Skip to main content

भाव ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/09/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंच्या कवितेकडून प्रेरणा मिळाली - "जगण्यास वाव नाही, मरणांस भाव नाही ..." असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ... हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ... नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ... बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ... तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ... फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ... चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ... वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ... तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ... इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ... इथे सरणास भाव आहे ... - विश्वेश
लेखनविषय:

वाचने 1394
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ... इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...
हे खासचं! एक शंका: वरील कविता वृत्तात नसावी. बहुदा जशी सुचली तशीच उतरवली आहे. आणि तसे असेल तर खरचं स्तुत्य आहे.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

जशि सुचलि तशि लिहिलि ...

ह्या ओळी विशेष अप्रतिम : बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ... आणि इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ... सुदंर!!!

तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ... इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...
अप्रतिम ... बाकीची कडवी विशेष आवडली नव्हती ... पण ह्या ओळीं खुपच निव्व्ळ अप्रतिम आहेत ... लिहित रहा .. वाचत आहे...