भाव ...
उदय सप्रेंच्या कवितेकडून प्रेरणा मिळाली - "जगण्यास वाव नाही, मरणांस भाव नाही ..."
असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ...
हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ...
नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ...
बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ...
तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ...
फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ...
चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ...
वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ...
तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ...
इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ...
इथे सरणास भाव आहे ...
- विश्वेश
लेखनविषय:
याद्या
1383
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
छानच!
बरोबर
In reply to छानच! by मिसळलेला काव्यप्रेमी
ह्या ओळी विशेष अप्रतिम
तू मोजतो आहेस वर्षे ... तुला
कविता छान आहे. विशेषकरुन