नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवाद्यांचे वाकडे असायचे कारण नाही...
मित्रांनो,
माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे.
मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. मात्र काही न करता त्यांनी नाडीग्रंथांवर जो शिक्का मारला तो एक विज्ञानाला मानणारा म्हणून मला मान्य होत नाही. आपण एकत्र येऊ. अभ्यास करू. असे माझे आजही जे प्रांजळपणे या विषयावर काम करू इच्छितात यांना निमंत्रण आहे.
एकदा तोंड देखले गेलेल्या एकांच्या 'आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती आपल्याला नाडपट्टीतून आली आहे असे भासवतात या कथनाची ढाल पुढे करून किती दिवस मारुन नेणार?
अंनिसवर भक्ती असलेल्या आपल्या पैकी कोणी मदतीचा हात पुढे केला नाहीत तरी आता ताडपत्रातील लिपीचा पद्धतशीर अभ्यास करून त्या पट्यातील ओळी-ओळीच्या मजकुराची शहानिशा करून त्यातील कुट लिपीची फोड करणारे अभ्यास लेख सादर केले गेलेत. पैकी एक उपक्रम दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाला सर्वात जास्त वाचले गेले.
हा विषय ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला म्हणून ते न मानणाऱ्यांना धोपटायला सोईचा झाला आहे, तिकडे ज्योतिषी लोक आपली वट कमी होते या काळजीने नाडी ग्रंथांना अनुल्लेखाने मारतात. भाषा तमिळ म्हणून त्यातील गम्य नसलेल्या तमिळेतर लोकांना भाषेची अडचण, नाडी वाचकांना ती सबब फसवणूक करायला सोपी व सोईची आहे असे वाटून अपसमज पसरवायला जड जात नाही. असे आजूबाजूचे वातावरण असल्याने त्यावर नाडीग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे उत्तर आहे.
अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो. विज्ञानाची कास धरणाऱ्या नाडी विरोधकांची नाडीग्रंथांच्या सत्यतेला पद्धतशीर प्रतारणा दुर्लक्ष करून किती दिवस चालणार?
इथे माझे एक मित्र नाडी ग्रंथ पाहून आलेले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या भविष्यातील कथनातील तफावतीची आहे. पण त्यांनी निदान नाडीग्रंथ पाहिल्याची व त्यातील माहितीची ओळख करून घेतली आहे. इतर तेवढेही करायला तयार नाहीत. असो.
मग आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?...
बोला...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे
कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते
ख्या ख्या ख्या!
आला पहिला वाकडा आला... आता
त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन?
हे काय नवीन?... नाडीने आधीच वात आलाय...
शांती
जन्मजात वाकड्यांचे माहित नाही...पण