारातून त्याच्या हातून कायदा हाती घेतला जातो. तुम्ही चित्रपट पाहिलात पण तुम्हाला तो नीट समजला नसावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

सोपी कथा मला समजत नाही काय?

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 15:40 नवीन
<< तुम्ही चित्रपट पाहिलात पण तुम्हाला तो नीट समजला नसावा असे वाटते. >> मला जर एखाद्या चित्रपटात मांडलेला विचार पटला नाही तर मला तो चित्रपट समजलाच नाही असे आपणांस वाटणे हा अतिशय एकांगी विचार झाला. याच पद्धतीने मीही विचार करू लागलो तर आपणांस माझे विवेचन समजलेच नाही अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देऊ शकतो, पण अर्थातच ती माझी विचारपद्धती नव्हे. सर्वप्रथम आपण कष्ट घेऊन मला चित्रपट (अतिशय बाळबोध पद्धतीने) समजावल्याबद्दल धन्यवाद. << पण जेंव्हा तो पोलीस दलात भरती होतो तेंव्हा एक आदर्श अधिकारी बनू पाहतो. आपले कर्तव्य नीट पार पाडू इच्छितो पण भ्रष्ट राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे तो गुन्हेगारांना चाप लावू शकत नाही ह्याने इतर अनेक पोलीस अधिकार्‍यांप्रमाणे त्याच्या मनात वैफल्य भावना निर्माण होते. ह्याही पुढे, जखमेवर मीठ चोळावे त्या प्रमाणे तोच गुन्हेगार, रामा शेट्टी, निवडणूक लढवून जिंकतो आणि त्याच गुन्हेगाराच्या विजय मिरवणूकीत नायकासारख्या कर्तव्यकठोर अधिकार्‍याला, बंदोबस्तासाठी जावे लागते. हा त्याच्या भावनांचा कडेलोट असतो. आणि त्यामुळेच, ह्या किड लागलेल्या व्यवस्थेवर इतर कुठलाही उपाय नाही ह्या विचारातून त्याच्या हातून कायदा हाती घेतला जातो.>> ह्यात नायकाने घेतलेली भूमिका अतिशय स्वप्नाळू, हळवी व भावनिक आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे सार्वजनिक व व्यावसायिक जीवनात सर्वांनाच याहूनही अधिक अपमान व अन्यायास सामोरे जावे लागते. हे असे घडणार याची मानसिक तयारी पोलीस अधिकार्‍याला सुरूवातीपासूनच करायला हवी. नायक ह्यात कमी पडतो. आपण अन्याय आणि अन्यायी व्यक्तींना कुठल्याही अडथळ्याविना संपवू शकू असा भोळा भाबडा आशावाद स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात ठीक होता परंतू ८० च्या दशकातल्या नायकाने असा विचार करणे म्हणजे त्याच्या मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. या वैफल्यते वर उतारा म्हणून त्याने शस्त्र उचलले ते पण त्याच्या नोकरी मुळे त्याच्या हाती आलेलेच ना? सामान्य माणसा कडे तर शस्त्र देखील नसते. त्याने काय करावे? या प्रश्नाचे उत्तर तेंडूलकरांच्या लेखणीकडे नाही (म्हणूनच त्यांना मोदी विरूद्ध पिस्तूल मागण्याची गरज पडली असावी). अर्धसत्य १९८३ चा तर त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९८५ ला आलेला जवाब यांची सहज एक तूलना करतो. जवाब मध्ये नायक (राज बब्बर) ला खलनायक (डॅनी) असाच त्रस्त करतो. शिवाय यात नायक एक सर्वसामान्य नागरिक आहे. पोलिस नाही. पोलिस अधिकारी (सुरेश ओबेरॉय) देखील नायका व त्याच्या कुटुंबाला संरक्षण पुरविण्यास असमर्थ ठरतो. नायकाला स्वत:ची ओळख लपवत खलनायकापासून दूर पळावे लागते. प्रत्येक वेळी खलनायक त्याला गाठतोच. शेवटी कंटाळून तो पळण्याऐवजी लढायचे ठरवतो. खलनायकाचे कच्चे दुवे हेरतो आणि चक्क बाजी पलटते. ज्या यातना खलनायकाने त्याला दिलेल्या असतात त्याच तो खलनायकाला भोगायला लावतो. शेवटी खलनायक हतबल ठरतो आणि नायकाला शरण येतो. अर्धसत्यचा नायक भावनिक पातळीवर स्वत:चा प्रश्न सोडवितो, ज्यास फारसे शारिरीक / बौद्धिक कष्ट पडत नाहीत आणि यात तात्कालिक मानसिक समाधानाशिवाय काहीच साध्य होत नाही कारण खून केल्याबद्दल शिक्षा तर होणारच. याउलट जवाब चा नायक स्वत:चा प्रश्न युक्तीने सोडवतो ज्या करिता त्याला बरेच बौद्धिक आणि शारिरीक श्रम करावे लागतात. या मार्गाने प्रश्न सोडविण्यास थोडा अधिक वेळ लागला तरी मिळणारा परिणाम जास्त प्रभावी असतो. अर्थात आपल्या नायकाने कुठला मार्ग चोखाळावा हे ठरवायचे स्वातंत्र्य तेंडूलकरांना एक पटकथाकार म्हणून नक्कीच आहे. परंतू त्याचबरोबर इतकी सामान्य सरधोपट पटकथा लिहीणार्‍या साहित्यिकाच्या नावाला पुरस्कार मिळण्यास असलेला माझा विरोध नोंदविण्याचे स्वातंत्र्य मला का असू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भावनिक आणि बौद्धीक युद्ध.....

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 16:37 नवीन
त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. आपल्या वरील वाक्याला अनुसरून आपल्याला चित्रपट समजला नाही असे मी मत मांडले आहे. कारण नायकाला काय त्रास होतो आहे हे आपल्याला समजलेले नाही. चित्रपटातील लढा हा, एक पोलीस अधिकारी आणि एक गुंड ह्यांच्यामधील (तुम्ही समजता तसा) नाही. तो भ्रष्ट राजकिय व्यवस्थेविरुद्ध आहे. पोलीस खात्यातील प्रामाणिक अधिकार्‍यांच्या घुसमटीला अधोरेखित करणारा आहे. ८० च्या दशकातल्या नायकाने असा विचार करणे म्हणजे त्याच्या मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. आदर्शवादाला आपण मानसिक दौर्बल्य मानत असाल तर माझी काही ना नाही. पण ८० च्या दशकातच काय पण आजच्या काळातही आदर्शवाद जोपासणारे अधिकारी सरकारी खात्यात अनेक ठिकाणी भेटतात. या वैफल्यते वर उतारा म्हणून त्याने शस्त्र उचलले ते पण त्याच्या नोकरी मुळे त्याच्या हाती आलेलेच ना? वैफल्य भावनेतून उचललेले शस्त्र म्हणजे वैफल्यावर उतारा नाही. ते वैफल्याने जन्माला घातलेले अपत्य आहे. नायकाच्या कृतीचे मी समर्थन करीन नाहीए. त्याच्या मानसिक अवस्थेचे विदारक चित्र आपल्या ध्यानात यावे एवढीच माझी इच्छा आहे. सामान्य माणसा कडे तर शस्त्र देखील नसते. त्याने काय करावे? प्रसंगी सामान्य माणूसही बेभान होतो. पाहा: 'डोंबिवली फास्ट'. अर्धसत्यचा नायक भावनिक पातळीवर स्वत:चा प्रश्न सोडवितो, ज्यास फारसे शारिरीक / बौद्धिक कष्ट पडत नाहीत बौद्धीक आणि भावनिक दोन्ही मार्ग 'ध्येया' कडे घेऊन जाणारे आहेत. 'ध्येय' महत्त्वाचे की तिथपर्यंत पोहोचण्यचा मार्ग? ह्या भावनिक मार्गावरील नायकाच्या समर्पणाच्या त्यागी वृत्तीला, स्वतः संपलो तरी बेहत्तर पण ह्या गुन्हेगारापासून समाजाला सोडविन ह्या उदात्त भावनेला आपण कमी लेखता आहात. जपानी युद्धातील 'हाराकिरी', राजस्थान्यांचे 'केसरिया' आणि मराठ्यांच्या बाजीप्रभू देशपांड्यांचे पावनखिंडीतील आत्मसमर्पण आपल्या लेखी फक्त 'भावनिक' म्हणून कमीपणाचे आहे का? 'जवाब' चित्रपट मी पाहिलेला नाही. पण जे शब्दचित्र आपण उभे केले आहे त्यावरून वाटते की त्या चित्रपटाच्या पटकथाकाराला 'ज्ञानपीठ' नक्कीच मिळाले असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

भावनिक मार्ग जवळचा वाटला तरी फलदायी नाही

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 17:00 नवीन
<< कारण नायकाला काय त्रास होतो आहे हे आपल्याला समजलेले नाही. >> त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- द ९०-१० प्रिन्सिपल http://intheinterestofpublic.blogspot.com/2011/10/90-10-principle_01.html शिवाय त्रास सहन करता यायला हवा. विजय सहजासहजी मिळत नाही. नायकाने अनेक वर्षे पोलिस सेवेत घालवली आहेत आणि त्यानंतरच्या घुसमटीला कंटाळून तो कायदा हाती घेत नाही तर नोकरीच्या अगदी सुरूवातीच्या काळातच सर्वांशी पंगा घ्यायला जातो असे दाखविले आहे. त्याच्याकडे पेशन्स नाही असे दिसून येते. << आदर्शवादाला आपण मानसिक दौर्बल्य मानत असाल तर माझी काही ना नाही. >> आदर्शवादाचा मीही आदर करतो आणि तो जोपासतो ही . पण म्हणून सर्वच जण तसे असतील असा भाबडा आशावाद मी बाळगत नाही (http://at-least-i-think-so.blogspot.com/2011/01/blog-post.html). म्हणजे मी जरी प्रामाणिक असलो तरी माझे सहकारी / वरिष्ठ विकले गेलेले असू शकतात. मला रिझल्ट्स मिळायला वेळ लागणार हे मी गृहीत धरलेले असते. << ह्या भावनिक मार्गावरील नायकाच्या समर्पणाच्या त्यागी वृत्तीला, स्वतः संपलो तरी बेहत्तर पण ह्या गुन्हेगारापासून समाजाला सोडविन ह्या उदात्त भावनेला आपण कमी लेखता आहात. >> नायकाची समर्पणाची त्यागी वृत्ती अजिबात जाणवत नाही. तो एक आततायी निर्णय वाटतो. << जपानी युद्धातील 'हाराकिरी', राजस्थान्यांचे 'केसरिया' आणि मराठ्यांच्या बाजीप्रभू देशपांड्यांचे पावनखिंडीतील आत्मसमर्पण आपल्या लेखी फक्त 'भावनिक' म्हणून कमीपणाचे आहे का? >> आता कायद्याचे राज्य असल्याने ही उदाहरणे येथे गैरलागू ठरतात. म्हणजे असे पाहा की बाजीप्रभूंनी लढाईत ५० सैनिक ठार केले तरी त्यांच्यावर खटला भरला गेला नसता. आताच्या काळात मी कसाबवर जरी गोळी झाडली तरी आपले सरकार माझ्यावर कायदेशीर कारवाई करणारच. त्यामुळे कसाबला सरकार देत असलेली रॉयल ट्रीटमेंट मला कितीही चीड आणणारी ठरली तरी मी तिचा निषेध केवळ सनदशीर (http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/11/blog-post_26.html) मार्गानेच करणार. शॉर्ट कट्स कितीही आकर्षक वाटले तरी माझा त्यांना विरोधच आहे. लांबचा मार्ग अनाकर्षक असला तरी त्याला पर्याय नाही. अर्धसत्य विषयी बरीच चर्चा झाली. कमला विषयी काही बोलायचे असेल तर बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

त्रास करून घेण्यावर आहे. हे

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 17:58 नवीन
त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- हा त्रास मी करून घेतलेला नाही. शिवाय त्रास सहन करता यायला हवा. व्वा क्या बात है। पोलीस खात्यात हेच नेमके शिकवित नाहीत. नायकाने अनेक वर्षे पोलिस सेवेत घालवली आहेत आणि त्यानंतरच्या घुसमटीला कंटाळून तो कायदा हाती घेत नाही चला, म्हणजे पोलीसखात्यात निवृत्तीकाळ येईपर्यंत आपला आदर्शवाद टिकला तर हातात कायदा घ्यायला परवानगी आहे. निदान ते समर्थनिय तरी आहे. उत्तम. आदर्शवादाचा मीही आदर करतो आदर्शवादाला तुम्ही मानसिक दौर्बल्य मानता. सर्वच जण तसे असतील असा भाबडा आशावाद मी बाळगत नाही म्हणजे नायकाने जे-जे आदर्शवादी नाहीत त्या-त्या सर्वांना संपविण्याचा चंग बांधला होता. आदर्शवादी नसलेला पहिला बळी पडला बिचारा रामा शेट्टी. म्हणजे नायक वेलणकरला सरकारने दिलेले पिस्तुल आणि गोळ्या कमीच पडल्या असत्या. नायकाची समर्पणाची त्यागी वृत्ती अजिबात जाणवत नाही. नायक एक पोलीस अधिकारी आहे. आपण करीत असलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला ठाऊक आहे. तरीही त्याच्या आदर्शवादाला, कर्तव्यदक्षतेला स्मरून तो ते कृत्य करतो. तेही समाजाच्या हितासाठी. ह्याला आत्मसमर्पणच म्हणतात. आपल्या असल्या बिनबुडांच्या विधानांमुळेच आपल्याला चित्रपट समजलाच नाही असे पुन्हा पुन्हा जाणवते आहे. आता कायद्याचे राज्य असल्याने ही उदाहरणे येथे गैरलागू ठरतात. कायद्या॑च्या राज्यात एक देश दुसर्‍यादेशात हेर पाठवत नाही का? त्या हेराला आपण पकडले गेलो तर काय परिणाम होतील हे माहित नसते का? पोलीसांत अजूनही शौर्यपदके वाटत नाहीत का? कसाबला पकडताना मारल्या गेलेल्या अधिकार्‍यांचे बलिदान व्यर्थ म्हणायचे का? ज्यांनी ज्यांनी त्या दहातल्या ९ दहशतवाद्यांवर गोळ्या झाडून त्यांना यमसदनास पाठविले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली का? म्हणजे असे पाहा की बाजीप्रभूंनी लढाईत ५० सैनिक ठार केले तरी त्यांच्यावर खटला भरला गेला नसता. आताच्या काळात मी कसाबवर जरी गोळी झाडली तरी आपले सरकार माझ्यावर कायदेशीर कारवाई करणारच. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांचे सरदार होते, स्वराज्याच्या रक्षणासाठी ते लढले.ते जिवंत राहिले असते तर खटला नाही, महाराजांनी सोन्याचे कडे बहाल केले असते. आत्ताच्या काळात आपण पोलीस दलात असता आणि 'त्या' दिवशी आपण कसाबला मारले असते (जीवंत पकडणे शक्य नसेल तर) आपणावर कायदेशीर कारवाई नाही आपला गौरव केला असता. (अगदी मीही). उलट आपण हातात बंदूक असूनही 'भाबडा आदर्शवाद जोपासण्यापेक्षा कसाबला बुद्धीच्या बळावर अटक करूया असा विचार केला असतात' तर आज मिपावर सदस्य नसता. भिंतीवर आपण फोटोला चंदनाचा हार असता. लांबचा मार्ग अनाकर्षक असला तरी त्याला पर्याय नाही. पाकिस्तान बरोबर काश्मीर बाबतीत चर्चेचे 'गुर्‍हाळ' अनेक दशके चालू आहे तसेच ह्या पुढेही अनेक दशके (कदाचित शतके) चालू राहील. पाकिस्तान भारतात दहशत कारवाया चालूच ठेवेल. आपण परिपक्व आदर्शवादाचे बिल्ले छातीवर मिरवूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

चित्रपटातील मार्ग मला पटला

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 18:38 नवीन
चित्रपटातील मार्ग मला पटला नाही म्हणजे चित्रपट मला समजला नाही हा आपला अट्टहास मला मान्य नाही. << त्रास करून घेण्यावर आहे. हे पाहा आणि संपूर्ण वाचा:- हा त्रास मी करून घेतलेला नाही.>> आपण त्रास करून घेताय असे मला म्हणायचे नसून नायक असा त्रास करुन घेतोय हे माझे मत आहे. << नायक एक पोलीस अधिकारी आहे. आपण करीत असलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला ठाऊक आहे. तरीही त्याच्या आदर्शवादाला, कर्तव्यदक्षतेला स्मरून तो ते कृत्य करतो. तेही समाजाच्या हितासाठी. ह्याला आत्मसमर्पणच म्हणतात. आपल्या असल्या बिनबुडांच्या विधानांमुळेच आपल्याला चित्रपट समजलाच नाही असे पुन्हा पुन्हा जाणवते आहे. >> मग न्यायालयीन प्रक्रिया कशाकरिता आहे? सर्वच पोलिसांनी सर्वच गुन्हेगारांना अशा पद्धतीने संपवायला हवे का? माझी विधाने बिनबुडाची असल्याचा आपला आरोप अतार्किक आहे. << कसाबला पकडताना मारल्या गेलेल्या अधिकार्‍यांचे बलिदान व्यर्थ म्हणायचे का? ज्यांनी ज्यांनी त्या दहातल्या ९ दहशतवाद्यांवर गोळ्या झाडून त्यांना यमसदनास पाठविले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली का? >> ह्या विधानांना बिनबुडाचे का म्हणू नये? कसाबच्या साथीदारांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या कारण ते निरपराध जनतेवर हल्ला करीत होते. जनतेवरील हल्ला रोखण्याकरिता पोलिसांनी केला गेलेला गोळीबार कायद्याने समर्थनीय च ठरतो. पण अर्धसत्य चित्रपटात नि:शस्त्र शेट्टीवर नायक जो शस्त्र हल्ला करतो त्याचे समर्थन कायदा करेल काय? <<आत्ताच्या काळात आपण पोलीस दलात असता आणि 'त्या' दिवशी आपण कसाबला मारले असते (जीवंत पकडणे शक्य नसेल तर) आपणावर कायदेशीर कारवाई नाही आपला गौरव केला असता. (अगदी मीही) >> हे मला मान्य आहे. माझी वाक्ये पुन्हा वाचा - जनतेवरील हल्ला रोखण्याकरिता पोलिसांनी केला गेलेला गोळीबार कायद्याने समर्थनीय च ठरतो. पण अर्धसत्य चित्रपटात नि:शस्त्र शेट्टीवर नायक जो शस्त्र हल्ला करतो त्याचे समर्थन कायदा करेल काय? कसाब आज पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचेवर लाखो रुपये खर्च होत आहेत ज्यास जनतेचा विरोध आहे तरीही आज जर एखाद्याने कसाबवर हल्ला करून ठार मारले तर हल्लेखोरावर (हल्लेखोराचा हेतू कितीही उदात्त असला तरीही) निश्चितच कायदेशीर कारवाई होणार. << उलट आपण हातात बंदूक असूनही 'भाबडा आदर्शवाद जोपासण्यापेक्षा कसाबला बुद्धीच्या बळावर अटक करूया असा विचार केला असतात' तर आज मिपावर सदस्य नसता. भिंतीवर आपण फोटोला चंदनाचा हार असता. >> त्याक्षणी शस्त्र चालविणे योग्यच ठरते. इन फॅक्ट पोलिसांना त्याकरिताच शस्त्रे दिलेली असतात. नि:शस्त्र व शांत पणे बसलेल्या व्यक्तिवर शस्त्र चालविण्याचे समर्थन कायदा करीत नाही. << आदर्शवादाला तुम्ही मानसिक दौर्बल्य मानता. >> असं काहीही मी मानत नाही. पण आपला आदर्शवाद जोपासताना मला कायदा मोडून गुन्हेगारांना संपविणे योग्य वाटत नाही. कारण अशा प्रकारे उद्या एखादा भ्रष्ट पोलिस ही चांगल्या व्यक्तिला घरात घुसून ठार करू शकेल व नंतर ठार झालेली व्यक्ती गुन्हेगारी वर्तनाची होती असा कांगावाही करू शकेल. म्हणूनच पोलिसांनी शक्यतो संशयितांना जिवंत पकडावे, अगदीच नाईलाज असेल तर त्यांच्या हातापायावर गोळ्या चालवाव्यात, पकडलेल्या आरोपींना न्यायालयापुढे सादर करावे. खटला चालवून त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले म्हणजे न्यायालयाने ठरवून दिलेली शिक्षा गुन्हेगारांनी भोगावी अशी आपली पद्धत आहे. काहि त्रूटी यात असल्या तरी याला पर्याय म्हणून अर्धसत्य चित्रपटात सूचविली गेलेली पद्धत अधिकच घातक आहे. << पाकिस्तान बरोबर काश्मीर बाबतीत चर्चेचे 'गुर्‍हाळ' अनेक दशके चालू आहे तसेच ह्या पुढेही अनेक दशके (कदाचित शतके) चालू राहील. पाकिस्तान भारतात दहशत कारवाया चालूच ठेवेल. आपण परिपक्व आदर्शवादाचे बिल्ले छातीवर मिरवूया. >> हा परराष्ट्राशी संबंधित विषय आहे. अर्धसत्य च्या पटकथेशी याचा संबंध नसल्याने काही भाष्य करीत नाही. अर्धसत्य ने सूचविलेला उपाय मला वास्तववादी वाटत नाही आणि एखादी कलाकृती वास्तवापासून दूर आहे http://www.misalpav.com/node/19372#comment-345317 असा अभिप्राय देण्याचं माझं स्वातंत्र्य आपणही मान्य कराल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

....

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 18:45 नवीन
http://www.misalpav.com/node/19366#comment-345383
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

विजय तेंडुलकर

राही
Mon, 10/10/2011 - 17:10 नवीन
एकदा गिरीश कर्नाड यांची प्रदीर्घ मुलाखत ऐकण्या-पाहाण्याचा योग आला होता. त्यांना विचारला गेलेला एक प्रश्न असा होता- इतकं सगळं समृद्ध आयुष्य तुम्ही जगलात. तर आता एखादी गोष्ट व्हायला हवी होती ती राहून गेली,अशी एक खंत तुम्हाला कधी वाटते का? तर त्यावर ते म्हणाले होते,-वैयक्तिक आयुष्याबाबत कसलीच खंत नाही.पण सार्वजनिक आयुष्यात मात्र एक गोष्ट तीव्रतेने घडावी असं वाटत होतं,ती गोष्ट घडली नाही. तेंडुलकरांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं, तेही माझ्या आधी, ते मिळालं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

.....अंतिम निर्णय घेतीलच

यकु
Sat, 10/08/2011 - 12:52 नवीन
.....अंतिम निर्णय घेतीलच म्हणा.
अंतिम निर्णय ??? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ज्ञानपीठची सोडत सुरु असल्यासारखं वाटलं .
  • Log in or register to post comments

....

पल्लवी
Sat, 10/08/2011 - 15:29 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पात्र

चिरोटा
Sat, 10/08/2011 - 15:37 नवीन
आय आय टी/आय ए एस/ एन डी.ए मध्ये मराठी टक्का कमी, आता ज्ञानपीठपण? असो.
आपले काय मत आहे?
ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार? हिंदी भाषा अनेक राज्यांत बोलली/वाचली जाते तेव्हा त्या भाषेत लिहिणार्‍यांना अधिक पुरस्कार मिळावेत ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. कन्नड साहित्याविषयी खूप माहिती नाही पण मित्र सांगतात त्यानुसार साहित्यात विविधता प्रचंड आहे.
का असे पुरस्कार मिळवण्यासाठी पडद्यामागे ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्यात मराठी माणूस मागे पडतो
सरकारी पुरस्कार मिळवण्यासाठी हालचाली कराव्याच लागतात. अगदी दादासाहेब फाळके पुरस्कारापासून ते भारतरत्न पर्यंत. ज्ञानपीठचे ठावूक नाही पण आधिचे ज्ञानपीठ विजेते बघितलेत तर त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच आहे असे म्हणता येईल. डॉ. चंद्रशेखर कंबार ह्यांना पुरस्कार देण्यापेक्षा तो एस्.एल. भैरप्पा ह्यांना मिळायला हवा होता असे काही कन्नड लेखकांचे मत असल्याचे वाचले. ( http://www.dnaindia.com/bangalore/report_noted-kannada-writer-patil-puttappa-kicks-up-jnanpith-storm_1589749 ) Puttappa sees intense lobbying as the reason for Bhyrappa losing out to less deserving litterateurs like Kambar भैरप्पा ह्यांनी एका पुस्तकात्/भाषणात इंदिरा गांधींना भ्रष्टाचाराची माता असा उल्लेख केला होता. तेव्हा योगदान अधिक असूनही पुरस्कार मिळण्याची शक्यता ३ वर्षे तरी नाही!! ( कंबार ह्यांचे नाव तर अनेक कन्नड मित्रांना माहितही नव्हते! पण पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर त्यांनी माना डोलावल्या!! कंबार ह्यांचेही साहित्य वाचनिय/अभ्यासनीय आहे पण भैरप्पांएवढे ते लोकप्रिय नाहीत). प्रश्न असा पडतो की हे intense lobbying कोण करतो ? ( कर्नाटकात भा.ज.प. चे सरकार आहे . त्यांच्या मतांना केंद्रातले मंत्री फार विचारतील असे वाटत नाही. केंद्रात कर्नाटकचे दोनच वजनदार मंत्री आहेत. एस्,एम. कॄष्णा / वीरप्पा मोईली . मराठी मंत्री तर केंद्रात अनेक आहेत आणि अधिक वजनदार) निवडपक्रिया येथे दिली आहे ( http://jnanpith.net/awards/jnanpith-award ) The process of selection begins with the submission of proposals by a large number of litterateurs, teachers, critics and discriminating readers, also from various universities, literary and language associations and other similar organisations. (As per the rules of the award, once a language gets the award, it is not eligible for consideration during the next three years. Thus three languages are out of reckoning for the award every year). Intense lobbying कुठे करावे लागते वर कळते.
  • Log in or register to post comments

खुलासा

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 06:52 नवीन
चिरोटाजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एक खुलासा : या धाग्यामागे 'आपल्या तो बाळ्या' या न्यायाने 'मराठी साहित्याला 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत अधिक प्राधान्य मिळायला(च) हवे' असा कोता विचार मांडण्याचा हेतू निश्चित नव्हता. मूळ धाग्यात आणि माझ्या वरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे धाग्याचा खरा मुद्दा आहे : जर 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भाषांतील साहित्यापेक्षा जास्त सरस आहे' हे गृहितक (assumption) वा जनमानसातील विचार खरा मानला तर त्याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेत्यांच्या यादीत का दिसत नाही? असे प्रतिबिंब दिसत नाही याचे कारण या दोहोंपैकी कोणते : (अ) मुळात हे गृहितक वा जनमानसातील विचार चुकीचा आहे किंवा (ब) गृहितक खरे आहे पण 'पडद्यामागील हालचालीं'मुळे वस्तुस्थिती व पुरस्कार-विजेत्यांची यादी मध्ये तफावत आहे ? ज्ञानपीठ पुरस्कार विजेता निवडीची प्रक्रिया पारदर्शक व स्वच्छ असेल तर या निवडीचा स्वीकार सर्वांनी करायलाच हवा. जर यात मराठी साहित्याला इतरांच्या मानाने कमी पुरस्कार मिळाले तर so be it ! तर 'ही प्रक्रिया अशी स्वच्छ आहे का' असा प्रश्न मांडणे व त्यावर चर्चा होणे निव्वळ एवढाच हेतू या धाग्यामागे आहे.
ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार?
इतर भाषांतील साहित्य मराठी साहित्यापेक्षा निश्चितच कमी वा अधिक सरस असू शकतात. पुनरुक्तीचा धोका पत्करुन परत एकदा : मुद्दा असा आहे की 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भारतीय भाषांमधील साहित्यापेक्षा अधिक सकस व समृध्द आहे' असा जो सर्वसामान्य विचार आहे तो विचार तरी एकतर मुळातच चुकीचा आहे अथवा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या निवडप्रक्रियेत (पडद्यामागील हालचालींना सुध्दा महत्व दिल्यामुळे) घोळ आहे : या दोहोंपैकी सत्य काय आहे? Interestingly, 'इतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार?' असा प्रश्न प्रतिसादाच्या सुरुवातीला विचारुन प्रतिसादाच्या शेवटी आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

साचेबद्ध आणि एकसुरी लेखन- माझं थोडसं अवांतर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/09/2011 - 10:39 नवीन
मराठी (व बंगाली) साहित्य इतर भारतीय भाषांमधील साहित्यापेक्षा अधिक सकस व समृध्द आहे' असा जो सर्वसामान्य विचार आहे तो विचार तरी एकतर मुळातच चुकीचा आहे इतर भाषांमधील मी काही खूप लेखन वाचलेले नाही परंतु मराठी लेखनाबद्दल नेहमी असे बोलल्या जाते की, एकसुरीपणा आणि लेखनातील साचलेपणा यामुळे मराठी साहित्य लेखन फारसं पुढे जातांना दिसत नाही. इतर भाषेच्या तुलनेत ज्ञानपीठ पुरस्काराच्या यादीत आपण मागे का आहोत त्याचाही विचार केला पाहिजे. मराठीतील एखादी कलाकृती गाजते आणि अनेक दिवस संबंधित लेखकाला पुढे काय लिहावे असा प्रश्न पडतो आणि लिहिले तरी पूर्वी इतकेच कसदार लेखन आणि विषय मांडतांना नावीन्य लेखनात दिसून येत नाही. मराठी समाजमनावर आणि साहित्यावर विविध प्रभाव पडत असतात अशा प्रभावांचा विचार समर्थपणे मराठी साहित्यातून आला पाहिजे. सभोवातलाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलत्या प्रवाहांचा विचार समर्थपणे मराठी साहित्यातूना आला पाहिजे, तो का येत नाही ? प्रचारकी लेखनापेक्षा अधिक कलात्मकता प्रकट करणारे लेखनच आपल्याला ज्ञानपीठाकडे घेऊन जातील असे मला वाटते. गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी,कलात्मकता, वैश्विक मुल्य, लेखनाचा नवा आकृतीबंध मराठी लेखनात आला पाहिजे. साचेबद्ध,एकसुरी, आणि कंटाळवाणे साहित्य ज्ञानपीठाच्या शर्यतीत टीकणार कसे ? शेतकरी, कष्टकरी, दलित, स्त्रिया, यांच्याबद्दलचे लेखन अजूनही प्रभावीपणे आलेले नाही त्यामुळे मराठी लेखनाला अजून खूप वाव आहे, भविष्यात ज्ञानपीठ आपल्यापासून फारसे दूर राहणार नाही असे वाटते. नवा मराठी वाचक जोडणारे किती मराठी लेखन आज बाजारात उपलब्ध आहे. एखाद्या नव्या मराठी वाचकाने एखादी नवी दर्जेदार कादंबरी वाचायला मागितली तर एक वाचक म्हणून आपण या दशकात उत्तमोत्तम वाचलेल्या मराठी पुस्तकांपैकी आपलं कोणत्या नावावर एकमत होईल ? मी अजूनही ययाती आणि प्रसिद्ध अशा काहीच पुस्तकांची नावे का घेतो ? कारण या कलाकृतींनी मराठी वाचकांच्या र्‍हदयाचा ठाव घेतलेला आहे. मागेही म्हटलं होतं तेच म्हणतो की, विंदांच्या कविता वाचून डॉ.कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते. असे नवे वाचक जोडणारे लेखन किती लेखकांनी दिले आहे याचाही विचार या निमित्ताने झाला पाहिजे असे मला वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

पूर्णत: सहमत

चेतन सुभाष गुगळे
Sun, 10/09/2011 - 10:50 नवीन
डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या सर्व मतांशी पूर्णत: सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+ १

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 15:48 नवीन
डॉ बिरुटे, मराठी साहित्यातील कमतरता / सुधारणेस जागा / नवीन विषय वगैरे मुद्यांचा हा आढावा-धांडोळा निश्चितच आवडला ! - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी लेखकाला ज्ञानपीठ

JAGOMOHANPYARE
Sat, 10/08/2011 - 20:04 नवीन
मराठी लेखकाला ज्ञानपीठ द्यायचे असेल तर दोन क्रायटेरिया आहेत.. नावाची सुरुवात वि ने असावी लागते आडनावात शेवटी कर असावे लागते.. वि स खांडेकर वि वा शिरवाडकर विन्दा करंदीकर त्यामुळे इतराना ज्ञानपीठ मिळणे शक्य नाही.. :)
  • Log in or register to post comments

(No subject)

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 06:23 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अजब आहे पण निरिक्षण वाखाणण्याजोगे !

वाहीदा
Sun, 10/09/2011 - 20:48 नवीन
अरे व्वा ! अजब आहे पण निरिक्षण वाखाणण्याजोगे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

छान

सुनील
Mon, 10/10/2011 - 14:00 नवीन
तरीच वि आ बुवांना मिळाला नाही! परंतु मिपाकर असलेल्या विश्वास कल्याणकर यांना मिळू शकेलसे वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

माझा आयडी उलटवून "विग" करावा

गवि
Mon, 10/10/2011 - 14:06 नवीन
माझा आयडी उलटवून "विग" करावा अशी मी संबंधित अधिकार्‍यांना विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

विग मिपाकर

शाहिर
Mon, 10/10/2011 - 18:21 नवीन
विग मिपाकर यांना मानाचा मिपा पीठ पुरस्कार जाहिर झाला आहे ( खर तर गुर्‍हाळ पूरस्कार मिळायला हवेत असे अनेक लेखक आहेत मि पा वर ..नावे घेतली कि मारुतीच्या शेपू टा सारखे प्रतिसाद ..असो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मग तर विजय तेंडुलकर हे नाव

वपाडाव
Mon, 10/10/2011 - 14:45 नवीन
मग तर विजय तेंडुलकर हे नाव फायनल व्हायला हरकत नाही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

आँ? इतकी सोप्पी गोष्ट

राही
Mon, 10/10/2011 - 16:58 नवीन
तर मग वि जय तेंडुल कर यांचे नाव कसे काय राहून गेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

पुरस्कार हवेतच कशासाठी?

प्रभाकर पेठकर
Sat, 10/08/2011 - 20:59 नवीन
'अर्धसत्य' कुठल्या कथेवर आधारीत आहे. तो संपूर्णपणे त्या कथेवर आधारीत आहे की त्याच्या एका भागावर वगैरे जे काही 'पूर्णसत्य' असेल किंवा 'अर्धसत्य' असेल ते असूदे बापुडे आम्हाला 'अर्धसत्य' चित्रपट मनापासून आवडला. तो मलातरी 'रटाळ' किंवा 'प्रचारकी' वगैरे वाटला नाही. तसेही, एखाद्या कथेचा चित्रपट बनविताना चित्रपटक्षेत्राची अशी म्हणून काही गणितं असतात त्यांना अनुसरून कथानकात बदल केले जातात. ह्यालाही लेखकाची संमती असतेच. अन्यथा लेखकाला कोर्टाचा मार्ग मोकळा असतो. जर अजिबात काही बदल करावयाचे नसतील तर लेखकाने एकतर स्वतःच आपल्या कथेवर चित्रपट काढावा किंवा आपल्या कथा चित्रपट निर्मात्यांना 'विकू' नयेत. 'कमला' चित्रपटही पाहिला आहे पण आता तपशिलवार आठवत नाही. वाचक, लेखकाचे लेखन डोक्यावर घेतात ह्याहून दूसरा पुरस्कार तो काय? पुलंना ज्ञानपिठ नाही मिळाले म्हणून त्यांच्या लेखनाचा दर्जा काही कमी होत नाही. पुलंच्या पश्चात आजही कधी एखाद्या पार्टीत, सहलीत, दूरच्या प्रवासात किंवा अगदी सहजपणेही जेंव्हा जेंव्हा पुलंच्या लेखनाचे संदर्भ निघतात, चर्चा होतात तेंव्हा तेंव्हा उतारेच्या उतारे पाठ असलेले अनेक जणं चर्चेत रंग भरतात. लोकं डोळ्यात पाणी येईस्तोवर हसत राहतात. आपले वैयक्तिक दु:ख, समस्या विसरायला लावणारे पुलंचे लेखन लाखो वाचकांनी स्वतःच्या मनावर कोरले आहे. तो पुलंना वाचकांनी बहाल केलेला सर्वात मोठा पुरस्कार आहे. इतर सर्व पुरस्कार (ज्ञानपिठासहित) म्हणजे एक 'औपचारिक' साहित्यिक घटना म्ह्णावी लागेल.
  • Log in or register to post comments

+१

यकु
Sat, 10/08/2011 - 21:09 नवीन
अर्धसत्य पहिला नाही. प्रतिसादाच्या दुसर्‍या परिच्छेदाशी १०० % सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जरूर पाहा....

प्रभाकर पेठकर
Sat, 10/08/2011 - 21:18 नवीन
अर्धसत्य पहिला नाही. कुठे मिळाल्यास जरूर पाहा. पोलीसखात्यात होणारी घुसमट, सदाशिव अमरापुरकरांचा हिन्दीतील पदार्पणातील अभिनय, ओम पुरीचा, घुसमट सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा , अभिनय इत्यादी अनेक गोष्टीनी पूर्णत्वास नेलेला 'अर्धसत्य' चित्रपट एकदा पाहावाच असा आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अर्धसत्य आणि कमला

चेतन सुभाष गुगळे
Sat, 10/08/2011 - 21:30 नवीन
ज्यांनी पाहिले नसतील आणि पाहण्यास इच्छुक असतील त्यांच्याकरिता अर्धसत्य http://www.youtube.com/watch?v=WTyarLp-zuQ कमला http://www.youtube.com/watch?v=r6AJ8gAzejA&feature=watch-now-button&wide=1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद गुगळे साहेब.

यकु
Sat, 10/08/2011 - 21:32 नवीन
धन्यवाद गुगळे साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

तुम्ही हे चित्रपट पाहावेत अशी माझीही तुम्हाला विनंती आहेच.

चेतन सुभाष गुगळे
Sat, 10/08/2011 - 21:42 नवीन
कुलकर्णी साहेब, तुमचा या दोन्ही चित्रपटांवरचा अभिप्राय जाणण्यास उत्सुक आहे. तुम्ही यापुर्वी रारंगढांग पुस्तकावर दिलेला अभिप्राय अजुन माझ्या स्मरणात आहे. प्रवाहाविरुद्ध असले तरी आपले प्रांजळ मत आपण मांडू शकता हे त्यावेळी दिसून आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्रांजळ...?

प्रभाकर पेठकर
Sun, 10/09/2011 - 01:29 नवीन
प्रवाहाविरुद्ध असले तरी आपले प्रांजळ मत आपण मांडू शकता हे त्यावेळी दिसून आले होते. हे कौतुक इथे कशा करीता? प्रवाहाविरुद्ध असेल तरच 'प्रांजळ' असे काही ठसविण्याचा प्रयत्न आहे का? दोन्ही चित्रपटांच्या लिंक्स दिल्या, कौतुकास्पद आहे. पुढील वाक्य अभिप्राय कुठल्या दिशेने अपेक्षित आहे हे 'सुचविणारा' आहे. ते जरा खटकले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

माझ्या सूचविण्याने त्यांचे मत बदलणार आहे का?

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 14:57 नवीन
<< पुढील वाक्य अभिप्राय कुठल्या दिशेने अपेक्षित आहे हे 'सुचविणारा' आहे. ते जरा खटकले. >> जी व्यक्ती बहुसंख्यांच्या प्रवाहाविरुद्ध स्वत:चे मत मांडण्याचे धाडस करते त्या व्यक्तीला मला कसा अभिप्राय अपेक्षित आहे हे मी कशाला सूचवेन? बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे असे आपणांस वाटते की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अजिबात नाही.

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 15:35 नवीन
बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे असे आपणांस वाटते की काय? अजिबात नाही. तसे असते तर मी आपल्याला प्रतिसाद न देता श्री. एकनाथ यशवंत ह्यांना व्यनिद्वारे 'सावध' केले असते. पण, ज्या शब्दात आपण आपला प्रतिसाद बांधाला आहे त्यावरून 'बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे' असा आपलाच गैरसमज झाल्याचे जाणवल्याने आपणास प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा