प्रिय मित्र...!गणपती बाप्पा ..!!
किती वर्षे झाली
आपली घट्ट दोस्ती होऊन
नाव तर ऐकून होतो
नवसाला पावतोस म्हणून
मग अचानक ओळख झाली
७ -८ वर्षाचा होतो तेव्हापासून
तेव्हाच तुला मी मित्र केला
परीक्षेच्या दिवशी तुला नमस्कार केला
नि पेपर मला सोपा गेला
शप्पत ...!
हे अगदी खरे सांगतोय बाप्पा तुला ...!
अगदी मनापासून... !!
मित्र म्हणून तुझे किती लाड केले
गणेश उत्सवात तुला बाबांनी घरी आणले
नि मी तुझ्यासाठी काय काय केले
डोंगर केले....
वळणावळणाचा घाट रस्ता केला
पांढर्या शुभ्र खडूचे छोटे छोटे दगड तयार केले
रस्ता सुंदर झाला
हरळी पेरून डोंगर हिरवा केला
स्वर्गाहून सुंदर असे घर केले
गणपती बाप्पा आठवतेय ना तुला हे सगळे ..?
पण मला धड कधी पूजा नाही करता आली
संध्येची पळी कधी नाही नीट धरता आली
आचमन की काय तेपण कधी नाही जमले
हसला असशील मनातल्या मनात
तरी मला तू सांभाळून घेतलेस
काळ बदलला
घरे बदलली,
छोटी झाली
आता तुझ्या आगमनाला नाही बनवीत ते डोंगर ,रस्ते
ती हिरवळ
मुलेच तुझ्यासाठी आणतात मखर ..दिवे ,माळा.!!
वगैरे वगैरे
आणखीन काही नि काही...
पण आजकाल खरेच
मनाची ताकद कमी होऊन जाते कधी तरी
मनाची ब्याटरी लो होऊन जाते
मग मी भटकून येतो तुझ्या जुन्या डोंगर आठवणीत
तुझ्या आठवणीत जातो रमून मनसोक्त
नि विसरून जातो स्वताला
नि बाप्पा शप्पत
माझ्या मनाची ब्याटरी चार्ज होऊन जाते
बाप्पा ही पण तुझीच कृपा असते
आभाळभर पसरलेली ,,,!!
छान
छानचं
कविता आवडली.
उत्तम ...उत्तम ....उत्तम ...
मस्त कविता .. नेहमीप्रमाणे
छान जमलीय !!
अरे काय हे! परागचा शंकर अन
सर्वांचे मनापासून आभार ..!!
आपला गणपती!!
ओहो, क्या बात है.
दिलीप बिरुटेजी -आपले मनापासून