✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय : (एका आठवड्यात) तिसरा धागा प्रकाशित केल्यास लेखनबंदी!

प
पांथस्थ यांनी
Fri, 09/30/2011 - 23:20  ·  लेख
लेख
प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ? ----- मिपावर सात दिवसाच्या आत तिसरा धागा प्रकाशित केला (दोन्/तीन्/चार कितीही ओळींचा) तर नसबंदीची आपलं हे लेखनबंदीची शस्त्रक्रिया कारवाई सुनावण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा कायदा मिपावरच नव्हे तर उ**मासह सगळ्या मराठी संकेतस्थळांवर कोणतीही सवलत न देता लागु करावा... त्याचबरोबर आंतरजालीय माफियांनी आणी वेबहोस्टींग कंपन्यांनी विदाचे अवास्तव महत्व/गरज भासवत डेटा-सेंटरचा गुंतवणुकीसाठी वापर करत संकेतस्थळाच्या किमती आकाशातुन जमिनीवर आणुन ठेवल्यात. संकेतस्थळाकरता कीती जागा वापरावी, एकाच्या नावावर कीती संकेतस्थळं असावीत, कीती सर्व्हर स्लॉट मोकळे असावे यावर कोणतेही बंधन नाही. यामुळे सामान्य जनतेस संकेतस्थळ बनविणे / धागे प्रसविणे प्रकाशित करणे अतिशय सोपे झाले आहे. तरी सरकारने हे कायदे त्वरित अंमलात आणावे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8271 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

.

आशु जोग
Fri, 09/30/2011 - 23:26 नवीन
विनोदी पण गंभीर विचार देणारा धागा आहे तुमचा , आगे बढो !
  • Log in or register to post comments

एका आठवड्यात ३-४ लेख

शिल्पा ब
Sat, 10/01/2011 - 01:28 नवीन
एका आठवड्यात ३-४ लेख प्रसवणारे लेखक रिकामटेकडेच असतात मग त्यांच्यावर बंधनं घालून इतर धाग्यांवर प्रतिक्रियेचा गोंधळ का वाढवा? आणि किती लोकांवर लेखनबंदी घालणार?
  • Log in or register to post comments

ज्जे बात्त..

शैलेन्द्र
Sat, 10/01/2011 - 11:04 नवीन
ज्जे बात्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/01/2011 - 07:36 नवीन
धाग्यांच्या भस्मासुरावर उपाय काय?... संपादकांनी अश्या आसुरी धाग्यांवर भस्म टाकावे,,, ;-)
  • Log in or register to post comments

आणि त्या नाडीच्या धाग्यांच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 10/01/2011 - 07:48 नवीन
आणि त्या नाडीच्या धाग्यांच्या जनकाचीही सक्तीने नसबंदी करावी ... वीट आलाय त्या ओकार्‍यांचा. व्यक्तीगत प्रतिसाद वाटला तरी कृपया मिपा संपादकांनी याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

शिल्पा ब
Sat, 10/01/2011 - 08:08 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण सहमत आहे.

निवेदिता-ताई
Sat, 10/01/2011 - 08:10 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

-१

नितिन थत्ते
Sat, 10/01/2011 - 08:17 नवीन
असहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

का?

शिल्पा ब
Sat, 10/01/2011 - 08:26 नवीन
का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

असंच

नितिन थत्ते
Sat, 10/01/2011 - 10:22 नवीन
मेरी मर्जी (स्वतंत्र) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असंच

नितिन थत्ते
Sat, 10/01/2011 - 10:24 नवीन
मेरी मर्जी (स्वतंत्र) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

-१ ला -१

नन्दादीप
Sat, 10/01/2011 - 12:02 नवीन
-१ ला -१ (खरे तर +१ पण +१ केल तर ० होईल ना म्हणून -१).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत

तिमा
Sun, 10/02/2011 - 11:20 नवीन
थत्तेचाचांच्या असहमतीशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तिरशिंगरावांनी थत्ते

अप्पा जोगळेकर
Sun, 10/02/2011 - 14:12 नवीन
तिरशिंगरावांनी थत्ते काकांच्या असहमतीला जी सहमती दाखवली त्याला पाठिंबा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

पाठिंबा

क्लिंटन
Sun, 10/02/2011 - 16:25 नवीन
अप्पा जोगळेकरांनी तिरसिंगरावांनी थत्ते काकांच्या असहमतीला जी सहमती दाखवली त्याला पाठिंबा दिला त्याला सहमती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

क्लिंटनला मोदक!

जव्हेरगंज
Mon, 01/18/2016 - 21:15 नवीन
क्लिंटनला मोदक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आय डोण्ट थिंक सो !!

अर्धवटराव
Sat, 10/01/2011 - 08:36 नवीन
हाच न्याय लावतो म्हटलं तर (प्रतिक्रियांना सुद्धा... बरेचदा प्रतिक्रिया मूळ लेखापेक्षा खुप जास्त रटाळ/अवास्तव/फालतु वगैरे वगैरे असतात ) मिपा ओस पडायचा धोका आहे ;) शिवाय आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि. (सिलेक्टीव्ह वाचक) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

सोत्रि
Sat, 10/01/2011 - 08:55 नवीन
सहमत! - ( डोक्याला हेडेकचं दुखणं न होउ देणारा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+२

प्रचेतस
Sat, 10/01/2011 - 09:05 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

+३

नन्दादीप
Sat, 10/01/2011 - 12:04 नवीन
मी म्हणतो, तुम्हाला असले धागे वाचायला कंटाळा येतो तर वाचूच नका ना.... उगाचच डोक्याला ताप कशाला???? नाही का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सोत्रि ते बेला तुम्हीच

गवि
Sat, 10/01/2011 - 10:12 नवीन
सोत्रि ते बेला तुम्हीच का? (शंका विचारणारा) गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अर्धवटराव सही बोला !

आशु जोग
Sun, 10/02/2011 - 15:53 नवीन
अर्धवटराव सही बोला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+-१

मन१
Sat, 10/01/2011 - 14:07 नवीन
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा वीट आला म्हणून दुसर्‍यावर का बंदी घालावी बुवा. एखाद्याला माझे(किंवा तुमचेही) नाव्/आय डी आवडत नसेल तर "द्या उडवुन ह्याला" म्हणेल.मग मी(किंवा तुम्ही) नै का बोंब मारणार. त्यांना इथं लिहायचे स्वातंत्र्य आहे. वाचकांना वाचायचे स्वातंत्र्य आहे. आणि. . . . . . तुम्हाला आणि मला "न वाचायचे" स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाय आपल्याला आवडत/पटत

श्यामल
Sat, 10/01/2011 - 12:01 नवीन
शिवाय आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि. >>> सहमत. आणि चुकुन अशा धाग्यांना भेट दिलीच किंवा लक्षवेधक शीर्षकामुळे पुढचे लिखाण वाचले गेलेच, तर प्रतिसाद न देता निघुन जाणे श्रेयस्कर असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/02/2011 - 08:49 नवीन
आपल्याला आवडत/पटत नसलेल्या धाग्यांना भेट देऊच नये ना... शिंपल.. डोक्याला हेडेकचं दुखणं नाहि. चुकुन अशा धाग्यांना भेट दिलीच किंवा लक्षवेधक शीर्षकामुळे पुढचे लिखाण वाचले गेलेच, तर प्रतिसाद न देता निघुन जाणे श्रेयस्कर असे मला वाटते. शामलशी सहमत आहे. नावडते लेखन वाचल्यामुळे ज्या सभ्य लोकांना ओकार्‍याची भावना निर्माण होते ती होणार नाही असेही वाटते. नावडते लेखन वाचल्यामुळे लेखनाखाली प्रतिसादात जे ओकार्‍या बिकार्‍यासारखे असभ्य शब्द दिसतात ते शब्दही दिसणार नाहीत, हाही एक फायदाच अशा कृतीमुळे होईल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्यामल

प्रातर्विधी सभ्य असावेत

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 10/02/2011 - 09:55 नवीन
बरं बरं, लोकांच्या काही श्रद्धा असणार्‍या दगडांवर केलेले प्रातर्विधी सभ्य असावेत. पण ही सगळी तुमची मतं प्राडॉ का संपादक मंडळाची? नाही, मिपासारख्या व्यासपीठाचा भंपक गोष्टींच्या फुक्कटछाप जाहिरातींसाठी झालेला मलातरी बघवत नाहीये म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> नावडते लेखन वाचल्यामुळे

आशु जोग
Sun, 10/02/2011 - 16:00 नवीन
>> नावडते लेखन वाचल्यामुळे लेखनाखाली प्रतिसादात जे ओकार्‍या बिकार्‍यासारखे असभ्य शब्द दिसतात ते शब्दही दिसणार नाहीत तुम्हीही असा विचार करता पाहून बरं वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

मी-सौरभ
Sat, 10/01/2011 - 12:43 नवीन
अशी चूक करायची नाही हे बर्याच वेळा ठरवूनही पाळता येत नाही तेव्हा त्या धाग्यावर प्रतिक्रिया न देता फुटणे श्रेयस्कर असते....
  • Log in or register to post comments

>> प्रेरणा - लोकसंख्येच्या

आशु जोग
Sat, 10/01/2011 - 15:17 नवीन
>> प्रेरणा - लोकसंख्येच्या भस्मासुरावर उपाय : तिसरे मूल झाल्यास जेलमध्ये ? बाकी मूळ धाग्यापेक्षा आपले लेखन अधिक चांगले आहे. शिष्यादिच्छेत...... असं काहीतरी म्हणतात
  • Log in or register to post comments

खोदता खोदता हे सापडेश

होबासराव
Mon, 01/18/2016 - 20:54 नवीन
खोदता खोदता हे सापडेश
  • Log in or register to post comments

आवडेश!

संदीप डांगे
Mon, 01/18/2016 - 22:03 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

+११

नाखु
Tue, 01/19/2016 - 08:56 नवीन
चला म्हणजे तेव्हाही काही प्रज्ञावंत्+बुद्धीनिष्ठ अगदी "उच्च" प्रतिक्रिया देत असत तर ! मी आपला उगाच आत्ताच्या टक्या आणि इतरेजनांस असहिष्णु समजत होतो... कॉम्रेड असलेल्या राष्ट्रवादीमय कॉन्ग्रेसी कळपातल्या भाजपेयींच्या मिपाकरांचा मनसे मित्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जर एखाद्याला लेखनकंदू असेल तर तो शमवू द्यावा...

मुक्त विहारि
Tue, 01/19/2016 - 09:18 नवीन
प्रतिसाद देणे अथवा न देणे आपल्या हातात असते. असो, लेखनस्वातंत्र्य हे हवेच.
  • Log in or register to post comments

काही अंशी असहमत.

भाते
Tue, 01/19/2016 - 13:01 नवीन
एखाद्या फालतु विषयावरच्या धाग्यावर अजिबात प्रतिसाद न देता त्या धाग्याकडे आणि धागाकर्त्याकडे दुर्लक्ष करणे केव्हाही चांगलेच. पण लिखाणासाठी मिपासारखे दर्जेदार व्यासपीठ मिळाले म्हणुन काहिही लिहिलेले का म्हणुन खपवुन घ्यायचे? चेपु फुकट आहे आणि चेपुच्या भिंतीवर रोज काहीतरी फुटकळ लिहिले तर दोन चार दिवस मित्र ते वाचुन किंवा न वाचताच 'आवडले' वर टिचकी मारतील. पण नंतर ते एकतर त्याकडे दुर्लक्ष करतील किंवा सरळ शिव्या घालतील. मिपा सदस्य म्हणुन आपल्याला लिखाणासाठी आणि इतरांना वाचनासाठी फुकट असले तरी कोणीतरी त्यासाठी दमड्या मोजतो आहेच ना! किती लिहिले या पेक्षा काय लिहिले हे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

How about ratings by readers?

पिलीयन रायडर
Tue, 01/19/2016 - 13:22 नवीन
How about ratings by readers? Many topics are just for TRP. Like Hemat Latkar's articles. Without posting any reply to such threads, one can just give low rating and such low rated threads could be sorted and kept at bottom. Nobody like Hemant Latkar's latest thread but even to say that २००+ replies were posted. Plus writer himself was clearly provoking people. Why even bother?
  • Log in or register to post comments

रेटींग ?

कपिलमुनी
Tue, 01/19/2016 - 14:04 नवीन
रेटींगने फक्त कंपूबाजी वाढेल. पल्याड पाप पुण्याचा बोजवारा उडाला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पेरना - साहित्य सुर्यांचि

होबासराव
Tue, 01/19/2016 - 13:53 नवीन
पेरना - साहित्य सुर्यांचि चारोळि http://www.misalpav.com/node/32575 आजकाल मालकांच लक्ष नसल्याने मिपा नानु सरंजामे च्या तावडित सापडले आहे मालकांनी थोडी ढिल दिल्याने नानु सरंजामे फारच चेकाळलाय नानु सरंजामे = तोच "मि झोपतो करुन हिमालयाचि उशी"
  • Log in or register to post comments

मिसळपाव प्रशासनाचे आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/20/2016 - 06:40 नवीन
अशा बंद्या न लादण्याबद्दल मिसळपाव प्रशासनाचे आभार. (मुद्दामच दुसरा प्रतिसाद देत्ये. यथावकाश मतं बदलतात याची नोंद म्हणून.)
  • Log in or register to post comments

असहिष्णुता अयोग्य!

शशिकांत ओक
गुरुवार, 01/21/2016 - 20:57 नवीन
यथावकाश मतं बदलतात याची नोंद म्हणून
मळमळ कमी झाली की नाही कल्पना नाही... नाड़ी ग्रंथ भविष्य विषयावरील भाषा आणि लिपीचे अभ्यासक म्हणून अनेकांचे सहकार्य मिळत आहे आपले सहकार्य लाभले तर आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जो धागा आवडत नाही त्याला खोचक

हेमंत लाटकर
गुरुवार, 01/21/2016 - 18:37 नवीन
जो धागा आवडत नाही त्याला खोचक प्रतिसाद देऊन धागा लेखकाला लिहण्यास भाग पाडून तो धागा मिपा मालकांना ब्लाॅक करण्यासाठी भाग पाडण्यात कसला आलाय पराक्रम?
  • Log in or register to post comments

नुसता धागाच नाही लाटकरकाका.

कट्टप्पा
Fri, 01/22/2016 - 12:10 नवीन
नुसता धागाच नाही लाटकरकाका. उकसवून उकसवून आयडीना सुध्दा ब्लॉक करवतात. सांभाळून हो जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

अरे वा!

पैसा
Fri, 01/22/2016 - 13:57 नवीन
५ महिन्यात मिपाचा बराच अभ्यास झाला की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा

एनी प्रॉब्लम?

कट्टप्पा
Fri, 01/22/2016 - 15:52 नवीन
एनी प्रॉब्लम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाय ब्वा!

पैसा
Fri, 01/22/2016 - 15:59 नवीन
आम्हाला कसला प्रॉब्लेम असणार? कौतुक वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कट्टप्पा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा