✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिय मित्र...!गणपती बाप्पा ..!!

प — प्रकाश१११, Mon, 09/19/2011 - 00:18
किती वर्षे झाली आपली घट्ट दोस्ती होऊन नाव तर ऐकून होतो नवसाला पावतोस म्हणून मग अचानक ओळख झाली ७ -८ वर्षाचा होतो तेव्हापासून तेव्हाच तुला मी मित्र केला परीक्षेच्या दिवशी तुला नमस्कार केला नि पेपर मला सोपा गेला शप्पत ...! हे अगदी खरे सांगतोय बाप्पा तुला ...! अगदी मनापासून... !! मित्र म्हणून तुझे किती लाड केले गणेश उत्सवात तुला बाबांनी घरी आणले नि मी तुझ्यासाठी काय काय केले डोंगर केले.... वळणावळणाचा घाट रस्ता केला पांढर्या शुभ्र खडूचे छोटे छोटे दगड तयार केले रस्ता सुंदर झाला हरळी पेरून डोंगर हिरवा केला स्वर्गाहून सुंदर असे घर केले गणपती बाप्पा आठवतेय ना तुला हे सगळे ..? पण मला धड कधी पूजा नाही करता आली संध्येची पळी कधी नाही नीट धरता आली आचमन की काय तेपण कधी नाही जमले हसला असशील मनातल्या मनात तरी मला तू सांभाळून घेतलेस काळ बदलला घरे बदलली, छोटी झाली आता तुझ्या आगमनाला नाही बनवीत ते डोंगर ,रस्ते ती हिरवळ मुलेच तुझ्यासाठी आणतात मखर ..दिवे ,माळा.!! वगैरे वगैरे आणखीन काही नि काही... पण आजकाल खरेच मनाची ताकद कमी होऊन जाते कधी तरी मनाची ब्याटरी लो होऊन जाते मग मी भटकून येतो तुझ्या जुन्या डोंगर आठवणीत तुझ्या आठवणीत जातो रमून मनसोक्त नि विसरून जातो स्वताला नि बाप्पा शप्पत माझ्या मनाची ब्याटरी चार्ज होऊन जाते बाप्पा ही पण तुझीच कृपा असते आभाळभर पसरलेली ,,,!!

प्रतिक्रिया द्या
2186 वाचन

💬 प्रतिसाद (11)

छान

जाई.
Mon, 09/19/2011 - 11:07 नवीन
नेहमीप्रमाणेच उत्तम कविता आवडले
  • Log in or register to post comments

छानचं

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 09/19/2011 - 12:02 नवीन
मनाची ब्याटरी लो होऊन जाते मग मी भटकून येतो तुझ्या जुन्या डोंगर आठवणीत तुझ्या आठवणीत जातो रमून मनसोक्त
हि कल्पना आवडली. कविता छानचं!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

पैसा
Mon, 09/19/2011 - 20:34 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

उत्तम ...उत्तम ....उत्तम ...

निवेदिता-ताई
Mon, 09/19/2011 - 20:46 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त कविता .. नेहमीप्रमाणे

गणेशा
Mon, 09/19/2011 - 20:56 नवीन
मस्त कविता .. नेहमीप्रमाणे छान .. आणि नेहमीप्रमाणेच काळाच्या पडद्याला उलगडुन पाहणारे शब्द
  • Log in or register to post comments

छान जमलीय !!

सुहास झेले
Mon, 09/19/2011 - 22:32 नवीन
छान जमलीय !!
  • Log in or register to post comments

अरे काय हे! परागचा शंकर अन

पाषाणभेद
Tue, 09/20/2011 - 05:33 नवीन
अरे काय हे! परागचा शंकर अन आपला गणपती!! >>> डोंगर केले.... वळणावळणाचा घाट रस्ता केला पांढर्या शुभ्र खडूचे छोटे छोटे दगड तयार केले रस्ता सुंदर झाला हरळी पेरून डोंगर हिरवा केला एकदम बर्रोबर, सगळ्यांच्या लहाणपणाच्या आठवणी जवळपास मिळत्याजुळत्या असतात काय? मस्त काव्य पकाकाका (पकाकाका..पकाकाका असे प्रेमानं म्हणतो हो. आमच्या घराशेजारीच एक प्रकाश होते. त्यांना पकाकाका म्हणत असू आम्ही.)
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार ..!!

प्रकाश१११
गुरुवार, 09/22/2011 - 00:40 नवीन
सर्वांचे मनापासून आभार ..!!
  • Log in or register to post comments

आपला गणपती!!

चाल क बि.एन
गुरुवार, 09/22/2011 - 16:09 नवीन
लहाणपणाच्या आठवणी .. जवळपास तस्याच..... काय पन किति काळ् मनात घर करुन असतात नाहि ? सुन्दर हितगुज.
  • Log in or register to post comments

ओहो, क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/22/2011 - 16:20 नवीन
मस्त कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दिलीप बिरुटेजी -आपले मनापासून

प्रकाश१११
Tue, 09/27/2011 - 04:38 नवीन
दिलीप बिरुटेजी -आपले मनापासून आभार ..!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा