✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवाद्यांचे वाकडे असायचे कारण नाही...

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 09/14/2011 - 01:38  ·  लेख
लेख
मित्रांनो, माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे. मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. मात्र काही न करता त्यांनी नाडीग्रंथांवर जो शिक्का मारला तो एक विज्ञानाला मानणारा म्हणून मला मान्य होत नाही. आपण एकत्र येऊ. अभ्यास करू. असे माझे आजही जे प्रांजळपणे या विषयावर काम करू इच्छितात यांना निमंत्रण आहे. एकदा तोंड देखले गेलेल्या एकांच्या 'आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती आपल्याला नाडपट्टीतून आली आहे असे भासवतात या कथनाची ढाल पुढे करून किती दिवस मारुन नेणार? अंनिसवर भक्ती असलेल्या आपल्या पैकी कोणी मदतीचा हात पुढे केला नाहीत तरी आता ताडपत्रातील लिपीचा पद्धतशीर अभ्यास करून त्या पट्यातील ओळी-ओळीच्या मजकुराची शहानिशा करून त्यातील कुट लिपीची फोड करणारे अभ्यास लेख सादर केले गेलेत. पैकी एक उपक्रम दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाला सर्वात जास्त वाचले गेले. हा विषय ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला म्हणून ते न मानणाऱ्यांना धोपटायला सोईचा झाला आहे, तिकडे ज्योतिषी लोक आपली वट कमी होते या काळजीने नाडी ग्रंथांना अनुल्लेखाने मारतात. भाषा तमिळ म्हणून त्यातील गम्य नसलेल्या तमिळेतर लोकांना भाषेची अडचण, नाडी वाचकांना ती सबब फसवणूक करायला सोपी व सोईची आहे असे वाटून अपसमज पसरवायला जड जात नाही. असे आजूबाजूचे वातावरण असल्याने त्यावर नाडीग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे उत्तर आहे. अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो. विज्ञानाची कास धरणाऱ्या नाडी विरोधकांची नाडीग्रंथांच्या सत्यतेला पद्धतशीर प्रतारणा दुर्लक्ष करून किती दिवस चालणार? इथे माझे एक मित्र नाडी ग्रंथ पाहून आलेले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या भविष्यातील कथनातील तफावतीची आहे. पण त्यांनी निदान नाडीग्रंथ पाहिल्याची व त्यातील माहितीची ओळख करून घेतली आहे. इतर तेवढेही करायला तयार नाहीत. असो. मग आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?... बोला...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14941 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे

गणपा
Wed, 09/14/2011 - 21:35 नवीन
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार ?
त्यासाठी आधी सगळ्या राजकारणी/बिझनेस टायकुन्स् आदींच्या नाड्या सोडाव्या शोधाव्या लागतील. त्यासाठीचे पैसे कोण भरणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्चिस

कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते

ईश आपटे
Fri, 09/16/2011 - 12:00 नवीन
कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते का ?? तसे भारतातील वैज्ञानिक, कम्युनिस्ट, सेक्युलर, अंधश्रध्दानिर्मुलनवादी, पुरोगामी हे जन्मजात वाकडे आहेत...........................
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या!

Nile
Fri, 09/16/2011 - 12:05 नवीन
मेलो! मेलो!! मेलो!!! त्रिकोणी पृथ्वी वाले आम्हाला वाकडे म्हणत आहेत, आता याचा काय अर्थ घ्यायचा हे कोणीतरी सांगा रे!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

आला पहिला वाकडा आला... आता

ईश आपटे
Fri, 09/16/2011 - 12:08 नवीन
आला पहिला वाकडा आला... आता लगेच बाकीचे म्हातारे, नर मादी वाकडे ही येतील.. अगदी धनाजीराव वाकडे ही येतील... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन?

शिल्पा ब
Fri, 09/16/2011 - 12:08 नवीन
त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे काय नवीन?... नाडीने आधीच वात आलाय...

शशिकांत ओक
Fri, 09/16/2011 - 13:44 नवीन
शिल्पादेवी जी,
हे काय नवीन?
नाडीने आधीच वात आलाय... त्यात आता वाकड्यात शिरायचे म्हणजे ... म्हणून नका मला की नाडीतून काही लिहिलय का त्याबद्दल म्हणून... ... की मी लगेच म्हणणार .... प्रत्यक्ष अनुभव घ्या .... .... तुम्ही धनंजय व प्रियालींप्रमाणे म्हणणार... ... असल्या फालतू कामाला मला वेळ नाही... मग मी म्हणणार (मनात)... इथे चकाट्या पिटायला समय की कोई कमी नहीं। तुम्ही म्हणणार ... आपल्या चिकाटीचे कौतुक वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

शांती

श्रावण मोडक
Fri, 09/16/2011 - 14:02 नवीन
शांत व्हा. हे आंतरजाल आहे*! ;) * या विधानाचे श्रेय माझे नाही. ते उपक्रमी धम्मकलाडू यांचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जन्मजात वाकड्यांचे माहित नाही...पण

शशिकांत ओक
Fri, 09/16/2011 - 14:08 नवीन
ईशजी, मानवांचे माहित नाही. पण नुकतीच एक पत्रकार सभा झाली. त्यात दिसेल त्याजागी, मिळेल त्या वस्तूंवर पायवर करून घाण करण्याने पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची तक्रार चर्चेला आली होती. त्यासाठी कुंड बांधून त्यात विधी करावा असा प्रस्ताव मांडला गेला. तसे असून ही काहींच्या शेपट्या अजून ही वाकड्या असल्याची तक्रार करून म्हटले गेले की ते आचरण करीत नसले तर त्यांच्यावर कारवाई शिवाय गत्यंतर नाही.... ... असा सर्व श्वानांचा सूर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा