धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय : (एका आठवड्यात) तिसरा धागा प्रकाशित केल्यास लेखनबंदी!

पांथस्थ's picture
पांथस्थ in काथ्याकूट
30 Sep 2011 - 11:20 pm
गाभा: 

प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ?

-----

मिपावर सात दिवसाच्या आत तिसरा धागा प्रकाशित केला (दोन्/तीन्/चार कितीही ओळींचा) तर नसबंदीची आपलं हे लेखनबंदीची शस्त्रक्रिया कारवाई सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा कायदा मिपावरच नव्हे तर उ**मासह सगळ्या मराठी संकेतस्थळांवर कोणतीही सवलत न देता लागु करावा...

त्याचबरोबर आंतरजालीय माफियांनी आणी वेबहोस्टींग कंपन्यांनी विदाचे अवास्तव महत्व/गरज भासवत डेटा-सेंटरचा गुंतवणुकीसाठी वापर करत संकेतस्थळाच्या किमती आकाशातुन जमिनीवर आणुन ठेवल्यात. संकेतस्थळाकरता कीती जागा वापरावी, एकाच्या नावावर कीती संकेतस्थळं असावीत, कीती सर्व्हर स्लॉट मोकळे असावे यावर कोणतेही बंधन नाही.

यामुळे सामान्य जनतेस संकेतस्थळ बनविणे / धागे प्रसविणे प्रकाशित करणे अतिशय सोपे झाले आहे. तरी सरकारने हे कायदे त्वरित अंमलात आणावे

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

30 Sep 2011 - 11:26 pm | आशु जोग

विनोदी पण गंभीर विचार देणारा धागा आहे तुमचा ,

आगे बढो !

शिल्पा ब's picture

1 Oct 2011 - 1:28 am | शिल्पा ब

एका आठवड्यात ३-४ लेख प्रसवणारे लेखक रिकामटेकडेच असतात मग त्यांच्यावर बंधनं घालून इतर धाग्यांवर प्रतिक्रियेचा गोंधळ का वाढवा? आणि किती लोकांवर लेखनबंदी घालणार?

शैलेन्द्र's picture

1 Oct 2011 - 11:04 am | शैलेन्द्र

ज्जे बात्त..

अत्रुप्त आत्मा's picture

1 Oct 2011 - 7:36 am | अत्रुप्त आत्मा

धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय काय?... संपादकांनी अश्या आसुरी धाग्यांवर भस्म टाकावे,,, ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2011 - 7:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि त्या नाडीच्या धाग्यांच्या जनकाचीही सक्तीने नसबंदी करावी ... वीट आलाय त्या ओकार्‍यांचा. व्यक्तीगत प्रतिसाद वाटला तरी कृपया मिपा संपादकांनी याची नोंद घ्यावी.

शिल्पा ब's picture

1 Oct 2011 - 8:08 am | शिल्पा ब

सहमत आहे.

निवेदिता-ताई's picture

1 Oct 2011 - 8:10 am | निवेदिता-ताई

.

नितिन थत्ते's picture

1 Oct 2011 - 8:17 am | नितिन थत्ते

असहमत आहे.

शिल्पा ब's picture

1 Oct 2011 - 8:26 am | शिल्पा ब

का?

नितिन थत्ते's picture

1 Oct 2011 - 10:22 am | नितिन थत्ते

मेरी मर्जी

(स्वतंत्र) नितिन थत्ते

नितिन थत्ते's picture

1 Oct 2011 - 10:24 am | नितिन थत्ते

मेरी मर्जी

(स्वतंत्र) नितिन थत्ते

नन्दादीप's picture

1 Oct 2011 - 12:02 pm | नन्दादीप

-१ ला -१ (खरे तर +१ पण +१ केल तर ० होईल ना म्हणून -१).

तिमा's picture

2 Oct 2011 - 11:20 am | तिमा

थत्तेचाचांच्या असहमतीशी सहमत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

2 Oct 2011 - 2:12 pm | अप्पा जोगळेकर

तिरशिंगरावांनी थत्ते काकांच्या असहमतीला जी सहमती दाखवली त्याला पाठिंबा आहे.

क्लिंटन's picture

2 Oct 2011 - 4:25 pm | क्लिंटन

अप्पा जोगळेकरांनी तिरसिंगरावांनी थत्ते काकांच्या असहमतीला जी सहमती दाखवली त्याला पाठिंबा दिला त्याला सहमती आहे.

जव्हेरगंज's picture

18 Jan 2016 - 9:15 pm | जव्हेरगंज

क्लिंटनला मोदक!

अर्धवटराव's picture

1 Oct 2011 - 8:36 am | अर्धवटराव

हाच न्याय लावतो म्हटलं तर (प्रतिक्रियांना सुद्धा... बरेचदा प्रतिक्रिया मूळ लेखापेक्षा खुप जास्त रटाळ/अवास्तव/फालतु वगैरे वगैरे असतात ) मिपा ओस पडायचा धोका आहे ;)

शिवाय आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि.

(सिलेक्टीव्ह वाचक) अर्धवटराव

सोत्रि's picture

1 Oct 2011 - 8:55 am | सोत्रि

सहमत!

- ( डोक्याला हेडेकचं दुखणं न होउ देणारा ) सोकाजी

प्रचेतस's picture

1 Oct 2011 - 9:05 am | प्रचेतस

सहमत.

नन्दादीप's picture

1 Oct 2011 - 12:04 pm | नन्दादीप

मी म्हणतो, तुम्हाला असले धागे वाचायला कंटाळा येतो तर वाचूच नका ना.... उगाचच डोक्याला ताप कशाला???? नाही का??

सोत्रि

ते बेला तुम्हीच का?
(शंका विचारणारा) गवि

आशु जोग's picture

2 Oct 2011 - 3:53 pm | आशु जोग

अर्धवटराव

सही बोला !

मन१'s picture

1 Oct 2011 - 2:07 pm | मन१

तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वीट आला म्हणून दुसर्‍यावर का बंदी घालावी बुवा.
एखाद्याला माझे(किंवा तुमचेही) नाव्/आय डी आवडत नसेल तर "द्या उडवुन ह्याला" म्हणेल.मग मी(किंवा तुम्ही) नै का बोंब मारणार.
त्यांना इथं लिहायचे स्वातंत्र्य आहे. वाचकांना वाचायचे स्वातंत्र्य आहे. आणि.
.
.
.
.
.
तुम्हाला आणि मला "न वाचायचे" स्वातंत्र्य आहे.

श्यामल's picture

1 Oct 2011 - 12:01 pm | श्यामल

शिवाय आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि. >>> सहमत. आणि चुकुन अशा धाग्यांना भेट दिलीच किंवा लक्षवेधक शीर्षकामुळे पुढचे लिखाण वाचले गेलेच, तर प्रतिसाद न देता निघुन जाणे श्रेयस्कर असे मला वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2011 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि. चुकुन अशा धाग्यांना भेट दिलीच किंवा लक्षवेधक शीर्षकामुळे पुढचे लिखाण वाचले गेलेच, तर प्रतिसाद न देता निघुन जाणे श्रेयस्कर असे मला वाटते.

शामलशी सहमत आहे.

नावडते लेखन वाचल्यामुळे ज्या सभ्य लोकांना ओकार्‍याची भावना निर्माण होते ती होणार नाही असेही वाटते. नावडते लेखन वाचल्यामुळे लेखनाखाली प्रतिसादात जे ओकार्‍या बिकार्‍यासारखे असभ्य शब्द दिसतात ते शब्दही दिसणार नाहीत, हाही एक फायदाच अशा कृतीमुळे होईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2011 - 9:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं बरं, लोकांच्या काही श्रद्धा असणार्‍या दगडांवर केलेले प्रातर्विधी सभ्य असावेत.

पण ही सगळी तुमची मतं प्राडॉ का संपादक मंडळाची? नाही, मिपासारख्या व्यासपीठाचा भंपक गोष्टींच्या फुक्कटछाप जाहिरातींसाठी झालेला मलातरी बघवत नाहीये म्हणून विचारलं.

>> नावडते लेखन वाचल्यामुळे लेखनाखाली प्रतिसादात जे ओकार्‍या बिकार्‍यासारखे असभ्य शब्द दिसतात ते शब्दही दिसणार नाहीत

तुम्हीही असा विचार करता पाहून बरं वाटलं

मी-सौरभ's picture

1 Oct 2011 - 12:43 pm | मी-सौरभ

अशी चूक करायची नाही हे बर्याच वेळा ठरवूनही पाळता येत नाही तेव्हा त्या धाग्यावर प्रतिक्रिया न देता फुटणे श्रेयस्कर असते....

आशु जोग's picture

1 Oct 2011 - 3:17 pm | आशु जोग

>> प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ?

बाकी मूळ धाग्यापेक्षा आपले लेखन अधिक चांगले आहे.

शिष्यादिच्छेत...... असं काहीतरी म्हणतात

होबासराव's picture

18 Jan 2016 - 8:54 pm | होबासराव

खोदता खोदता हे सापडेश

संदीप डांगे's picture

18 Jan 2016 - 10:03 pm | संदीप डांगे

आवडेश!

नाखु's picture

19 Jan 2016 - 8:56 am | नाखु

चला म्हणजे तेव्हाही काही प्रज्ञावंत्+बुद्धीनिष्ठ अगदी "उच्च" प्रतिक्रिया देत असत तर ! मी आपला उगाच आत्ताच्या टक्या आणि इतरेजनांस असहिष्णु समजत होतो...

कॉम्रेड असलेल्या राष्ट्रवादीमय कॉन्ग्रेसी कळपातल्या भाजपेयींच्या मिपाकरांचा मनसे मित्र नाखु

प्रतिसाद देणे अथवा न देणे आपल्या हातात असते.

असो,

लेखनस्वातंत्र्य हे हवेच.

भाते's picture

19 Jan 2016 - 1:01 pm | भाते

एखाद्या फालतु विषयावरच्या धाग्यावर अजिबात प्रतिसाद न देता त्या धाग्याकडे आणि धागाकर्त्याकडे दुर्लक्ष करणे केव्हाही चांगलेच.
पण लिखाणासाठी मिपासारखे दर्जेदार व्यासपीठ मिळाले म्हणुन काहिही लिहिलेले का म्हणुन खपवुन घ्यायचे?
चेपु फुकट आहे आणि चेपुच्या भिंतीवर रोज काहीतरी फुटकळ लिहिले तर दोन चार दिवस मित्र ते वाचुन किंवा न वाचताच 'आवडले' वर टिचकी मारतील. पण नंतर ते एकतर त्याकडे दुर्लक्ष करतील किंवा सरळ शिव्या घालतील.
मिपा सदस्य म्हणुन आपल्याला लिखाणासाठी आणि इतरांना वाचनासाठी फुकट असले तरी कोणीतरी त्यासाठी दमड्या मोजतो आहेच ना!
किती लिहिले या पेक्षा काय लिहिले हे महत्वाचे आहे.

पिलीयन रायडर's picture

19 Jan 2016 - 1:22 pm | पिलीयन रायडर

How about ratings by readers? Many topics are just for TRP. Like Hemat Latkar's articles. Without posting any reply to such threads, one can just give low rating and such low rated threads could be sorted and kept at bottom.

Nobody like Hemant Latkar's latest thread but even to say that २००+ replies were posted. Plus writer himself was clearly provoking people. Why even bother?

कपिलमुनी's picture

19 Jan 2016 - 2:04 pm | कपिलमुनी

रेटींगने फक्त कंपूबाजी वाढेल. पल्याड पाप पुण्याचा बोजवारा उडाला आहे .

होबासराव's picture

19 Jan 2016 - 1:53 pm | होबासराव

पेरना - साहित्य सुर्यांचि चारोळि http://www.misalpav.com/node/32575

आजकाल मालकांच लक्ष नसल्याने मिपा
नानु सरंजामे च्या तावडित सापडले आहे
मालकांनी थोडी ढिल दिल्याने
नानु सरंजामे फारच चेकाळलाय

नानु सरंजामे = तोच "मि झोपतो करुन हिमालयाचि उशी"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jan 2016 - 6:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा बंद्या न लादण्याबद्दल मिसळपाव प्रशासनाचे आभार.

(मुद्दामच दुसरा प्रतिसाद देत्ये. यथावकाश मतं बदलतात याची नोंद म्हणून.)

शशिकांत ओक's picture

21 Jan 2016 - 8:57 pm | शशिकांत ओक

यथावकाश मतं बदलतात याची नोंद म्हणून

मळमळ कमी झाली की नाही कल्पना नाही...
नाड़ी ग्रंथ भविष्य विषयावरील भाषा आणि लिपीचे अभ्यासक म्हणून अनेकांचे सहकार्य मिळत आहे आपले सहकार्य लाभले तर आवडेल.

हेमंत लाटकर's picture

21 Jan 2016 - 6:37 pm | हेमंत लाटकर

जो धागा आवडत नाही त्याला खोचक प्रतिसाद देऊन धागा लेखकाला लिहण्यास भाग पाडून तो धागा मिपा मालकांना ब्लाॅक करण्यासाठी भाग पाडण्यात कसला आलाय पराक्रम?

कट्टप्पा's picture

22 Jan 2016 - 12:10 pm | कट्टप्पा

नुसता धागाच नाही लाटकरकाका. उकसवून उकसवून आयडीना सुध्दा ब्लॉक करवतात. सांभाळून हो जरा.

पैसा's picture

22 Jan 2016 - 1:57 pm | पैसा

५ महिन्यात मिपाचा बराच अभ्यास झाला की!

कट्टप्पा's picture

22 Jan 2016 - 3:52 pm | कट्टप्पा

एनी प्रॉब्लम?

पैसा's picture

22 Jan 2016 - 3:59 pm | पैसा

आम्हाला कसला प्रॉब्लेम असणार? कौतुक वाटलं.